शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
3
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
4
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
5
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
6
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
7
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
8
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
9
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
10
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
11
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
12
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
13
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
14
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
15
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
17
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
18
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
19
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
20
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
Daily Top 2Weekly Top 5

‘कृष्णे’च्या पाणी पातळीत वेगाने वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2019 23:14 IST

सांगली : शहर व परिसरात रविवारी दिवसभर पावसाची संततधार सुरू होती. सकाळी पावसाचा जोर होता. काहीवेळ उसंत घेतल्यानंतर पुन्हा ...

सांगली : शहर व परिसरात रविवारी दिवसभर पावसाची संततधार सुरू होती. सकाळी पावसाचा जोर होता. काहीवेळ उसंत घेतल्यानंतर पुन्हा पावसाच्या सरी कोसळत होत्या. पावसामुळे शहरातील अनेक रस्ते चिखलमय झाले होते; तर काही चौकात पाणी साचल्याने वाहतुकीला अडथळा होत होता. दुसरीकडे नदीच्या सांगलीतील पात्रात वेगाने वाढ होत असून तीन तासात ६ फुटाने पातळी वाढली आहे.जिल्ह्यात रविवारी सकाळपर्यंत साडेनऊ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. यात मिरज तालुक्यात ७.६ मिलिमीटर, खानापूर ३, वाळवा ११.६, तासगाव ६.९, शिराळा ३४, कवठेमहांकाळ २.१, पलूस ५.५, कडेगाव १६.८ मिलिमीटर पावसाची नोंद झाली, तर जत व आटपाडी तालुक्याला मात्र पावसाने हुलकावणी दिली आहे. शिराळा, वाळवा, कडेगाव, पलूस, तासगाव आणि मिरज तालुक्यात दिवसभर संततधार होती. पावसामुळे शहरातील रस्त्यांची वाट लागण्यास सुरुवात झाली असून, रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ते, असे म्हणायची वेळ आली आहे. गुंठेवारीतील रस्त्यांची अवस्थाही दयनीय झाली आहे. शहरात सहा महिन्यांपूर्वीच नव्याने रस्ते करण्यात आले आहेत. या रस्त्यावर पावसाचे पाणी साचले आहे. सिव्हिल चौक ते राममंदिर चौकात मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने रस्त्यावर खड्डे पडू लागले आहेत. अनेक रस्त्यांवर चिखल झाल्याने वाहनधारकांची तारांबळ उडत आहे.पाणलोट क्षेत्रात : पावसाचा जोर कायमकोयना पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर वाढल्याने कृष्णा नदीच्या पाणी पातळीतही वाढ झाली आहे. दुपारी ४ ते सायंकाळी ७ या कालावधित सांगलीतील आयर्विन पुलाजवळ कृष्णेच्या पातळीत सहा फुटांनी वाढ झाली होती. नदीच्या पाणी पातळीत वेगाने वाढ होत आहे. सांगली बंधाराही पाण्याखाली गेला आहे.