शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात वाघांची डरकाळी केव्हा?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2019 00:47 IST

वारणावती : चांदोली, कोयना व दाजीपूर या अभयारण्याचा मिळून सह्याद्री व्याघ्र प्रकल्प अस्तित्वात आहे. दरवर्षी व्याघ्र प्रकल्पात गणना होते. ...

वारणावती : चांदोली, कोयना व दाजीपूर या अभयारण्याचा मिळून सह्याद्री व्याघ्र प्रकल्प अस्तित्वात आहे. दरवर्षी व्याघ्र प्रकल्पात गणना होते. पण, गणनेत वाघांचे अस्तित्व आढळून येत नाही. त्यामुळे व्याघ्र प्रकल्पात वाघच नसल्याचे स्पष्ट झाले आहे. ताडोबातील वाघांची डरकाळी येथे कधी घुमणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे.राज्यातील वाघांची संख्या ३१२ असली तरीही, सह्याद्रीच्या व्याघ्र प्रकल्पात वाघाचे अस्तित्व आहे का, असा सवाल उपस्थित होत आहे. २०१४ मध्ये महाराष्ट्रात १९० वाघ होते. आता २०१९ मध्ये वाघांची संख्या ३१२ आहे. स्थानिकांच्या सहभागातून वन विभागाने व्याघ्र संवर्धनासाठी जे प्रयत्न केले, त्याला यश आले आहे. वाघांच्या संख्येत अंदाजे ६५ टक्के वाढ झाल्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले. या आकड्यांनुसार व्याघ्र संवर्धनात महाराष्ट्र चौथ्या क्रमांकावर पोहोचला आहे. मात्र चांदोली, कोयना, दाजीपूर या तीनही अभयारण्य क्षेत्रात गेल्या चार वर्षांत एकाही वाघाचे अस्तित्व आढळून आले नाही. दरवर्षी व्याघ्र गणना करण्यात येते. पण वाघांचे अस्तित्व आढळून येत नाही, की मुद्दाम वन्यजीव विभाग माहिती देत नाही, हा प्रश्न आहे.व्याघ्र प्रकल्पाच्या क्षेत्रात स्थानिक सहभागातून वाघांचे संरक्षण आणि संवर्धन करण्यास वन विभागाने प्राधान्य दिले आहे. व्याघ्र प्रकल्पाच्या बफर क्षेत्रातील गावांचे वनावरील अवलंबन कमी व्हावे, मानव-वन्यजीव संघर्ष कमी व्हावा, या उद्देशाने ‘डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी जन वन विकास’ योजना राबविली जात आहे. यामध्ये समाविष्ट गावांमध्ये जन, जल, जमीन आणि जंगल याची उत्पादकता वाढविण्यासोबतच मानव वन्यजीव संघर्ष कमी करण्याच्या उद्देशाने प्रयत्न करण्यात येत आहेत. यामध्ये पायाभूत सुविधांसोबतच पर्यायी रोजगार संधी विकसित करून दिल्या जात आहेत.