शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

म्हैसाळच्या पाटात श्रेयवादाची लाट : जनता संभ्रमात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2018 00:28 IST

अर्जुन कर्पे।कवठेमहांकाळ : दुष्काळी तालुक्यांना वरदान ठरणाऱ्या म्हैसाळ सिंचन योजनेच्या पाटात श्रेयवादाची लाट उसळली असून, ऐन उन्हाळ्यात या पाण्याच्या राजकारणाने पेट घेतला आहे. त्यामुळे नेमके पाणी कुणी सोडले, या संभ्रमात शेतकरी व जनता पडली आहे. तसेच कुणी का सोडेना एकदाचे पाणी सुटले म्हणून सुस्काराही सोडला आहे.म्हैसाळ योजनेच्या जन्मापासूनच या योजनेला ...

ठळक मुद्देऐन उन्हाळ्यात पाण्याच्या राजकारणाने पेट घेतला

अर्जुन कर्पे।कवठेमहांकाळ : दुष्काळी तालुक्यांना वरदान ठरणाऱ्या म्हैसाळ सिंचन योजनेच्या पाटात श्रेयवादाची लाट उसळली असून, ऐन उन्हाळ्यात या पाण्याच्या राजकारणाने पेट घेतला आहे. त्यामुळे नेमके पाणी कुणी सोडले, या संभ्रमात शेतकरी व जनता पडली आहे. तसेच कुणी का सोडेना एकदाचे पाणी सुटले म्हणून सुस्काराही सोडला आहे.

म्हैसाळ योजनेच्या जन्मापासूनच या योजनेला राजकारणाचे ग्रहण लागले आहे. ते आजपर्यंत काय सुटलेले नाही. मिरज पूर्व, कवठेमहांकाळ, जत हे दुष्काळी तालुके या सिंचन योजनेच्या लाभक्षेत्राखाली येतात. यावर्षी म्हैसाळचे पाणी सोडण्याचे व सोडल्याचे श्रेय लाटण्यासाठी नेत्यांची स्पर्धा लागलेली संपूर्ण जिल्ह्याने पाहिली. खासदार संजयकाका पाटील यांनी या पाण्यासाठी आपली खासदारकी पणाला लावली. पाणी सोडले नाही तर, आपण राजीनामा देऊ, असे जाहीर केले. यासाठी त्यांनी दोन दिवस मुंबापुरीत फडणवीससाहेबांच्या दरबारात तळ ठोकला.

फडणवीसांच्या दरबारातील जलदेव गिरीश महाजन यांचीही मनधरणी करून काम फत्ते केल्याचे खा. संजयकाकांनी तातडीने जिल्ह्यात निरोप धाडले आणि सोशल मीडियात खा. संजयकाका म्हैसाळच्या पाटातून मिरजपूर्व ते कवठेमहांकाळ व्हाया जत असे वाहण्यास सुरुवात झाल्याची चर्चा सुरू झाली.गेले दोन महिने या पाण्यासाठी कोण काय करतं याकडे जनताही लक्ष ठेवून आहे. तर माजी मंत्री अजितराव घोरपडे, आ. सुमनताई पाटील, आ. सुरेश खाडे हे नेतेही खा. संजयकाका यांच्या हालचालींवर टेहळणी करीत होते. यामधील आ. सुरेश खाडे यांनी भाजप पक्षीय असल्याने खा. पाटील यांच्यासमवेतच या पाटात अंघोळ करण्याचा निर्णय घेतला.

अजितराव घोरपडे आणि आ. सुमनताई पाटील यांनी याचे श्रेय खा. संजयकाका पाटील यांच्याकडे जाऊ नये म्हणून थेट मुंबापुरी गाठून जलदेव गिरीश महाजन यांची भेट घेतली व पाणी सोडण्यासाठी लेखी मागणी केली. त्याचे फोटोही वाºयासारखे खा. पाटील सांगलीत दाखल व्हायच्या आधी व्हायरल करण्यात आले आणि पाठपुराव्याला यश आल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे जनता मोठ्या बुचकळ्यात पडली.म्हैसाळचे पाणी प्रभावी हत्यारआता कुणाचे नाव घ्यायचे म्हणून लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांना वर्ष, दीड वर्षाचा कालावधी उरला आहे. त्याच्या आधी जनतेसमोर जाण्यासाठी म्हैसाळचे पाणी हे प्रभावी हत्यार म्हणून वापरता यावे यासाठी सर्वच राजकीय नेत्यांनी या पाण्याचे श्रेय घेण्यासाठी कंबर कसली असल्याचे जनता उघड बोलू लागली आहे.