शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

ताकारी योजनेचे पाणी चालले वाया

By admin | Updated: July 16, 2014 00:01 IST

नियोजनाचा अभाव : ओढे-नाले तुडुंब भरले

प्रताप महाडिक - कडेगावपाणी काटकसरीने वापरण्याचा विचारच नुसता पुढे धावतो आहे, परंतु आचार मागे रेंगाळतो आहे. ताकारी उपसा जलसिंचन योजनेचे लाखो लिटर पाणी वाया जात आहे. नियोजनाचा अभाव, शेतकऱ्यांत पाणी वापराबद्दल नसलेली जागरुकता, जलवाहिन्यांची गळती, निधीअभावी खोळंबलेली कामे यामुळे ताकारीच्या पाण्याचा प्रचंड अपव्यय होत आहे. योजनेच्या लाभक्षेत्रात नेहमीच ओढ्या-नाल्यांतून पाणी धो—धो वहात असते. योजनेच्या २७ हजार हेक्टर लाभक्षेत्रासाठी ९ टीएमसी पाणी राखून ठेवले जाते. मात्र मागील वर्षी ९ टीएमसीपेक्षा जादा पाणी उचलले आहे. तरीही केवळ ६ हजार हेक्टर लाभक्षेत्र ओलिताखाली आल्याची नोंद आहे.ताकारी योजनेचा मुख्य कालवा १८२ कि.मी. लांबीचा आहे. या कालव्याला असलेल्या पोटपाटांची लांबी अंदाजे ४00 कि.मी.पर्यंत आहे. यातून परिसरातील २७ हजार हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणार आहे. यासाठी कृष्णा खोरे विकास महामंडळाने ९ टीएमसीहून अधिक पाणी राखून ठेवले आहे.सुरुवातीला १९८४ मध्ये ८४ कोटींचे बजेट ठरणारी ही योजना हजार कोटींच्या घरात गेली, तरी योजनेचे काम पूर्ण झालेले नाही. योजनेचे काम अपूर्ण असतानाही युती शासनाच्या काळात योजनेतून पाणी उचलण्यात आले. याच काळात योजनेचे काम जोमाने करण्यात आले. आता केंद्र शासनाच्या एआयबीपीत योजनेचा समावेश होऊनही, त्या पटीत निधी मिळाला नसल्याचे दिसून येते. निधीअभावी बरीचशी कामे खोळंबली आहेत. यात प्रामुख्याने मुख्य कालव्याला अस्तरीकरण करणे, पोटपाटाची अपुरी असणारी कामे पूर्ण करून अस्तरीकरण करणे, पोटपाटांवर मीटर बसविणे यासारख्या कामांचा समावेश आहे.सध्या ताकारीचे पाणी १00 कि.मी.पर्यंत पोहोचले आहे. यातून कडेगाव, खानापूर आणि तासगाव तालुक्यातील बहुतांशी भाग पाण्याखाली आला आहे. मुख्य कालव्यासह वितरिकांना अस्तरीकरण नसल्यामुळे जागोजागी पोटपाट फोडून शेतकऱ्यांनी पाणी ओढ्या-नाल्यात सोडले आहे. अनेक ठिकाणी योजना सुरू झाल्यापासून मोकळ्या रानात पाणी सुरू असते. त्यामुळे पाण्याचा सदुपयोग होण्याऐवजी दुरुपयोगच अधिक होत आहे. थेट शेतकऱ्यांना बांधापर्यंत पाणी वाटप करण्यासाठी योजनेच्या कार्यालयात विशेष कर्मचाऱ्यांची तरतूद आहे. मात्र गेली अनेक वर्षे या जागा रिक्तच आहेत. योग्य पाणीवाटप करण्यासाठी कर्मचाऱ्यांची नियुक्ती करणे गरजेचे आहे.योजनेच्या अधिकाऱ्यांसमोर अपुरी कामे पूर्ण करण्याबरोबरच योग्य नियोजन करण्याची जबाबदारी आहे. लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांत जागृती निर्माण करण्यासाठी सामाजिक संघटना, शाळा, ग्रामपंचायतींनी पुढाकार घेण्याची गरज आहे.