शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

कुठे गेले सुरेश खाडे?-- पंचनामा आमदारांचा

By admin | Updated: August 28, 2014 23:03 IST

मिरज पूर्व भागाचा सवाल : खराब रस्त्यांनी हाडांचीही चाळण

लिंगनूर : मिरज पूर्व भागातील रस्त्यांची अक्षरश: चाळण झाली आहे. खड्डेमय-अरुंद-निसरडे रस्ते, उखडलेले पॅचवर्क, जुनाट पूल, पुलांची दुरवस्था, खोदलेल्या चरी, खचलेल्या साईडपट्ट्या, रेंगाळलेली दुरुस्ती यामुळे मिरज पूर्वभाग जिल्ह्यात बदनाम होत आहे. येथील विद्यमान आमदार सुरेश खाडे यांनी पाच वर्षांत काय केले? रस्त्यांसाठी किती निधी आणला? त्यांचा निधी कुठे मुरला? खराब रस्त्यांमुळे हाडांच्या चाळणीची भेट देणारे आ. खाडे गेले कुठे? अशा प्रश्नांची सरबत्ती या भागातील ग्रामस्थांसह प्रवासी करत आहेत.जिल्ह्यातील सर्वांत खराब रस्ते मिरज पूर्व भागात आहेत. या रस्त्यांची चाळण झाली असून, आता तेच रस्ते प्रवासी व वाहनधारकांच्या हाडांची चाळण करीत आहेत. वाढत चाललेले हाडांचे व मणक्यांचे विकार, वाहनांचे नुकसान, वैतागलेले एसटी महामंडळ, कमी होणाऱ्या बसफेऱ्या, खासगी वाहतूक खर्चातील वाढ, त्रासलेले चाकरमानी-प्रवासी-शेतकरी, एसटी बसेसचे नुकसान, प्रवासास लागणारा दुप्पट वेळ, वाढता पेट्रोलखर्च इतके सारे अनर्थ खराब रस्त्यांनीच केले, असेच जणू म्हणण्याची वेळ आली आहे.पूर्व भागात मिरज ते सलगरे, मिरज ते खंडेराजुरी व मिरज ते खटाव हे प्रमुख तीन मार्ग आहेत. मात्र ते तिन्ही मार्ग उखडले आहेत. पाच वर्षांपूर्वी भाजपने तिकीट दिल्यानंतर बाहेरून आलेल्या सुरेश खाडे यांनी आश्वासनांचा पाऊस पाडला. ‘मनी पॉवर’ आणि दंगलीचा परिणाम यामुळे ते निवडून आले. मात्र पाच वर्षांत त्यांनी या रस्त्यांसाठी काहीच केले नाही. निवडून गेल्यानंतर ते या भागात ना फिरकले, ना त्यांनी या प्रश्नासाठी तोंड उघडले. विधानसभा निवडणूक तोंडावर आल्याने आता ते या रस्त्याबाबत बोलत आहेत.मिरज ते सलगरे या रस्त्याची वाताहत पाच वर्षांपासून सुरू आहे. जनआंदोलनांच्या रेट्याने हा रस्ता आंतरराज्य मार्गात समाविष्ट झाला. जिल्हा परिषदेकडून बांधकाम विभागाकडे हस्तांतरित झाला. कोट्यवधींचा निधीही मंजूर झाला म्हणे, मात्र रस्ता काही दुरुस्त झाला नाही. तीच अवस्था आरगमार्गे जाणाऱ्या मिरज-खटाव रस्त्याची आहे. यासोबत बेडग, आरग, लिंगनूर, खटाव, टाकळी, मल्लेवाडी, एरंडोली, शिपूर, बेळंकी, संतोषवाडी, जानराववाडी, सलगरे, चाबुकस्वार—वाडी, खंडेराजुरी, डोंगरवाडी, कदमवाडी, गुंडेवाडी या गावांना अंतर्गत मार्गांनी जोडणाऱ्या रस्त्यांची तर बिकट अवस्था झाली आहे. मिरज पूर्व भाग आता पाण्यासोबत रस्त्यांसाठीही आक्रमक होत आहे. त्यातूनच या भागातील ग्रामस्थ आणि प्रवासी ‘कुठे गेले सुरेश खाडे?’ असा सवाल करत आहेत. (वार्ताहर)श्रेय घेण्यासाठी पुढेमिरज पूर्व भागातील मिरज ते बेडग या रस्त्यासाठी सहा कोटी, लिंगनूर ते खटावसाठी १.२० कोटी, सलगरे ते बेळंकी रस्त्यासाठी तीन कोटी व उर्वरित मिरज ते लिंगनूरमार्गे बेळंकी व मिरज ते सलगरेसाठी १७ कोटींचा निधी मंजूर असल्याचे पत्र शासनाकडून कॉँग्रेस कार्यकर्त्यांनी प्राप्त केले. मात्र या निधीची मंजुरी येताच श्रेय घेण्यासाठी भाजपचे आमदार सुरेश खाडेही पुढे आले. पाच वर्षांत अपयशी ठरलेल्या, मात्र आता श्रेयवादासाठी पुढे येणाऱ्या लोकप्रतिनिधींचे करायचे काय?, असा प्रश्न उपस्थित होत आहे.