शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
2
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
4
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
5
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
6
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
7
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
8
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
9
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
10
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
11
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
12
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
13
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
14
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
15
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
16
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
17
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
18
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
19
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
20
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
Daily Top 2Weekly Top 5

आठवडे बाजार बंदीविरोधात प्रतिकात्मक भाजी विक्री आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2021 19:02 IST

CoronaVirus Market Sangli- आठवडे बाजार बंदीविरोधात विश्रामबाग येथील आठवडा बाजारात प्रतिकात्मक भाजी विक्री करीत भाजीपाला विक्रेत्यांनी शिमगा आंदोलन केले.

ठळक मुद्देआठवडे बाजार बंदीविरोधात प्रतिकात्मक भाजी विक्री आंदोलन

सुरेंद्र दुपटे

संजयनगर/सांगली : आठवडे बाजार बंदीविरोधात विश्रामबाग येथील आठवडा बाजारात प्रतिकात्मक भाजी विक्री करीत भाजीपाला विक्रेत्यांनी शिमगा आंदोलन केले.भाजीपाला विक्रेत्यांनी सोशल डिस्टंसिंगचे पालन करत आठवडे बाजार बंदीविरोधात आपल्यावर केलेल्या अन्यायाचा निषेध म्हणून शिमगा आंदोलन केले. जनसेवा भाजीपाला संघटनेचे अध्यक्ष शंभूराज काटकर, उपाध्यक्ष कैस अलगुर, कार्याध्यक्ष इलियास पखाली, सचिव अजित राजोबा, लताताई पाटील, लताताई दुधाळ, प्रशांत शिकलगार, शंकर चांदकवठे आणि इतर संचालकांच्या नेतृत्वाखाली शेकडो भाजीपाला विक्रेत्यांनी या आंदोलनात भाग घेतला. 

सर्व भाजीपाला विक्रेते विश्रामबाग बाजारातील आपापल्या जागेवर पथारी पसरून बसून होते. समोर भाजीपाला न घेता दोन विक्रेत्यांमध्ये अंतर राखून बसल्या जागीच मास्क परिधान केलेल्या विक्रेत्यांनी शंखध्वनी करून आठवडा बाजार बंदचा निर्णय मागे घेण्याची मागणी केली. यावेळी त्यांनी आसपासचा कचरा आणि जळण गोळा करून होळी करत आठवडे बाजार बंदीविरोधात निषेध केला. 

शंभूराज काटकर म्हणाले, शहरातील सर्व मॉल सुरू आहेत, ठराविक बाजार सुरू ठेवले आहेत. आठवडा बाजार तेवढेच बंद केल्याने संपूर्ण शहरातील ग्राहक सांगलीत गर्दी करू लागले आहेत. प्रशासनाचा गर्दी कमी करण्याचा हेतू त्यामुळे फसला आहे.  विज बिल, पाणीपट्टी, घरपट्टी यासाठी यंत्रणा तगादा लावत असताना बेरोजगार भाजीपाला विक्रेता जगणार कसा आणि  देनी भागवणार कसा असा प्रश्न निर्माण झाला आहे.

मोकळ्या रस्त्यावर सरकारचे सगळे नियम पाळून आमचे भाजीपाला व्यापारी आज केवळ पथारी टाकून भाजी न घेता दोन विक्रेत्यांमध्ये अंतर राखून बसून राहिले. बाजार ही संपूर्ण शहराची गरज आहे. सर्व बाजार नियम पाळून सुरू ठेवणे शक्य आहे. गर्दी न होता आणि लोकांना कोणताही त्रास न होता आम्ही हे घडवून दाखवू शकतो हे प्रशासनाला सांगितले आहे. ते सांगतील त्या बाजारात आम्ही प्रात्यक्षिक घडवू शकतो. मात्र त्यासाठी बंदी निर्णय मागे घेण्याची आवश्यकता आहे. या धोरणाने भाजीपाला विक्रेत्यांना शिमगा करावा लागणार आहे याची जाणीव व्हावी म्हणून आज जनसेवा भाजीपाला विक्रेता संघटनेने शिमगा आंदोलन केले. प्रशासनाने आपली भूमिका बदलावी अशी आम्ही मागणी करत आहोत,- शंभूराज काटकर, जनसेवा भाजीपाला विक्रेता संघटना, विश्रामबाग.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याSangliसांगलीMarketबाजार