शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
4
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
5
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
6
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
7
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
8
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
9
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
10
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
11
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
12
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
13
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
14
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
15
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
16
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
17
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
18
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
19
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
20
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

सदाभाऊंना संधी देताना भाजपाकडून विश्वासघात; माझ्या भानगडींची चौकशी करा - राजू शेट्टी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2017 02:22 IST

सदाभाऊ खोत यांना विधानपरिषदेवर संधी देताना भाजपाने विश्वासघात करून, त्यांच्या कोट्यातून अर्ज भरून घेतला, असा गौप्यस्फोट स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक खासदार राजू शेट्टी यांनी शनिवारी पत्रकारांशी बोलताना केला.

सांगली : सदाभाऊ खोत यांना विधानपरिषदेवर संधी देताना भाजपाने विश्वासघात करून, त्यांच्या कोट्यातून अर्ज भरून घेतला, असा गौप्यस्फोट स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक खासदार राजू शेट्टी यांनी शनिवारी पत्रकारांशी बोलताना केला. स्वाभिमानी शेतकरी संघटना सोबत नसती, तर सदाभाऊ, तुम्हाला भाजपने विधानपरिषद आणि मंत्रिपदावर तरी ठेवले असते का? असा सवालही शेट्टी यांनी केला.कृषी राज्यमंत्री खोत यांनी शुक्रवारी शेट्टींवर जोरदार टीका केली होती. त्या आरोपांचा शेट्टी यांनी समाचार घेतला.शेट्टी म्हणाले की, लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपाबरोबर आघाडी करताना, स्वाभिमानी शेतकरी संघटनेला विधानपरिषदेची एक जागा आणि एक मंत्रिपद देण्याचे मान्य करण्यात आले होते. त्यानुसार, विधानपरिषदेसाठी आम्ही खोत यांच्या नावाची शिफारस केली. मात्र, विधानपरिषदेचा अर्ज भरताना भाजपाच्या नेत्यांनी विश्वासघात करून, भाजपाच्या चिन्हावर त्यांचा अर्ज भरून घेतला. त्यामुळेच सदाभाऊ सध्या डरकाळी फोडत आहेत. मंत्रिपदासाठी शेतकºयांचा तरी विश्वासघात करू नका. तुमच्याकडे थोडा जरी सन्मान असेल, तर संघटनेच्या जोरावर मिळविलेल्या मंत्रिपदावरून दूर व्हा. पुन्हा खुशाल मंत्री झाल्यास आमचा त्याला काहीच आक्षेप नसेल.माझ्या भानगडींची चौकशी करामाझा जन्मच शेतकरी कुटुंबात झाला आणि लहानाचा मोठाही शेतकरी चळवळीतच झालो. मी जर भानगडी, साखर सम्राटांबरोबर दलाली आणि संघटनेचा राजकीय ‘व्यवसाय’ केला असता, तर जिल्हा परिषद ते खासदार पदापर्यंत शेतकºयांनी मला कधीच संधी दिली नसती. शेतकºयांशी गद्दारी करणे आमच्या रक्तातच नाही. तरीही तुम्ही म्हणत असाल, तर भानगडींची सीआयडी चौकशी करून मला तुरुंगात टाका, असे आव्हान खा.शेट्टी यांनी सदाभाऊंना दिले.