शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
4
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
5
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
6
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
7
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
8
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
9
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
10
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
11
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
12
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
13
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
14
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
15
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
17
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
18
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
19
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
20
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

‘टेंभू’चे पाणी २५ ला अर्जुनवाडीत भारत पाटणकर : पाणीपट्टीतून वीज बिलाचा खर्च वसुलीस स्थगिती

By admin | Updated: May 14, 2014 00:07 IST

सांगली : पुरेसा पाऊस न झाल्यामुळे आटपाडी तालुक्यात भीषण पाणी टंचाई असल्यामुळे टेंभू उपसा सिंचन योजनेचे पाणी सोडण्याची मागणी केली होती.

सांगली : पुरेसा पाऊस न झाल्यामुळे आटपाडी तालुक्यात भीषण पाणी टंचाई असल्यामुळे टेंभू उपसा सिंचन योजनेचे पाणी सोडण्याची मागणी केली होती. त्यानुसार अधीक्षक अभियंत्यांनी २५ मे २०१४ पर्यंत आटपाडी तालुक्यातील अर्जुनवाडी तलावात पाणी सोडून सांगोला तालुक्यातील बुधीहाळ तलावात सोडण्याचे आश्वासन दिले आहे, अशी माहिती श्रमिक मुक्ती दलाचे अध्यक्ष डॉ. भारत पाटणकर यांनी सांगलीत पत्रकार परिषदेत मंगळवारी दिली. तसेच ते म्हणाले की, वीज बिलाचा खर्च दुरुस्ती व देखभाल खर्च म्हणून धरला जाईल. वीजबिल पाणीपट्टीच्या माध्यमातून शेतकर्‍यांकडून वसूल करण्यात येणार नाही, असे लेखी पत्र महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाच्या अध्यक्षांनी दिले आहे, असेही ते म्हणाले. ते म्हणाले की, आटपाडीत पाणी टंचाई असल्यामुळे टेंभू योजनेतून पाणी सोडण्याबाबत सांगलीतील पाटबंधारे कार्यालयात बैठक झाली. यावेळी अधीक्षक राजेंद्र मोहिते, कार्यकारी अभियंता शिंदे, कार्यकारी अभियंता महेश सुर्वे, पाणी चळवळीतील आनंदराव पाटील, अण्णासाहेब पत्की, शेख, संतोष गोठल, महादेव देशमुख, मनोहर विभुते आदी उपस्थित होते. अर्जुनवाडी तलावात पाणी सोडण्याच्यादृष्टीने टेंभू योजनेच्या अधिकार्‍यांना शेतकरी मदत करणार आहेत. श्रमदानातून शेतकरी पोटकालव्याची किरकोळ खुदाई असेल ती करून पाण्याचा अडथळा दूर करण्याचा प्रयत्न करणार आहेत. विहिरी, तलाव, बंधारे भरून घेण्यात येणार आहेत. पाणी सोडण्यापूर्वी मोजमापन पध्दतीने शेतकरी अधिकार्‍यांकडे पाणीपट्टीही भरणार आहेत. अर्जुनवाडी तलावात पाणी आल्यानंतर आटपाडी तालुक्यातील ७५ टक्के भागाला पाणी मिळण्यास मदत होणार आहे. निधी कमी पडत असेल, तर शासनाविरोधात लढा उभारून तो मिळविण्यात येईल, असेही पाटणकर यांनी स्पष्ट केले. ते म्हणाले की, पाणीपट्टी आकारणी झाल्यानंतर वीज बिलाचे पैसेही शेतकर्‍यांकडून वसूल केले जात होते. याविरोधात आम्ही महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणचे अध्यक्ष पुदीराजा यांची भेट घेऊन चर्चा केली. त्यानुसार पुदीराजा यांनी वीज बिल हे दुरुस्ती व देखभाल खर्चाचा भाग म्हणून धरण्याची सूचना दिली आहे. तसे लेखी पत्र मागील आठवड्यात मिळाले आहे. (प्रतिनिधी)