शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

टेंभूचे पाणी पूर्ण क्षमतेने आले , पृथ्वीराज देशमुख : तलावामध्ये पाणी पूजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2018 23:29 IST

कडेपूर : कडेगाव तालुक्यातील शेतीला पाणी देऊन शेतकºयांच्या जीवनात नंदनवन फुलविण्याचे स्वप्न आमदार संपतराव देशमुख यांनी पाहिले होते. सध्या तालुक्यात ताकारी आणि टेंभू योजनेचे पाणी शेतीसाठी पूर्ण क्षमतेने आले आहे.

कडेपूर : कडेगाव तालुक्यातील शेतीला पाणी देऊन शेतकऱ्यांच्या जीवनात नंदनवन फुलविण्याचे स्वप्न आमदार संपतराव देशमुख यांनी पाहिले होते. सध्या तालुक्यात ताकारी आणि टेंभू योजनेचे पाणी शेतीसाठी पूर्ण क्षमतेने आले आहे. खऱ्या अर्थाने आज संपतराव देशमुख यांचे स्वप्न साकार झाले आहे, असे प्रतिपादन भाजपाचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख यांनी केले.

येतगाव (ता. कडेगाव) येथील हेळाचा माळ तलावात सोडण्यात आलेल्या टेंभू योजनेच्या पाण्याचे पूजन पृथ्वीराज देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी पंचायत समिती सभापती मंदा करांडे, जिल्हा परिषद सदस्या रेश्मा साळुंखे, सी. एम. बायो अ‍ॅग्रो कंपनीचे अध्यक्ष चंद्रकांत मोरे, सरपंच साहेबराव उथळे उपस्थित होते.

यावेळी देशमुख म्हणाले, दुष्काळी भागातील शेतीला पाणी मिळण्यासाठीच टेंभू योजनेचा जन्म संपतराव देशमुख यांच्या कार्यतत्पर नेतृत्वातून झाला. मात्र, काँग्रेस-राष्टÑवादी आघाडी शासनाच्या चुकीच्या धोरणामुळे शेतकºयांना पाण्यापासून वंचित राहावे लागले. आता केंद्र आणि राज्यात भाजपाचे सरकार आहे. सर्व पाणी योजना पूर्ण करण्यासाठी शासन मोठ्या प्रमाणात निधी देण्याचे काम करीत आहे.

ते म्हणाले, जिल्हा परिषद, पंचायत समिती आपल्या ताब्यात आहेत. या माध्यमातून येतगावमधील विकासकामासाठी एका वर्षात दोन कोटी रुपयांहून अधिक निधी उपलब्ध करून दिला. येरळा नदीवर बंधारा, सिमेंट नाला बांध, दलितवस्ती सुधारणा, शाळा खोल्यांची दुरुस्ती, सौर दुहेरी पंप, स्ट्रीट लाईट, आदी कामे मंजूर केली आहेत. गावच्या विकासासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही.यावेळी भाजपा नेते डॉ. आबासाहेब साळुंखे, जगदीश महाडिक, नेवरीचे माजी सरपंच संतोष महाडिक, कृृष्णात मोकळे, लक्ष्मण माने, नवनाथ पोळ, शंकर सावंत, संतोष सावंत, मारुती जरग यांच्यासह कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते. केन अ‍ॅग्रो साखर कारखान्याचे संचालक लक्ष्मण कणसे यांनी स्वागत केले. रामचंद्र कणसे यांनी आभार मानले.