शहरं
Join us  
Trending Stories
1
सरकारचा जीआर कोणाला सरसकट आरक्षण देत नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
2
नेपाळचा पंतप्रधान कोण? आंदोलकांमध्येच जुंपली; भारत समर्थक म्हणून सुशीला कार्की यांना एका गटाने नाकारले
3
अमेरिकेत भारतीय वंशाच्या व्यक्तीची निर्घृण हत्या, पत्नी आणि मुलासमोरच केले कुऱ्हाडीने वार
4
आजचे राशीभविष्य- १२ सप्टेंबर २०२५: प्रकृतीची काळजी घ्या, वाहन चालवताना दक्ष राहा!
5
विशेष लेख: मशाल हाती घेऊन इंजिन धावेल असे दिसते; पण...
6
बस प्रवास स्वस्त? टोलमध्ये मिळणार सवलत, राष्ट्रीय महामार्गासाठी टोल धोरण लवकरच
7
लाखो मुंबईकर लवकरच होणार 'अधिकृत रहिवासी'; २५ हजारांहून अधिक इमारतींच्या 'ओसी'चा मार्ग अखेर मोकळा
8
बुलेट ट्रेनच्या १५७ किमीवरील कामांसाठी महत्त्वाकांक्षी करार, मुंबई-अहमदाबाद प्रवास होणार वेगाने
9
अग्रलेख: जागतिक खेडे ते खंडित जग! युद्धज्वर जगाला संपवून टाकेल
10
राज्यात तब्बल एक लाख आठ हजार कोटींची गुंतवणूक; ४७ हजार रोजगारांची निर्मिती होणार
11
व्होटबंदी : साप मेला नाही; पण दात काढले!
12
Mhada: ठाणे शहर आणि जिल्हा, वसईतील म्हाडाच्या ५ हजार घरांसाठी दोन लाख अर्ज
13
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
14
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
15
Asia Cup 2025 PAK vs Oman : भारतीय वंशाचा कॅप्टन सलमानच्या पाकला भिडणार! अन्...
16
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
17
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
18
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
19
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
20
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना रिकामा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)

विट्यात दररोज २० लाखांच्या कापड उत्पादनावर पाणी--वीज भारनियमनाचा फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 7, 2017 20:16 IST

दिलीप मोहिते/विटा : महावितरणने विटा शहरात दररोज सरासरी साडेतीन तास वीजभारनियमन निश्चित केले असून, या भारनियमनाचा सर्वाधिक फटकावस्त्रोद्योगाला बसणार आहे. या साडेतीन तासांच्या भारनियमनात शहरातील६००० यंत्रमागांचे प्रतिदिन ७५ हजार कापड उत्पादन थांबणार असून, सुमारे२० लाख रुपयांच्या उत्पन्नावर पाणी पडणार आहे.दरम्यान, याचा फटका यंत्रमागावर काम करणाºया कामगारांनाही सोसावा लागणारअसून, शहरातील दोन ...

ठळक मुद्दे कामगारांची संख्या दोन हजाराच्या आपपास भारनियमनात शहरातील ६००० यंत्रमागांचे प्रतिदिन ७५ हजार कापड उत्पादन थांबणार

दिलीप मोहिते/विटा : महावितरणने विटा शहरात दररोज सरासरी साडेतीन तास वीजभारनियमन निश्चित केले असून, या भारनियमनाचा सर्वाधिक फटकावस्त्रोद्योगाला बसणार आहे. या साडेतीन तासांच्या भारनियमनात शहरातील६००० यंत्रमागांचे प्रतिदिन ७५ हजार कापड उत्पादन थांबणार असून, सुमारे२० लाख रुपयांच्या उत्पन्नावर पाणी पडणार आहे.दरम्यान, याचा फटका यंत्रमागावर काम करणाºया कामगारांनाही सोसावा लागणारअसून, शहरातील दोन हजार कामगारांची प्रतिदिन ७५ हजार रुपये मजुरी बुडणारआहे. त्यामुळे या वीज भारनियमनामुळे यंत्रमागधारक संतप्त झाले आहेत.विटा शहरात वस्त्रोद्योग यंत्रमाग व्यवसाय मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळेमहावितरणने चार फिडर तयार केले आहेत. त्यातील दोन फिडर ए ग्रुपला, तरदुसरे दोन फिडर बी ग्रुपला जोडले आहेत. त्यातील ए ग्रुपला सव्वातीन तासआणि बी ग्रुपला ४ तास वीज भारनियमन निश्चित केल्याने सरासरी भारनियमनसाडेतीन तासाचे समजण्यात येत आहे.

विट्यात सहा हजार यंत्रमागधारक सव्वातीन तासात सरासरी १२ मीटर कापड तयारकरतात. त्यामुळे सव्वातीन तासाच्या कालावधित सुमारे ७५ हजार मीटरकापडाच्या उत्पन्नावर पाणी पडणार आहे. दरम्यान, या यंत्रमागावर कामकरणाºया कामगारांची संख्या दोन हजाराच्या आपपास आहे. त्यामुळेकामगारांनाही भारनियमनाचा फटका बसला असून, दररोज ७५ हजार रुपयांच्यामजुरीला मुकावे लागत आहे. त्यामुळे महावितरणच्या या भारनियमनामुळेसर्वसामान्य व वस्त्रोद्योग व्यावसायिकांत संतापाची लाट उसळली आहे. 

प्रश्नाला वाचा फोडणार : किरण तारळेकरमहावितरणच्या नियोजनशून्य कारभारामुळे भारनियमन करावे लागत आहे. कोळसासंपल्याचे सांगून महावितरण स्वत:चे हसू करून घेऊ लागले आहे. शेतकरी,उद्योजक व सर्वसामान्य लोकांना सोबत घेऊन या प्रश्नाला वाचा फोडली जाईल.भविष्यात सर्वच ग्राहकांना पुरेशा दाबाने वीज मिळाली पाहिजे, असे मत विटायंत्रमाग संघाचे अध्यक्ष किरण तारळेकर यांनी व्यक्त केले.