शहरं
Join us  
Trending Stories
1
Uddhav Thackeray: विधानसभेची चूक पुन्हा करू नका, उद्धव ठाकरेंचा शाखाप्रमुखांना दम!
2
Air India Plane Crash: चित्रपट निर्माता बेपत्ता! विमान पडलेल्या ठिकाणाजवळ मोबाइलचं शेवटचं लोकेशन
3
₹१७०० घेऊन गाझियाबादवरून अमेरिकेला पोहोचले; आज झुकरबर्ग, सुंदर पिचाईंपेक्षाही अधिक आहे सॅलरी
4
विशेष लेख: हवाई सुरक्षेबाबत भारत इतका मागास का?
5
Ashish Shelar: गणेशोत्सव बंद होऊ देणार नाही, आशिष शेलार यांची ग्वाही; कोर्टात ३० जूनपर्यंत बाजू मांडणार!
6
लॅम्बोर्गिनी चलायी जाने हो...; राम कपूरने घरी आणली लक्झरियस कार, कोटींमध्ये आहे किंमत
7
लाईक्स आणि फॉलोअर्ससाठी आम्हाला त्रास का देता? विमानातल्या व्हायरल फोटोशी इन्फ्लुएन्सरकडून छेडछाड, कुटुंबियांचा संताप
8
Sharad Pawar: आगामी निवडणुकीत युतीबाबतचा निर्णय स्थानिक पातळीवर घेणार- शरद पवार
9
आजचा अग्रलेख: मध्य पूर्वेत पुन्हा आगडोंब!
10
मलायका अरोरा आणि अर्जुन कपूरचं झालं पॅचअप? या पोस्टनंतर चर्चेला उधाण
11
तुलाच पत्नी बनवेन! तरुणाने मृत प्रेयसीसोबत लग्न करून पूर्ण केलं वचन, नातेवाईक भावूक  
12
Matheran: माथेरानमधील तलावात नवी मुंबईचे तिघे बुडाले, एकाला वाचवण्यासाठी दोघांनी घेतल्या उड्या
13
आजचे राशीभविष्य - १६ जून २०२५, लाभदायी दिवस, व्यापार, व्यवसायात अपेक्षित यश मिळण्याची शक्यता
14
इस्रायल आणि इराणचे एकमेकांवरील हल्ले सुरूच, आतापर्यंत दोन्ही देशांचे किती नुकसान? जाणून घ्या
15
Kedarnath helicopter crash: पत्नीच्या ‘बर्थडे’साठी गेलेले यवतमाळचे कुटुंब केदारनाथला हेलिकॉप्टर अपघातात ठार
16
घ्या पैसे, करा पेरणी; राज्याचा कृषी कर्ज टक्का वाढला!
17
Pune Maval bridge collapses: कुंडमळाचा ३५ वर्षे जुना पूल कोसळला, इंद्रायणीत अनेक पर्यटक वाहून गेले, ५२ जणांना वाचविले 
18
विशेष लेख: महापालिकेचा कारभारही हायकोर्टानेच करायचा का..?
19
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
20
विशेष लेख: अकरावी प्रवेशात शिक्षण विभाग नापास!

Sangli: शासकीय कार्यालये भाड्याच्या जागेत; वर्षाला १६ लाख खर्च

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 9, 2024 17:41 IST

सांगली : शहरातील कृषी विभागाचे मृद सर्वेक्षण व मृद चाचणी कार्यालयासह राज्य उत्पादन शुल्कची चार कार्यालये भाड्याच्या घरात आहेत. ...

सांगली : शहरातील कृषी विभागाचे मृद सर्वेक्षण व मृद चाचणी कार्यालयासह राज्य उत्पादन शुल्कची चार कार्यालये भाड्याच्या घरात आहेत. त्यावर वर्षाकाठी नियमितपणे १६ लाख रुपये भाड्यापोटी भरावे लागतात. त्यामुळे या सर्व कार्यालयांना हक्काची जागा कधी मिळणार, याबाबत संभ्रमावस्था निर्माण झाली आहे.शासनाकडून एकीकडे हक्काच्या जागेत कार्यरत असणाऱ्या कार्यालयांच्या नूतनीकरणावर कोट्यवधी रुपयांचा खर्च केला जात आहे, तर भाड्याच्या घरात राहणाऱ्या कार्यालयांकडे जिल्हा प्रशासनासह शासनानेही दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे वर्षानुवर्षे भाड्याच्या खोलीत राहणाऱ्या शासकीय कार्यालयांसाठी जागा उपलब्ध करून देण्यास शासन अपयशी ठरत आल्याचे सिद्ध झाले आहे. याकडे प्रशासनासह लोकप्रतिनिधींनीही गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे.

..ही कार्यालये भाड्याच्या जागेतकार्यालय  - मासिक भाडेकृषी विभागाचे मृद सर्वेक्षण व मृद चाचणी - ३३,०००राज्य उत्पादन शुल्क - ५२,०००

दरवर्षी मोजतात १६ लाखजिल्ह्यातील बहुतांश शासकीय कार्यालयांना स्वत:ची जागा मिळाली आहे. पण, कृषी विभागाचे मृद सर्वेक्षण व मृद चाचणी, राज्य उत्पादन शुल्कची चार कार्यालये भाड्याच्या जागेत आहेत. या कार्यालयांचे वर्षाला १६ लाख रुपये भाडे खासगी मालकाला द्यावे लागत आहे.राज्य उत्पादन शुल्कची चार कार्यालये भाड्याच्या जागेतराज्य उत्पादन शुल्क विभागाची जिल्ह्यात सात कार्यालये आहेत. यापैकी चार कार्यालये भाड्याच्या जागेत असून, त्यांचे महिन्याला एक लाख रुपये भाडे द्यावे लागत आहे. शासनाच्या निधीतून दर महिन्याला भाडे दिले जात आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

शासन ठरताहेत अपयशीवर्षानुवर्षे भाड्याच्या खोलीत राहणाऱ्या सांगली, मिरज शासकीय कार्याल - यांसाठी जागा उपलब्ध करून देण्यास शासन अपयशी ठरत आल्याचे सिद्ध झाले आहे. लोकप्रतिनिधींचाही पाठपुरावा कमी पडत असल्याच्या नागरिकांमधून तक्रारी आहेत.

भाडे थकीत राहत नाहीकृषी आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाची कार्यालये भाड्याच्या जागेत आहेत. पण, महिन्याचे भाडे नियमित संबंधितांना देण्यात येत आहे. कधीही भाडे थकीत राहत नाही, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

टॅग्स :Sangliसांगली