शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत द्वेष्टा...! डोनाल्ड ट्रम्प यांचा भारतावर पहिला वार; ६ भारतीय ऑईल कंपन्यांवर निर्बंध लादले...
2
दोस्तीत कुस्ती! भारताला २५% टॅरिफचा धक्का देत डोनाल्ड ट्रम्प यांची पाकिस्तानशी हातमिळवणी; केली मोठी डील 
3
सलवार सूट घातला, त्यावर बुरखा चढवला अन् महिला डॉक्टरच्या घरात घुसून ७ वेळा चाकूने वार केला; नेमकं प्रकरण काय?
4
अरे ही कसली आई! १५ महिन्यांच्या लेकाला बस स्टँडवर सोडलं अन् इन्स्टा बॉयफ्रेंडसोबत पळाली
5
जुनी मैत्रिण ४ वर्षांनी पुन्हा भेटली, एकांतात भेटायला बोलावलं; बंद खोलीत तिला कायमचं संपवलं, मग... 
6
Video - क्रूरतेचा कळस! 'ती' जीव वाचवण्यासाठी हाता-पाया पडली पण 'तो' अमानुषपणे मारत राहिला
7
Video - पावसाचे थैमान! पुरामध्ये ३० तास अडकली शाळेची बस, १०० जणांना वाचवण्यात यश
8
ट्रम्प यांचा भारतावर २५ टक्के टॅरिफ बॉम्ब; १ ऑगस्टपासून लागू होणार आयात शुल्क, दंडही आकारणार
9
धक्कादायक! ४००० देऊन भीक मागणाऱ्यांचे स्पर्म गोळा केले, टेस्ट ट्यूब बेबीसाठी लाखो रुपये आकारून लोकांना फसवले! 
10
आजचे राशीभविष्य ३१ जुलै २०२५ : या राशीला धनलाभाचा दिवस, या राशीला काहीसा प्रतिकूल
11
भारत-पाक युद्ध तिसऱ्या देशाने थांबवले नाहीच; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खोडला दावा
12
‘लाडकी बहीण’च्या लाभार्थी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई; राज्य सरकारने जारी केले आदेश
13
मालेगाव खटल्याचा निकाल आज; १७ वर्षांनी विशेष NIA कोर्ट निर्णय देणार, संपूर्ण देशाचे लक्ष
14
सर्वांत महाग-शक्तिशाली निसार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पृथ्वीची प्रत्येक इंच जमीन मॅप करणार
15
“मोदी यांच्या आचारसंहिता भंगप्रकरणी कोर्टात जाणार, निवडणूक आयोगाची कारवाईस टाळाटाळ”: चव्हाण
16
कृषी खात्यातील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करा!; सुरेश धस यांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र
17
डिझेल दर सवलतीमुळे एसटीचे ११.८ कोटी वाचणार; स्पर्धात्मक निविदेमुळे महामंडळाला फायदा
18
देशातील विमानांमध्ये सुरक्षेच्या २६३ त्रुटी! सर्वाधिक एअर इंडिया, तिसऱ्या क्रमांकावर इंडिगो
19
मुंडेंचे नाव आले अन् माझा छळवाद सुरू झाला: अण्णा डांगे; भाजपात फेरप्रवेश, मन केले मोकळे
20
अनिलकुमार पवार हे दादा भुसे यांचे नातेवाईक, शिफारशीने नियुक्ती; संजय राऊत यांचा आरोप

सांगली, मिरज, कुपवाड शहरांना आता दिवसातून एकवेळच पाणीपुरवठा

By संतोष भिसे | Updated: June 24, 2023 14:38 IST

सांगलीचा पाणीपुरवठा कोयना धरणातील पाणीसाठ्यावर अवलंबून आहे. सध्या धरणात ५.६५ टीएमसी इतकाच पाणीसाठा उपलब्ध आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कसांगली : लांबलेल्या पावसामुळे निर्माण झालेल्या टंचाईस्थितीचे थेट परिणाम आता नागरिकांना भेडसावू लागले आहेत. सांगली, मिरज व कुपवाड  शहरांना दिवसातून आता एकदाच पाणी पुरविले जाणार आहे. पाण्याचा वापर काटकसरीने करण्याचे आवाहन महापालिकेने केले आहे.

सांगलीचा पाणीपुरवठा कोयना धरणातील पाणीसाठ्यावर अवलंबून आहे. सध्या धरणात ५.६५ टीएमसी इतकाच पाणीसाठा उपलब्ध आहे. महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांनी जारी केलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की, धरणातून कृष्णा नदीतील विसर्ग कमी करण्यात आल्याने  पाणीपातळी खालावली आहे. पर्जन्यमान व परिस्थितीनुसार महापालिकेला पाणीपुरवठयाचे नियोजन करावे लागत आहे. धरणातील मर्यादीत पाणीसाठ्याचा विचार करुन पाणीपुरवठा सुरु आहे.

सांगली, मिरज व कुपवाड शहरांतील काही भागात चोवीस तास पाणीपुरवठा सुरु असतो, तर काही भागात दोनवेळा सोडण्यात येते. पण सध्या टंचाईस्थितीमुळे एकदाच पाणी सोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कृष्णेच्या पाणीपातळीत वाढ होईपर्यंत, तसेच कोयना धरणात पुरेसा साठा उपलब्ध होईपर्यंत  एकवेळ पाणी सोडले जाणार आहे. नागरिकांनी पाणी काटकसरीने, उकळून व गाळून प्यावे.

दरम्यान, कृष्णा नदीतून पिण्यासाठी, शेतीसाठी व उद्योगांसाठी पाणी पुरवताना जलसंपदा विभागाला कसरत करावी लागत आहे. कोयना धरणातील पाणीसाठा निचांकी पातळीवर घसरलेला असतानाच, पावसाचीही चिन्हे नाहीत. त्यामुळे सांगलीकरांना पाण्याची चैन काही दिवसांसाठी थांबवावी लागणार आहे. आजवर अवर्षणस्थितीत शहरांचा पाणीपुरवठा सहसा नियंत्रित करावा लागलेला नव्हता. सध्या मात्र उपशावर मर्यादा आल्या आहेत.

गटारीला जाणारे पाणी रोखासागंली, मिरजेत अनेक ठिकाणी नळांना तोट्या नाहीत. पाणीपुरवठा सुरु होतो, तेव्हा धो-धो पाणी गटारांतून वाहून जात असते. अनेक ठिकाणी जलवाहिन्यांच्या गळतीमुळेही रस्त्या-रस्त्यावरुन पाण्याचे लोंढे वाहत असतात. ही नासधूस थांबविण्याची वेळ आली आहे

टॅग्स :Waterपाणी