शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
2
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
3
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
4
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
5
जातनिहाय जनगणनेला RSS ने दीड वर्षांअगोदरच केरळमधून दाखविला होता हिरवा झेंडा
6
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
7
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
8
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
9
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
10
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
11
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
12
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
13
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
14
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
15
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश
16
उन्हाचा कहर; सातारा ४०.७ अंशावर स्थिर! झळा असह्य, पूर्व भागात नागरिकांना घामाच्या धारा 
17
अवघ्या १२०० रुपयांत दिली पतीला अद्दल घडविण्याची सुपारी! पत्नीनेच रचला पतीला लुटण्याचा 'प्लॅन'
18
सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा: अजित पवार
19
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
20
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत

मंगलाष्टका सुरू असतानाच नवरदेवाचे घर फोडले

By admin | Updated: January 23, 2017 22:08 IST

वधू-वरांवर अक्षता पडत असतानाच विवाह समारंभस्थळापासून हाकेच्या अंतरावर असलेले नवरदेवाचेच घर फोडून

ऑनलाइन लोकमत विटा (जि. सांगली) : वधू-वरांवर अक्षता पडत असतानाच विवाह समारंभस्थळापासून हाकेच्या अंतरावर असलेले नवरदेवाचेच घर फोडून १ लाख ८० हजार रुपये रोख रकमेसह सोन्या-चांदीचे दागिने व किमती मोबाईल असा सुमारे २ लाख २५ हजार रुपयांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला. ही घटना सोमवार, दि. २३ रोजी दुपारी साडेबाराच्या सुमारास श्रीरामनगर (विटा) येथे भोसले वस्तीवर घडली. भरदिवसा घडलेल्या या घटनेने शहरात खळबळ उडाली आहे.विटा एसटी आगारातील कर्मचारी संजय परशुराम भोसले यांचा मुलगा प्रफुल्ल श्रीनगर येथे लष्करात नोकरीस आहे. त्यांचा विवाह सोमवारी दुपारी १२.३८ वाजता मायणी रस्त्यावरील मंगल कार्यालयात होता. हे कार्यालय घरापासून थोड्याच अंतरावर आहे. दरम्यान, त्यांचे काही कुटुंबीय साडेबाराला घरला कुलूप घालून कार्यालयात गेले. तिकडे मंगलाष्टका सुरू असतानाच चोरट्यांनी त्यांच्या घराच्या मुख्य दरवाजाचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. त्यानंतर दरवाजाला आतून कडी घातली.पहिल्यांदा चोरट्यांनी टीव्हीच्या कपाटाची झडती घेतली. परंतु, तेथे काहीही मिळाले नाही. त्यानंतर लोखंडी कपाटाचा दरवाजा कापड कापण्याच्या कात्रीने उचकटून रोख १ लाख ८० हजारांची रक्कम, १० ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने, चांदीचे दागिने व किमती मोबाईल, असा सुमारे २ लाख २५ हजार रुपयांचा ऐवज लंपास केला. चोरट्यांनी घराच्या पाठीमागील दरवाजातून पलायन केले. हा प्रकार दुपारी एक वाजता घरी आल्यानंतर भोसले व त्यांच्या नातेवाईकांच्या निदर्शनास आला.घटनेची माहिती मिळताच पोलिस उपअधीक्षक अमरसिंह निंबाळकर, निरीक्षक मोहन जाधव, सहाय्यक निरीक्षक आशुतोष चव्हाण यांच्यासह पथक घटनास्थळी दाखल झाले. घटनास्थळी श्वानपथकास पाचारण करण्यात आले. श्वानाने मायणी रस्त्यावरील जयेश गार्डन हॉटेलपर्यंत मार्ग दाखविला. ठसे तज्ज्ञांनीही तपासणी केली. भरदिवसा घडलेल्या या घटनेने शहरात खळबळ उडाली आहे. या घटनेची नोंद करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत विटा पोलिस ठाण्यात सुरू होते. वरिष्ठ पोलिस निरीक्षक मोहन जाधव पुढील तपास करीत आहेत.