शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

सांगली शहरात बेशिस्त पार्किंगला शिस्त केव्हा?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2019 15:17 IST

सांगली शहरात वाढत्या वाहन संख्येमुळे पार्किंगची समस्या दिवसेंदिवस गंभीर बनत चालली आहे. पार्किंग सुविधा उपलब्ध करून देण्यात महापालिका व वाहतूक पोलिसांनाही अपयश आले आहे. सांगली शहराची वाढती वाहनसंख्या पाहता, केवळ बाजारपेठेच्या ठिकाणीच चार वाहनतळ आहेत. गेल्या सोळा वर्षांत नव्याने एकही वाहनतळ विकसित होऊ शकलेले नाही. त्यात रस्त्यावरील अतिक्रमणांमुळे वाहनांची कोंडीही होत आहे.

ठळक मुद्देसांगली शहरात बेशिस्त पार्किंगला शिस्त केव्हा?रस्त्यावरील अतिक्रमणांमुळे वाहनांची कोंडी

सांगली : शहरात वाढत्या वाहन संख्येमुळे पार्किंगची समस्या दिवसेंदिवस गंभीर बनत चालली आहे. पार्किंग सुविधा उपलब्ध करून देण्यात महापालिका व वाहतूक पोलिसांनाही अपयश आले आहे. सांगली शहराची वाढती वाहनसंख्या पाहता, केवळ बाजारपेठेच्या ठिकाणीच चार वाहनतळ आहेत. गेल्या सोळा वर्षांत नव्याने एकही वाहनतळ विकसित होऊ शकलेले नाही. त्यात रस्त्यावरील अतिक्रमणांमुळे वाहनांची कोंडीही होत आहे.शहरात सुमारे दीड लाखांहून अधिक दुचाकी व चारचाकी वाहने आहेत. प्रत्येक कुटुंबामागे किमान एक तरी वाहन आहे. त्यात घरात वाहन पार्क करण्यासाठी जागाच उपलब्ध नाही. त्यामुळे बहुतांश ठिकाणी रस्त्याच्या कडेलाच वाहने पार्क केली जात आहेत. सर्वात बिकट अवस्था मुख्य बाजारपेठ असलेल्या गणपती पेठ, कापडपेठ, मारुती रोड, हरभट रोडवर दिसून येते. या परिसरात शाळा क्रमांक एक, आनंद चित्रमंदिर, जयश्री टॉकीज अशी वाहनतळे आहेत. त्यापैकी शाळा क्रमांक एकनजीकच वाहनांची गर्दी दिसून येते. अन्य ठिकाणी रस्त्यावर वाहने पार्क केली जातात.मारुती रोड तर नेहमीच गजबजलेला असतो. या रस्त्यावर वाहन पार्क करण्यासाठीही जागा उपलब्ध नाही. शहरातील शासकीय रुग्णालय, डॉ. बाबासाहेब आंबेडकर रोड, चांदणी चौक, विश्रामबाग चौक, काँग्रेस भवन या भागात वाहनतळच नाही. विश्रामबाग चौकात तर बेशिस्तपणे वाहने लावली जातात. शहरातील सर्वच प्रमुख रस्त्यांवर विक्रेते, हातगाडीचालकांनी अतिक्रमण केले आहे. त्यामुळे बहुतांश रस्ते अरुंद झाले आहेत. त्यात वाहने रस्त्यावर आल्याने वाहतुकीची कोंडी होत आहे.

शासकीय रुग्णालय चौकात तर नेहमीच वाहनांची गर्दी असते. जिल्हाधिकारी निवासस्थानासमोरील बाजू, इंदिरा भवन चौकात मोठ्या इमारती उभ्या राहिल्या आहेत. या इमारतींसमोरच वाहने पार्क केली जातात. वाहनतळाची सुविधा नसल्याने नागरिकांनाही वाहन पार्क करण्यासाठी मोकळी जागा शोधावी लागते. त्यातच कारवाईचा बडगा उगारला जात असल्याने पुन्हा नागरिकांना आर्थिक भुर्दंडही सहन करावा लागतो. या साऱ्या प्रकारांमुळे वाहनधारकांत असंतोष वाढला आहे.

टॅग्स :Trafficवाहतूक कोंडीSangliसांगली