शहरं
Join us  
Trending Stories
1
देवेंद्र फडणवीसांचा आनंद गगनात मावेना; लेक दिविजाला दहावीत 92.60% गुण...
2
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...
3
LoC Tensions Escalate: तणाव वाढताच पाकिस्तानी जवानांनी सीमेवरील चौक्या सोडल्या, झेंडेही हटवले
4
भारत-पाकिस्तान तणाव शिगेला पोहोचला असतानाच अमेरिकेतून आली 'गुड न्यूज'! ट्रम्प म्हणाले, भारतासोबत होऊ शकतो करार
5
१ मे रोजी गुरुवार पण बंद राहणार शेअर बाजार; कारण काय? जाणून घ्या
6
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
7
मनीष सिसोदिया आणि सत्येंद्र जैन पुन्हा अडचणीत; आता ₹2000 कोटींच्या भ्रष्टाचाराचा आरोप
8
भारत-पाकिस्तान युद्ध झालेच तर पाकिस्तानच्या बाजुने कोणते देश? भारताला कोण मदत करू शकतो...
9
"मी २७ वर्षांची असून बेकार, काहीच कमवत नाही", आमिरच्या लेकीची खंत; अभिनेता म्हणाला...
10
नाशिक: तो पळत गेला अन् उडी मारून स्कुटीवर बसला; पोलिसाच्या हाताला झटका देऊन आरोपी फरार
11
Gold Price on Akshay Tritiya : अक्षय्य तृतीयेला 'इतक्या' रुपयांनी स्वस्त झालं सोनं, काय आहे १४ ते २४ कॅरेट सोन्याचे नवे दर
12
चपाती बनवताना तुम्हीही करता का 'ही' चूक? वाढू शकतो कॅन्सरचा धोका, वेळीच व्हा सावध
13
पाकिस्तानचा खोटारडेपणा, हुतात्मा जवानाच्या आईला भारताने हाकलल्याची पसरवली बातमी, आता समोर आलं सत्य
14
'मुस्लीम रुग्णांवर उपचार करणार नाही' पहलगाम हल्ल्यानंतर इंदूरच्या डॉक्टरची पोस्ट व्हायरल
15
१ मेपासून देशातील १५ बँका होणार बंद; महाराष्ट्रातील बँकांचाही समावेश? खातेदारांच्या पैशाचं काय होणार?
16
"लहानपणापासून मी कित्येक पूजा केल्यात, काही लोकांना आज उत्तर मिळाले असेल"; शरद पवारांचा टोला
17
क्रिकेटसोबत कमाईतही नंबर वन आहे Rohit Sharma, वर्षाला कोट्यवधींची कमाई; कशी आहे लक्झरी लाईफस्टाईल?
18
निर्लज्ज पाकिस्तान! संसदेत, परराष्ट्रमंत्र्यांनी टीआरएफला वाचवल्याची कबुली दिली, म्हणाले, आम्ही त्यांचे नाव यूएनएससीच्या निवेदनातून...
19
ऐश्वर्या-अविनाश नारकर यांचे भन्नाट रील्स; लेकाची काय असते प्रतिक्रिया? म्हणाले, "तो कधीच..."
20
जगातील टॉप १० सर्वात महागडी शहरे; इथे एक दिवसांचा खर्च म्हणजे महिन्याचा पगार

मोसम पट्ट्यात पाणीटंचाई

By admin | Updated: February 9, 2016 22:51 IST

नामपूर : समृद्ध गावांची नावे टंचाईच्या यादीत; हिरवीगार शेती रखरखीत

शरद नेरकर  नामपूरकोणे एकेकाळी पाणीसमृद्ध गावांच्या यादीत नामपूरचे नाव अग्रणी होते. हिरवीगार शेती, ऊसमळे, समृद्ध शेतकरी, बारमाही दुथडी भरून वाहणारी नदी ही मोसम पट्ट्याची ओळख होती. कालांतराने पर्यावरणाचा ऱ्हास झाला. नदी शुष्क झाली. हिरवीगार शेती रखरखीत झाली, मूठभर लोकांच्या वाळू उपशामुळे हजारो लोक ‘पाणी पाणी’ करीत आहेत. हा वाळू उपसा मोसम पट्ट्याला एक दिवस वाळवंटात रूपांतरित करेल, त्याच दिवशी मोसम पट्ट्यातल्या लोकांना जाग येईल, अशी अवस्था येथे जाणवत आहे.मोसम पट्ट्यातील काही गावे वाळूला खूप जपतात. अगदी सोन्याच्या मोलासारखे वाळूला हे गावकरी महत्त्व देतात. दह्याणे, उत्राणे, खापलोण, राजपूरपांडे काही प्रमाणावर आसखेडा, जायखेडा या गावातील ग्रामस्थ वाळूला खूप जपतात; मात्र काही गावांच्या मोसम नदीपात्रात वाळू राहो की जावो कुणालाही काही देणे-घेणे नाही. वाळू उपशामुळे प्रचंड पाणीटंचाई निर्माण झाली आहे. मोसम नदीला आवर्तनाचे पाणी आले, नदीपात्रात वाळूच नसल्याने ते कोठे आले अन् कोठे गेले कुणाला काहीही समजले नाही. पाणीप्रश्नाची तीव्रता प्रचंड वाढली आहे. हंडाभर पाण्यासाठी माता-भगिनी सैरावैरा पळताना दिसतात. ग्रामपंचायत अनेक उपाययोजना करते; मात्र भूगर्भात पाणीच नाही तेथे ग्रामपंचायत तरी काय करणार.नामपूरला यापूर्वी आठवड्यात एकदा पाणी येई. कालांतराने दहा दिवसात, बारा दिवसात, पंधरा दिवसात, वीस दिवसात एकदा पाणी येईल. आता मात्र हद्दच झाली, तीन आठवड्यांच्या पुढे कालावधी झाला. नळांना पाणी नाही.नामपूर येथे दि. ६ फेब्रुवारी रोजी पाणीटंचाईसंदर्भात बैठक झाली. गावचे सरपंच, पाणीपुरवठा अधिकारी, जाणते नागरिक यांच्या उपस्थितीत ही बैठक झाली. अनेक उपाय यात सुचवण्यात आलेत. गावाचा पाणीप्रश्न सुटावा म्हणून दररोज नामपूरला ५ मोठे टँकर पाणी दिले तर पाणीप्रश्न काहीसा सुटण्यास मदत होणार आहे. नामपूर गावातल्या बऱ्याचशा जलपऱ्या आटल्या आहेत. पाणीप्रश्नांची दाहकता नोव्हेंबरपासूनच तीव्र झालेली आहे. मार्च, एप्रिल, मे हे तीन महिने तीव्र उष्णतेचे असतात. हिवाळ्यात प्रचंड पाणीटंचाई निर्माण होणार आहे. उन्हाळ्यात पाणीप्रश्नाची तीव्रता काय राहील, हे लवकरच कळणार आहे.नामपूर ३५ हजार लोकवस्तीचे गाव. गावाव्यतिरिक्त अनेक वस्त्या वाढल्यात. लोकसंख्येच्या विस्तारात छोटी-मोठी नगरे वाढलीत. शिवमनगर (चार फाटा) व इंदिरानगर ही जुन्या वस्तीची नगरे ! व जास्त वस्तीची नगरे या दोन्ही वस्त्यांना ग्रामपंचायतीचा पाणीपुरवठा होतो; मात्र भूविकासकांनी जी नवीन नगरे स्थापन केली आहेत तेथे मात्र अजूनही पाणी मिळत नाही. नववसाहतींचे जलस्रोत अकस्मात अडवले गेल्याने येत्या पाच वर्षांत नववसाहतींच्या रहिवाशांना गंभीर पाणी समस्येला सामोरे जावे लागणार आहे.नामपूरचा पाणीप्रश्न मार्गी लावण्यासाठी मोठ्या महादेव मंदिराजवळ के.टी. वेअर बांधणे अत्यंत आवश्यक आहे. मोसम नदीवर यासाठी परवानगी नाही. गावचा पाणीप्रश्न सुटणार असेल तर गावकऱ्यांनी सामूहिक प्रयत्न करून शासनदरबारी अधिकाऱ्यांना पटवून देणे आवश्यक आहे. हा के.टी. वेअर झाल्यास संपूर्ण गावचा पाणीप्रश्न सुटण्यास मदत होणार आहे. नामपूर येथे ब्रिटिशकालीन भक्कम बंधारा आहे. या बंधाऱ्यामुळे गावाला मोठ्या प्रमाणावर पाण्याचा फायदा होतो. ब्रिटिशांनी दूरगामी विचाराने हा बंधारा बांधला होता. येथे मोठ्या प्रमाणावर वाळूचा साठा आहे. या साठ्यामुळे येथे मोठ्या प्रमाणावर पाणी मुरते व याच्या परक्युलेशनमुळे नामपूरला याचा मोठा फायदा होतो; मात्र दुर्दैवाने येथील वाळूही दररोज कमी कमी होत आहे. नामपूरच्या सुजाण नागरिकांना याची ना खेद ना खंत!शेतकरी सध्या दुष्काळाच्या दृष्टचक्रातून जात आहे. पाणीपातळी खालावल्यामुळे पाणी मिळणं दुर्भिक्ष जाणवत आहे. मोसम पट्ट्याचा मुख्य व्यवसाय शेती आहे. ऊस, डाळींब, द्राक्ष, कांदा ही चार पिके मोसमच्या अर्थव्यवस्थेशी निगडित आहेत. या पाच -सात वर्षांत डाळींब पिकाने शेतकऱ्यांची सारी स्वप्ने पूर्ण केलीत. शेतकऱ्यांना डाळिंबाने दुचाकीवरून चारचाकीत बसवले. साध्या घरातून बंगल्यात नेले व जनसामान्यात शेतकऱ्यांना प्रतिष्ठा प्राप्त करून दिली. मात्र या समृद्धीला दृष्ट लावली. डाळिंबावर ‘तेल्या’ने साडेसाती आणली व डाळिंबाची पंढरी असलेल्या मोसम पट्ट्यास आर्थिक दुर्बल बनवले. बऱ्याचशा शेतकऱ्यांनी डाळिंबाची झाडे उपटून फेकून दिलीत. द्राक्ष, शेवग्याची लागवड केली; मात्र द्राक्ष हे भांडवली पीक आहे, कष्टाचे पीक आहे. हवामानारूप द्राक्षबाग फुलते व कोमजतेही. यापूर्वी द्राक्षाने अनेकांना श्रीमंत बनवले व अनेकांना संकटातही टाकले. त्यामुळे अनेकांची इच्छा असूनही द्राक्ष बाग फुलवता आली नाही.खालावलेल्या पाणीपातळीमुळे यंदा कांद्याची लागवडही कमी आहे. पर्यायाने उत्पन्नही कमीच आहे. जेथे कांद्याची लागवड भरपूर आहे तेथे पाण्याचे दुर्भिक्ष आहे. पाणीसाठा पुरेसा नसल्याने कांदा लागवड कमी जरी असली, तरी उत्पन्न कमी व उत्पन्न जेथे मिळाले तेथे उत्पादन खर्चावर आधारून भाव नाही त्यामुळे पाणी या एकाच गोष्टीमुळे लागवड घटली, उत्पन्न घटले व भावही कमी झाला. अशा दुहेरी-तिहेरी संकटात शेतकरी सापडला आहे. बळीराजाला थोडे चांगले दिवस आलेत की एकामागून एका संकटाच्या मालिकाही सुरू होतात; मात्र सध्या खालावलेली पाणीची पातळी शेतकऱ्यांच्या आर्थिक दृष्टीने खूपच हानिकारक ठरत असून, ‘कहॉँ गये वो अच्छे दिन!’ अशा मानसिक अवस्थेत शेतकरी आहेत. नामपूरला पाणीदार नेतृत्वाचा शोध असून, पाणीप्रश्न सोडवणाऱ्या पाणीदार नेतृत्वाच्या शोधात नामपूरकर आहेत.शेती व्यवसाय मोडकळीस आला आहे. शेती व्यवसायच ओस म्हटल्यावर या व्यवसायाशी निगडित ज्यांना रोजगार मिळत होता त्या कामगारांवर बेकारीची कुऱ्हाड कोसळली आहे. शेती व्यवसाय ओस पडल्यामुळे शेतकऱ्यांना काम नाही. शेतकरीच आता नाइलाजाने रोजंदारीच्या शोधार्थ फिरताना दिसत आहेत. दुष्काळाच्या दृष्टचक्रात ग्रामीण भागाची अर्थव्यवस्था ही शेतीशी निगडित आहे. शेती व्यवसाय हिरवागार तर अर्थव्यवस्थासुद्धा बहारदार असते. दुष्काळाच्या दृष्टचक्रात साऱ्याच व्यवसायांना घरघर लागली आहे. त्यामुळे अनेक व्यावसायिकांची साधी बोहणीसुद्धा होत नसल्याचे प्रतीक प्लायवूडचे संचालक विनयमाउली सावंत यांनी सांगितले. पाणीप्रश्नाची तीव्रता व संपुष्टता आलेल्या फळबागा यामुळे मोठमोठाले शेतकरी आता भाजीपाल्याच्या उत्पादनाकडे वळले आहेत. बांधकाम व्यवसायात प्रचंड मंदीची लाट असून, इतर व्यवसायांनासुद्धा मंदीचा मोठा फटका बसला आहे. संपूर्ण मोसम पट्टा जर पुन्हा हिरवागार करावयाचा असेल, तर मोसम नदीवर ठिकठिकाणी कोल्हापूर टाइप बंधारे बांधणे आवश्यक आहे. मोसम खोऱ्यात अनेक टेकड्या आहेत, या टेकड्या हिरव्यागार होणे आवश्यक आहे. शेती व्यवसायाला पुरेल एवढे पाणी दुसऱ्या धरणांतून उपलब्ध करून ते हरणबारी धरणात टाकले तर मोसम पट्टा सुजलाम् सुफलाम् होणार आहे. गरज आहे फक्त निस्वार्थी प्रयत्नांची!