शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

गुळाच्या ढेपेची गोडी आमच्या जीवनात कुठली? ऊस गाळताना आयुष्याचे झाले चिपाड, गुऱ्हाळ कामगारांच्या व्यथा

By हणमंत पाटील | Updated: December 13, 2023 13:01 IST

Sangli News: जगण्यात ना कुठला डामडौल, ना कुठली हौसमौज! ना कुठली चेन अन् ना जगण्यात झगमगाट. वर्षभर मिळेल तो कामधंदा करत राबराब राबायचं आणि चरितार्थ चालवायचा. कष्टाची कामे करता करता आमच्या आयुष्याचेच जणू चिप्पाड झाले आहे, अशी व्यथा गुऱ्हाळघरातील कामगारांनी मांडली.

- हणमंत पाटील/सहदेव खोतपुनवत - जगण्यात ना कुठला डामडौल, ना कुठली हौसमौज! ना कुठली चेन अन् ना जगण्यात झगमगाट. वर्षभर मिळेल तो कामधंदा करत राबराब राबायचं आणि चरितार्थ चालवायचा. कष्टाची कामे करता करता आमच्या आयुष्याचेच जणू चिप्पाड झाले आहे, अशी व्यथा गुऱ्हाळघरातील कामगारांनी मांडली.

शिराळा व शाहूवाडी तालुक्यातील वारणा पट्ट्यात सध्या गुऱ्हाळ हंगाम जोरात सुरू आहे. तेथे मोठ्या संख्येने कामगार काम करत आहेत. ठिकठिकाणाहून स्थलांतर करून आलेले कामगार गुऱ्हाळाचा हंगाम संपल्यानंतर अन्य कामांच्या शोधात निघून जातात. दरवर्षी गुऱ्हाळ हंगामात त्यांना दोन-तीन महिन्यांचा रोजगार मिळतो. 

पूर्वीप्रमाणे स्थानिक लोक आता गुऱ्हाळघरात काम करत नाहीत. गुऱ्हाळ मालकांना बाहेरून कामगार आणावे लागतात. सर्रास गुऱ्हाळघरात भूमिहीन मजूर, गोसावी व गोपाळ समाजातील लोक काम करतात. कामाचा चांगला मोबदला मिळत असला, तरी हाडाची काडे करून राबल्याशिवाय पर्याय नसतो. उसाच्या घाण्यावर, चिप्पाडावर काम करणाऱ्या या कामगारांचा दिवस पहाटे पाचपासूनच सुरू होतो.

वजनदार मोळ्या उचलून चाप लावावा लागतो. तीनचार आधणांचा ऊस गाळावा लागतो. गाळप झालेली चिपाडे वाळविण्यासाठी वाहून गुऱ्हाळघराबाहेर न्यावी लागतात. हे काम दिवसभर न संपणारे असते. चुलवाणाला चिपाडाचे जळण पुरवावे लागते. वाळलेल्या चिपाडाची व्हळी घालावी लागते. दिवस मावळतीकडे निघाल्यावर थोडावेळ अंग जमिनीवर टाकण्यासाठी उसंत मिळते. पण, दुसऱ्या दिवशी सकाळी पुन्हा हे रहाटगाडगे सुरू होते.

मुलाबाळांच्या शिक्षणाची आबदागुऱ्हाळ हंगाम संपला की, दुसरे काम शोधण्यासाठी वणवण करावी लागते. जगण्याच्या या संघर्षात मुलाबाळांच्या शिक्षणाची आबदा होते. शिक्षणाअभावी ते देखील आई-वडिलांच्या मार्गावरच गुऱ्हाळघरे किंवा अन्य मजुरीची कामे करण्याच्या मार्गावर येतात. त्यांच्या जिंदगानीत कष्टाशिवाय पर्याय राहत नाही. जगण्याचे ओझे पेलताना आपण पुढारलेल्या समाजाच्या कोसो मागे राहतोय याची जाणीव कामगारांना आयुष्यभर बोचत राहते. सुखाची तिरीप यावी म्हणूनअसंघटित कामगारांसाठी शासनाच्या अनेक योजना असल्या, तरी त्यांचा प्रकाश या कामगारांपर्यंत पोहोचलेला नाही. कोणीतरी भलतेच त्यांचा लाभ उटवितात, खरे गरजू मात्र वंचितच राहतात. गुळाच्या ढेपेखाली ओझ्याने दबलेल्या आयुष्यात सुखाच्या प्रकाशाची थोडीशी तिरीप यावी इतकीच त्यांची माफक अपेक्षा आहे.

टॅग्स :Agriculture Sectorशेती क्षेत्रSangliसांगली