शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
2
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
3
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
4
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
5
Rohit Sharma Injury : मुंबई इंडियन्ससाठी वाजली धोक्याची घंटा; रोहित शर्मा पुढच्या सामन्याला मुकणार?
6
Latest Marathi News LIVE: होर्मुझ सामुद्रधुनीचा पेच, तणाव वाढला; ४० देशांची होणार बैठक, ब्रिटन-फ्रान्सने घेतला पुढाकार
7
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
8
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
9
"काही लोकांना ४ लग्नांची सूट, भाजप सत्तेत आल्यास...";  अमित शाह यांनी बंगालमध्ये सभा गाजवली, स्पष्टच बोलले
10
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
11
सीलिंग फॅन की टेबल फॅन? वीज बिल वाचवण्यासाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? खरेदीपूर्वी नक्की वाचा
12
"US-इराणमध्ये तयार होता अंतिम करार; शेवटच्या क्षणी आला एक कॉल अन् २१ तासांची चर्चा फिस्कटली"
13
श्रीलंकेत भारताची मोठी खेळी; खरेदी केली मोठी शिपबिल्डिंग कंपनी, चीन पाहतच राहिला
14
आशा भोसलेंची नात जनाईला धीर द्यायला पोहोचला 'मानलेला भाऊ' मोहम्मद सिराज, पाहा VIDEO
15
Garud Puran: गरुड पुराणानुसार मृत्यूपूर्वी मिळतात 'हे' रहस्यमयी संकेत; अखेरच्या काळात नेमकं काय घडतं?
16
MPSC भरती प्रक्रियेत मोठा बदल; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ७ महत्त्वाचे निर्णय, जाणून घ्या
17
आले कधी अन् गेले कधी, समजलंच नाही! आयपीएलमध्ये सर्वात कमी धावसंख्येवर ऑलआउट झालेले संघ
18
८ व्या वेतन आयोगाची बंपर भरती; १.८० लाख रुपये महिना पगार, जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
19
पत्नीला काम सांगायचे म्हणून मुलाने केला पित्याचा खून; गडचिरोलीतील धक्कादायक घटना
20
Kalyan Accident: कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
Daily Top 2Weekly Top 5

सत्ताधारी भाजपचे आमदार, खासदार झंोपलेत काय?

By admin | Updated: June 13, 2016 00:07 IST

प्रतीक पाटील : सिंचन कार्यालय स्थलांतरित होणे ही नाचक्की

सांगली : कृष्णा-कोयना उपसा सिंचन मंडल कार्यालय बंद करून, ते यवतमाळ येथे स्थलांतरित करण्यात येणार असताना, सांगली जिल्ह्यातील सत्ताधारी भाजपचे आमदार, खासदार झोपलेत का?, असा सवाल माजी केंद्रीय राज्यमंत्री प्रतीक पाटील यांनी रविवारी पत्रकार परिषदेत उपस्थित केला. ते म्हणाले की, जिल्ह्यातील दुष्काळी भागाला कृष्णेच्या पाण्याचे जीवनदायी वरदान मिळावे, म्हणून वसंतदादा पाटील यांनी या योजनेची निर्मिती केली होती. दुष्काळी भागासाठी वाढलेले मोकळे ताटही आता भाजप सरकारने काढून घेतले आहे. जिल्ह्याच्या दुष्काळी भागाच्या योजना कायमस्वरुपी बंद करून केवळ विदर्भासाठी सिंचनाचे कार्यक्रम राबविण्याचा कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. त्याचाच एक भाग म्हणून सिंचन योजनांची कार्यालयेच आता स्थलांतरित केली जात आहेत. म्हैसाळ, टेंभू योजना अद्याप अपूर्ण आहेत. या योजनांना अपेक्षित निधी देण्याचे सोडून सरकार या योजनाच गुंडाळत आहे. अशा परिस्थितीत दुष्काळी पे्रमाचा आव आणणारे सत्ताधारी आमदार, खासदार गप्प का आहेत? त्यांनी याप्रश्नी लक्ष घालून हा निर्णय हाणून पाडावा, अन्यथा ‘आमच्याकडून काहीही होणार नाही’, असे त्यांनी जाहीर करावे. आम्ही या प्रश्नावर आंदोलन करून सरकारला जेरीस आणू. केंद्र शासनाच्या वेगवर्धित सिंचन लाभ कार्यक्रमांतर्गत (एआयबीपी) जिल्ह्यातील सिंचन योजनांसाठी मोठा निधी मंजूर झाला होता. खासदारांच्या दुर्लक्षामुळे योजनेचा पैसा मिळाला नाही. अन्य कोणत्याही योजनेतून निधी आणण्याचा प्रयत्नही त्यांनी केला नाही. निधी नसल्याने आता योजना अपूर्ण अवस्थेत आहेत. निधी आणण्याचे महत्त्वाचे काम त्यांनी करायचे सोडून शासनाच्या प्रत्येक कृतीवर गप्प बसण्याची भूमिका स्वीकारली आहे. म्हैसाळ योजनेमधून १ लाख ९ हजार हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणे आवश्यक असताना, अपूर्ण कामामुळे ४९ हजार हेक्टर क्षेत्र ओलिताखली आले आहे. कवठेमहांकाळ, जत, सोलापूर, मंगळवेढा परिसरातील सर्व कामे अपूर्ण आहेत. ‘ताकारी’साठी शासनाकडून ६00 कोटी निधी अपेक्षित आहे. या योजनेतून २७ हजार हेक्टर क्षेत्र ओलिताखाली यायला हवे होते. अपुऱ्या कामांमुळे केवळ १६ हजार हेक्टर क्षेत्र ओलिताखाली आले आहे, असे ते म्हणाले. (प्रतिनिधी)नेत्यांची हतबलता : आंदोलन उभारणारराज्यातील सिंचन योजनांच्या स्थलांतराबाबत इतका महत्त्वाचा निर्णय झाला तरी, भाजपचे आमदार, खासदार काहीही प्रतिक्रिया देण्यास तयार नाहीत. इतके ते हतबल का आहेत? त्यांनी त्यांची हतबलता जाहीर करावी आणि आमच्या आंदोलनात सहभागी व्हावे, असे आवाहन प्रतीक पाटील यांनी यावेळी केले.