शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
4
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
5
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
6
शालेय सहलींनी भरली एसटीची तिजोरी, मिळाले तब्बल १२७ कोटी रुपयांचे उत्पन्न
7
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
8
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
9
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
10
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
11
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
12
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
13
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
14
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
15
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
16
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
17
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
18
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
19
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
20
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
Daily Top 2Weekly Top 5

यंदा कृष्णाकाठावरुनच मायाक्का देवीच्या नावानं चांगभलं

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2021 17:50 IST

Religious Places Sangli Coronavirus- चिंचली (ता. रायबाग ) येथील मायाक्का देवीची यात्रा रद्द झाल्याने महाराष्ट्रातील शेकडो यात्रेकरु बैलगाडीतून परतीच्या मार्गावर निघाले आहेत. यात्रेसाठी चिंचली परिसरात ठिय्या मारलेल्या भाविकांना कर्नाटक पोलीस हाकलून लावत आहेत. नव्याने भाविक येऊ नयेत यासाठी महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवर नाकेबंदी करण्यात आली आहे.

ठळक मुद्देचिंचलीला निघालेल्या बैलगाड्या यात्रा रद्द झाल्याने परतीच्या मार्गावरयंदा कृष्णाकाठावरुनच मायाक्का देवीच्या नावानं चांगभलं

सांगली : चिंचली (ता. रायबाग ) येथील मायाक्का देवीची यात्रा रद्द झाल्याने महाराष्ट्रातील शेकडो यात्रेकरु बैलगाडीतून परतीच्या मार्गावर निघाले आहेत. यात्रेसाठी चिंचली परिसरात ठिय्या मारलेल्या भाविकांना कर्नाटक पोलीस हाकलून लावत आहेत. नव्याने भाविक येऊ नयेत यासाठी महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवर नाकेबंदी करण्यात आली आहे.चिंचलीची मायाक्का देवीची प्रसिद्ध यात्रा २६ फेब्रुवारीपासून नियोजित होती. करोनाबाधितांची संख्या कमी झाल्याने यात्रा भरविण्याचा निर्णय देवस्थान समिती व बेळगाव जिल्हा प्रशासनाने घेतला होता. तशा जाहिरातीही प्रसिद्ध केल्या होत्या. त्यानुसार यात्रा ७ मार्चपर्यंत चालणार होती. यात्रेचा मुख्य दिवस मंगळवारी (ता. २ ) होता. यादिवशी पालखीसोहळा नियोजित होता.

गेल्या पंधरवड्यात महाराष्ट्रात ठिकठिकाणी कोरोना रुग्ण नव्याने सापडू लागल्याने यात्रेचा फेरविचार करावा लागला. चिंचलीला महाराष्ट्रातून लाखो भाविक येतात, हे लक्षात घेऊन यात्रा रद्द करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला. याजत्रेतील नित्योपचार पुजार्यांच्या, विश्वस्तांच्या व मानकर्याच्या उपस्थितीतच केले जाणार आहेत.या पार्श्वभूमीवर यात्रेला निघालेल्या भाविकांना रस्त्यातूनच परतवून लावले जात आहे. चिंचली गावात भाविकांना प्रवेश बंद करण्यात आला आहे. कागवाड-म्हैसाळदरम्यानच्या चेकपोस्टवर यात्रेकरुंच्या बैलगाड्या अडवल्या जात आहेत. कुडची येथे कृष्णा नदीकाठी मोठ्या संख्येने भाविक ठिय्या मारुन आहेत. पोलीसांनी त्यांनाही हाकलून लावले.

काही श्रद्धाळूंनी नदीकाठीच नैवेद्य बनवून तेथून दुसर्या तिरावर देवीला अर्पण केला व दर्शनाचे समाधान मानून घेतले. उगारमध्येही अथणीकडून येणार्या भाविकांची परत पाठवणी केली जात आहे. कागवाड सीमेवर प्रवाशांची कडक तपासणी करुन कर्नाटकात प्रवेश दिला जात आहे.चिंचलीमध्ये रायबाग रस्त्यावरल ओढ्याच्या परिसरातही भाविकांना थांबण्यास मज्जाव करण्यात आला आहे. यात्रा रद्द झाल्याचे बेळगाव जिल्हाधिकार्यांनी आठवडाभरापूर्वीच जाहीर केले आहे, शिवाय सांगली पोलीसांनीही यात्रेला न जाण्याचे आवाहन केले आहे

टॅग्स :Religious Placesधार्मिक स्थळेSangliसांगलीcorona virusकोरोना वायरस बातम्या