येडेनिपाणी (ता. वाळवा) येथे हिंदुरावनाना पाटील सेवा सोसायटीच्या नूतन इमारतीचे उदघाटन व कामेरी-येडेनिपाणी पाणी पुरवठा संस्थेच्या नूतन इमारतीचे भूमिपूजन समारंभात ते बोलत होते. आ. मानसिंगराव नाईक, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष दिलीपराव पाटील, राजारामबापू बँकेचे अध्यक्ष प्रा. शामराव पाटील, संचालक डॉ. प्रकाश पाटील, रणजित पाटील प्रमुख उपस्थित होते.
जयंत पाटील म्हणाले की, हिंदुराव पाटील ध्येयनिष्ठ, भक्ती मार्गाने जाणारे होते. नव्या पिढीने त्यांचा आदर्श घेत पुढे येऊन समाजाच्या प्रगतीसाठी नव-नवीन संकल्पना राबवाव्यात.
यावेळी विनायक पाटील, शशिकांत पाटील, विजयराव पाटील, संजय पाटील, देवराज पाटील, सुस्मिता जाधव, सुनीता देशमाने, आनंदराव पाटील, पी. टी. पाटील, नंदकुमार पाटील, सरपंच डॉ. सचिन पाटील, रायसिंग पाटील, श्रीरंग कणसे उपस्थित होते. मकरंद पाटील यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. सचिव राजाराम पाटील यांनी आभार मानले.