शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

कुठे पंचरंगी, तर कुठे बहुरंगी अपक्षांची संख्या मोठी : प्रमुख राजकीय पक्षांसमोर उभे केले आव्हान-सांगली महापालिका निवडणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2018 01:13 IST

उमेदवारी अर्ज माघारीसाठी शेवटपर्यंत रंगलेले नाट्य, इच्छुकांवर नेत्यांनी टाकलेला दबाव यामुळे, तसेच वरिष्ठ पातळीवरून फोना-फोनीमुळे अडीचशे अपक्षांनी माघार घेतली. तरीही पाच प्रभागातील काही गटात पंचरंगी, तर १५ प्रभागात बहुरंगी लढती

सांगली : उमेदवारी अर्ज माघारीसाठी शेवटपर्यंत रंगलेले नाट्य, इच्छुकांवर नेत्यांनी टाकलेला दबाव यामुळे, तसेच वरिष्ठ पातळीवरून फोना-फोनीमुळे अडीचशे अपक्षांनी माघार घेतली. तरीही पाच प्रभागातील काही गटात पंचरंगी, तर १५ प्रभागात बहुरंगी लढती होत आहेत.

सर्वच २० प्रभागात अपक्षांची संख्या मोठी असल्याने राजकीय पक्षांसमोर आव्हान आहे. अनुसूचित जाती व नागरिकांचा मागास प्रवर्ग गटासह सर्वसाधारण पुरूष गटात अपक्षांनी संख्या अधिक आहे.

अर्ज माघारीचे नाट्य संपल्यानंतर बुधवारी उमेदवारांना चिन्हांचे वाटप झाले. त्यानंतर सहाही निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी उमेदवारांची अंतिम यादी प्रसिद्ध केली. एकूण ७८ जागांसाठी ४५१ उमेदवार रिंगणात आहेत. त्यात भाजपचे सर्वाधिक ७७ उमेदवार असून त्याखालोखाल काँग्रेस व शिवसेनेचे प्रत्येकी ४५, राष्ट्रवादीचे ३२, जिल्हा सुधार समितीचे १५ व ५ पुरस्कृत, तर स्वाभिमानी विकास आघाडीचे ९ उमेदवार आहेत. याशिवाय बसप, माकप, मनसे, जनता दल, एमआयएम, भारिप, बहुजन मुक्ती पार्टी आदी पक्षांचे उमेदवारही रिंगणात उतरले आहेत. पण या पक्षांना दोनअंकी उमेदवारही मिळू शकलेले नाहीत. याउलट अपक्षांची संख्या १९४ इतकी आहे.

पाच प्रभागात पंचरंगी लढती होत आहेत. यामध्ये वसंतदादा कारखाना परिसरातील प्रभाग ११ मध्ये चारही गटात प्रत्येकी पाच उमेदवार रिंगणात आहेत. काँग्रेस आघाडी, भाजप, शिवसेनेसह दोन अपक्ष मैदानात आहेत. मदनभाऊ पाटील यांचा बालेकिल्ला असलेल्या प्रभाग ९ मध्ये तीन गटात ५, तर खुल्या गटात ४ उमेदवार आहेत. प्रमुख पक्षांसह अपक्षांनी आव्हान उभे केले आहे. मिरजेत प्रभाग ६ मध्ये तीन गटात पाच, तर एका गटात ४, प्रभाग १८ मध्ये तीन गटात पाच, तर खुल्या गटात ८ उमेदवार नशीब अजमावत आहेत.५सांगलीवाडीतील लढती : लक्षवेधी ठरणारसांगलीवाडीतील प्रभाग १३ मध्ये तीन जागा असून, त्यात ओबीसी गटात तिरंगी लढत आहे, तर सर्वसाधारण महिला व सर्वसाधारण पुरूष गटात चौरंगी लढत होत आहे. या दोन्ही गटात काँग्रेस, राष्ट्रवादी व भाजपसह अपक्षांनी अर्ज दाखल केले आहेत. त्यामुळे या प्रभागातील लढत लक्षवेधी ठरणार आहे. काँग्रेसचे नगरसेवक दिलीप पाटील, भाजपचे अजिंक्य पाटील, राष्ट्रवादीचे हरिदास पाटील यांच्यात चुरस आहे.सर्वाधिक उमेदवार प्रभाग ३ मध्येमिरजेतील प्रभाग तीनमध्ये चारही गटात मोठी चुरस आहे. या प्रभागात सर्वाधिक उमेदवार रिंगणात आहेत.पक्षनिहाय उमेदवार संख्याभाजप - ७७, काँग्रेस ४५, शिवसेना ४५, राष्ट्रवादी ३२, सुधार समिती १५, स्वाभिमानी विकास आघाडी ९, मार्क्सवादी २, बहुजन समाज पार्टी ७, मनसे २, जनता दल ६, एमआयएम ८, रासप १, भारिप बहुजन महासंघ ६, बहुजन मुक्ती पार्टी २, अपक्ष १९४, एकूण ४५१