शहरं
Join us  
Trending Stories
1
“जीवनात ही घडी अशीच राहू दे”; फोटो शेअर करत बाळा नांदगावकरांची पांडुरंगाकडे प्रार्थना
2
मनातलं सगळंच सांगितलं; प्रताप सरनाईकांचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ३ पानी खुलं पत्र
3
“एकाचं भाषण अपूर्ण अन् दुसऱ्याचं अप्रासंगिक, तर पूर्ण कार्यक्रम अवास्तव”; भाजपाची टीका
4
आधी कॅब चालकांची करायचे हत्या, दऱ्यांमध्ये फेकायचे मृतदेह; सीरियल किलरला अखेर अटक
5
शेतकऱ्यांसाठी खुशखबर! पीएम किसानचा २०वा हप्ता 'या' दिवशी खात्यात येणार? आत्ताच यादी तपासा!
6
राज्यात सुरू असलेल्या भाषा वादावर बाबा रामदेव यांची पहिली प्रतिक्रिया, स्पष्टच बोलले; दिला असा सल्ला
7
सोलापूर : 'तुझ्यामुळेच माझी बायको...'; सावत्र दिराने भावजयीच्या मानेवर कुऱ्हाडीने केला वार, जागेवरच गेला जीव
8
“विठ्ठला...! सरकारला कर्जमाफी देण्याची सद्बुद्धी दे...”; आषाढी एकादशीला बच्चू कडूंची पोस्ट
9
हाफिज सईद आणि मसूद अजहर भारताकडे सोपवू, पण...; बिलावल भुट्टो यांची 'ती' मागणी काय?
10
ENG vs IND : इंग्लंड टेस्ट मॅच ड्रॉ करण्यासाठी खेळणार? कोच म्हणाला, आम्ही एवढेही मूर्ख नाही की,...
11
'देशात गरीब वाढत चाललेत आणि काही श्रीमंताच्या हातात संपत्ती चाललीये'; नितीन गडकरींनी व्यक्त केली चिंता
12
"२० कोटी दिले तरी ...", बिग बॉस १९ मध्ये सहभागी होण्याच्या चर्चांवर राम कपूरने सोडलं मौन
13
ज्या घटनेमुळे बापाने केली हत्या, त्यात आईचा होता सहभाग; कोल्हापुरातील प्रकरणात काय आले समोर?
14
BRICS शिखर परिषदेसाठी PM मोदी ब्राझीलमध्ये दाखल; भारताला काय फायदा? जाणून घ्या...
15
भारतीय चलनी नोटांवर फक्त महात्मा गांधीजींचेच चित्र का? आरबीआयने स्वतःच सांगितले कारण
16
2028 च्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीत उतरणार 'America Party'? इलॉन मस्क यांनी वेगळीच हिंट दिली!
17
संपत्तीवरून वाद झाला, काकीनेच पुतण्याचा गेम केला! तरुणाचा दुर्दैवी मृत्यू 
18
अमेरिकेचा मोठा निर्णय! १ ऑगस्टपासून १०० देशांवर लादणार नवीन शुल्क, भारतावर काय परिणाम?
19
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते वडाळा येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात पूजा
20
Tata च्या Harrier EV ला ग्राहकांचा प्रचंड प्रतिसाद; काही तासांत हजारो युनिट्सची विक्री...

वेबसाईट हँगने कामे खोळंबली

By admin | Updated: December 16, 2014 23:46 IST

तीन कोटींची कामे ठप्प : ई-निविदेचा असाही फटका

सांगली : पाच लाखांवरील कामे करण्यासाठी ई-निविदाची शासनाने सक्ती केली आहे. त्यानुसार जिल्हा परिषद बांधकाम विभागाने सुमारे तीन कोटींच्या ५० कामाची ई-निविदेसाठी नोटीस काढली होती. ठेकेदारांनीही निविदेसाठीचे पैसे भरून शासनाच्या वेबसाईटवर ई-निविदा भरण्याचा प्रयत्न केला; परंतु, वेबसाईट हँग होत असल्यामुळे वीस दिवसांत एकही निविदा भरली नसल्यामुळे अंगणवाडी, आरोग्य विभागासह ५० कामे कधी पूर्ण होणार, असा प्रश्न उपस्थित करून जिल्हा परिषद बांधकाम समितीच्या सभेत सदस्यांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरले. पण, अधिकाऱ्यांनी ही आमची चूक नसून, वेबसाईटमधील तांत्रिक दोष असल्याचे सांगितले. तसेच याबद्दल शासन आणि संबंधितांना सूचना देण्याचे अधिकाऱ्यांनी आश्वासन दिले.सभापती गजानन कोठावळे यांच्या अध्यक्षतेखाली जि. प. बांधकाम समितीची बैठक झाली. या बैठकीत शासनाच्या ई-निविदा प्रक्रियेच्या सावळ्या गोंधळावरून सदस्य चांगलेच आक्रमक झाले होते. निधी असूनही केवळ निविदा प्रक्रियेतील तांत्रिक त्रुटीमुळे विकास कामे खोळंबत असतील, तर या यंत्रणेचा उपयोग काय, असा सवाल उपस्थित करून सदस्यांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरले. यावेळी कार्यकारी अभियंता पृथ्वीराज चव्हाण यांनी नियमानुसार वीस दिवसांपूर्वीच ५० कामांची नोटीस काढली आहे. निविदा दाखल न झाल्यामुळे दोनवेळा नोटीस काढूनही निविदा दाखल झाल्या नाहीत. यावेळी वेबसाईटमधील तांत्रिक अडचणी समोर आल्या आहेत. संबंधित यंत्रणेकडे या त्रुटीबद्दल कल्पना दिली असून, लवकर त्या दूर होतील, असे आश्वासन दिले.बैठकीस जिल्हा परिषद सदस्य रणजित पाटील, संजीवकुमार सावंत, मोहिते आदींसह अधिकारी उपस्थित होते. दरम्यान, ई-निविदेची कामे ठप्प झाल्याने ठेकेदारांकडून नाराजी व्यक्त होत आहे. ई-निविदा प्रक्रिया लवकर सुरु करण्याची मागणी करण्यात येत आहे. (प्रतिनिधी)रस्ता खुदाई करणाऱ्यांवर फौजदारी : कोठावळेजिल्हा परिषदेकडील रस्त्यांची खुदाई करून शेतकरी पाईपलाईन टाकत आहेत. यामुळे रस्त्यांचे मोठ्याप्रमाणात नुकसान होऊनही त्यांच्याकडून भरपाई भरून घेतली जात नाही. काही अधिकारी तडजोडी करून हे प्रकरण दाबत असल्याचा आरोप सदस्यांनी केला. यावेळी सभापती गजानन कोठावळे यांनी यापुढे विनापरवाना रस्ते खुदाई करणाऱ्यांवर फौजदारी कारवाई करण्यात येईल, असा इशारा दिला. तसेच रस्ते खुदाईकडे दुर्लक्ष करणाऱ्या अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.