शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

‘जिल्हा नियोजन’च्या शिल्लक निधी खर्चाचे ‘नियोजन’ काय?, हात आखडता घेणाऱ्या विभागावर लक्ष 

By शरद जाधव | Updated: April 10, 2023 13:51 IST

निधी परत न जाण्यासाठी प्राधान्य

शरद जाधव सांगली : प्रशासनाची चांगलीच धाकधूक वाढविणारे यंदाचे आर्थिक वर्ष संपले आणि शासकीय विभागांनी सुटकेचा निश्वास सोडला. रात्री उशिरापर्यंत थांबून तयार केलेले प्रस्ताव आणि त्यानुसार वळते झालेल्या निधीवर आता उड्या पडणार आहेत. मात्र, अनेक शासकीय विभागाला मंजूर झालेल्या निधीच्या खर्चाचा हिस्सा मार्च एन्डनंतरही कायम असल्याने या शिल्लक निधीच्या खर्चाचे नियोजन काय असणार याकडे आता लक्ष असणार आहे.

जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून जिल्ह्यातील विकासकामांना निधीची तरतूद होते. यासाठी नियोजन समितीची सभा आणि पालकमंत्र्यांची भूमिका महत्त्वपूर्ण असते. यावर्षी पालकमंत्री सुरेश खाडे यांनी शासनाकडून जादा निधी मिळवून आणत दुर्लक्षित विभागाला न्याय देण्याचा प्रयत्न केला असलातरी निधी उपलब्ध असून खर्चात हात आखडता घेणाऱ्या विभागावर आता लक्ष असणार आहे.

निधी परत न जाण्यासाठी प्राधान्यशासनाकडून उपलब्ध निधीचा विनियोग न केल्यास तो निधी परत शासनाकडे जाण्याची शक्यता असते. यासाठी मार्च महिन्यात नियोजन पूर्ण करण्यात येते. संपूर्ण महिन्यात जिल्हा प्रशासनाकडून वारंवार आढावा घेऊन विनियोगाच्या सूचना दिल्या जातात. त्यामुळे आता शिल्लक निधी परत जाणार नाही याचे नियोजनही करावे लागणार आहे.

४१६ कोटींचा प्रारूप आराखडा

जिल्हा वार्षिक योजनेतून यंदा सर्वसाधारण क्षेत्रासाठी ३३१ कोटी ८२ लाख रुपये, अनुसूचित जाती घटकांसाठी ८३ कोटी ८१ लाख रुपये व आदिवासी घटक कार्यक्रमाकरिता एक कोटी एक लाख रुपये असे एकूण ४१६ कोटी ६४ लाख रुपयांचा आराखडा मंजूर होता. त्यात ११२ कोटी ८४ लाख रुपये वाढीव निधी पालकमंत्र्यांनी मिळवला होता.

...या कामांना मिळणार गतीजिल्हा वार्षिक योजनेतून स्मार्ट प्राथमिक आरोग्य केंद्र उपक्रमास विशेष प्राधान्य मिळणार आहे. यासाठी ३९ कोटी ६५ लाखांची तरतूद करण्यात आली आहे. यासह मिरज शासकीय रुग्णालयात एमआरआय यंत्रणा, लम्पी आजार उपाययोजनेसाठीही निधी मिळाला आहे. जिल्हा परिषद शाळांसाठीही याद्वारे गती मिळणार आहे.

शंभर टक्के निधी खर्च न करणाऱ्यांचे काय?

अनेक शासकीय विभागांना चांगला निधी मिळत असलातरी, पूर्ण निधीचा वापर केला जात नाही. त्यामुळे निधी खर्च न करणाऱ्या विभागांबाबत पालकमंत्री काय निर्णय घेणार? हेही पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. पालकमंत्री, जिल्हाधिकाऱ्यांनी वारंवार सूचना करूनही अद्याप अनेक विभाग निरंकच आहेत.

टॅग्स :Sangliसांगली