शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

खासदारांच्या मौनात दडलंय काय? तासगावची पार्श्वभूमी : वरिष्ठ नेत्यांवर नाराजीचा सूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2018 01:10 IST

तासगाव : तासगावातील राजकीय हाणामारीच्या घटनेने शहरातील भाजपच्या बिनीच्या शिलेदारांना तासगावातून पसार व्हावे लागले, तर काहींना तुरुंगात बसावे लागले

दत्ता पाटील ।तासगाव : तासगावातील राजकीय हाणामारीच्या घटनेने शहरातील भाजपच्या बिनीच्या शिलेदारांना तासगावातून पसार व्हावे लागले, तर काहींना तुरुंगात बसावे लागले राष्ट्रवादीने निमित्त साधून खासदारांवर हल्लाबोल केला. एकीकडून राजकीय टीकास्त्र, दुसरीकडून पोलिसी कारवाईचा ससेमिरा, यामुळे भाजपच्या कार्यकर्त्यांत अस्वस्थता आहे. वरिष्ठ पातळीवरून मदत न मिळाल्याने बड्या मंत्र्यांंविरोधात नाराजीच सुरु आहे. हे होत अ सताना खासदार संजयकाका पाटील यांनी अद्याप कोणतीही प्रतिक्रिया व्यक्त केलेली नाही. त्यामुळे खासदारांच्या मौनात दडलंय काय? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

तासगाव तालुक्यात भाजप आणि राष्टÑवादीच्या कार्यकर्त्यांत नगरपालिका पोटनिवडणुकीच्या निमित्ताने जोरदार हाणामारी झाली. वास्तविक या घटनेची सुरुवात झाली, तेव्हा कोणतीही राजकीय किनार नव्हती. एका चौकात काही तरुण टोळके करुन बसतात, अशी तक्रार आल्यानंतर भाजपचे काही पदाधिकारी, टोळके करुन बसू नका, असे सांगण्यास गेले होते. मात्र ही घटना पुढे वाढत गेली. पुढे पोलिसांनाच मारहाण होईपर्यंत हे प्रकरण वाढेल, असे कोणालाच वाटले नव्हते. मात्र अनपेक्षितपणे पोलिसांवर हल्ला झाला आणि भाजपविरुध्द राष्टÑवादीच्या मारहाण प्रकरणाला कलाटणी मिळाली.भाजपचे माजी नगराध्यक्ष बाबासाहेब पाटील यांच्यासह अन्य दोन कार्यकर्ते तुरुंगात गेले. नगरसेवक अनिल कुत्ते, सचिन गुजर, जाफर मुजावर यांच्यासह अनेक बिनीचे पदाधिकारी तासगावबाहेर गेले आहेत. पोलिसी कारवाईचा ससेमिरा अद्यापही त्यांच्या मागे आहे. अटकेची टांगती तलवार या पदाधिकाऱ्यांवर कायम आहे.

नेतृत्व करणारे प्रमुख पदाधिकारीच शहराबाहेर गेल्यामुळे, शहरातील सामान्य कार्यकर्ता सैरभैर झाला आहे. अनपेक्षितपणे झालेल्या पोलिसी कारवाईमुळे कार्यकर्ते अस्वस्थ आहेत. कारवाई टाळण्यासाठी हालचाली सुरु आहेत. मात्र त्याला अपेक्षित यश मिळताना दिसून येत नाही.

कारवाई टाळण्यासाठी पोलीस प्रमुखांच्या बदलीची मागणी ऐरणीवर आली. मात्र गृहखातेच मुख्यमंत्र्यांच्या ताब्यात असल्याने आंदोलनाला धार देता आली नाही. इकडे आड आणि तिकडे विहीर अशा अवस्थेत भाजपच्या कार्यकर्त्यांची घुसमट सुरु असल्याचे चित्र आहे. शासनपातळीवर अपेक्षित दखल घेतली गेली नसल्याने, शहरातील काकाप्रेमी कार्यकर्त्यांत नाराजीचा सूर वाढत आहे.

पोलिसांवर झालेल्या हल्ल्याची राजकीय संधी साधत, राष्टÑवादीच्या राज्यातील नेत्यांनी खासदार संजयकाकांवर निशाणा साधला. किंंबहुना गृहखात्यावर टीकेची झोड उठवून मुख्यमंत्र्यांनाही टार्गेट करण्याचा प्रयत्न झाला. शहरातील भाजपच्या पहिल्या फळीतील पदाधिकाºयांंंवर या घटनेमुळे शहर सोडून जाण्याची नामुष्की आली आहे. पालिकेपासून राज्यापर्यंत सर्व सत्तास्थाने भाजपच्या हातात असूनदेखील पक्षीय पातळीवरुन मदतीसाठी अद्याप कोणीच पुढाकार घेतला नाही. याउलट भाजपच्या एका बड्या मंत्र्यामुळेच अडचणीत भर पडल्याची भावना कार्यकर्त्यांच्या मनात सलत आहे. हे सर्व होत असताना खासदार संजयकाका पाटील यांनी अद्याप कोणतीही जाहीर प्रतिक्रिया दिलेली नाही. खासदारांच्या मौनात काय दडले आहे? याची उत्सुकता कार्यकर्त्यांना आहे.कार्यकर्त्यांवर गुन्हेनिवडणुकीच्या निमित्ताने हाणामारी झाली. सुरुवातीला किरकोळ वाटणारी ही घटना टोकाला गेली, नव्हे तर नेत्यांच्याही हाताबाहेर गेली. पोलिसांकडून कोणाचाही मुलाहिजा न ठेवता दोन्ही पक्षांच्या शेकडो कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल झाले.

टॅग्स :PoliticsराजकारणSangliसांगली