शहरं
Join us  
Trending Stories
1
हिमाचल प्रदेश: बिलासपूरमध्ये बसवर डोंगराचा ढिगारा कोसळला, १५ जणांचा मृत्यू; बचावकार्य सुरू
2
निलेश घायवळचा पाय खोलात;बनावट पासपोर्ट प्रकरणासह आतापर्यंत ४ गुन्हे दाखल
3
Dharashiv: मोठी बातमी! तातडीने मदत द्या, मागणी करणाऱ्या आंदोलक शेतकऱ्यांवर गुन्हे!
4
ICC Womens World Cup 2025 : हेदर नाइटचा हिट शो! इंग्लंडनं बांगलादेशला पराभूत करत भारताला दिला धक्का
5
कस्तुरबा रुग्णालयातील पुस्तक वाटप प्रकरणाला वेगळं वळण, किशोरी पेडणेकरांचा तक्रारदारालाच प्रतिप्रश्न, म्हणाल्या...
6
धक्कादायक!! विरारमध्ये दोन तरूणांनी एकत्र संपवलं जीवन, १८व्या मजल्यावरून मारली उडी
7
अभिषेक शर्मा ICC पुरस्काराच्या शर्यतीत; त्याला कुलदीपसह झिम्बाब्वेचा गडी देणार टक्कर!
8
भर वर्गात महिलेसोबत आक्षेपार्ह चाळे करताना सापडला शिक्षक, मुलांनी रेकॉर्डे केला व्हिडीओ, कुठे घडली घटना
9
...अन् रागाच्या भरात पृथ्वी शॉनं विकेट घेणाऱ्या मुशीर खानवर उगारली बॅट; नेमकं काय घडलं? (VIDEO)
10
मार्कशीटवर दिसले स्वीमीजी... विद्यार्थ्याने ऑनलाइन केला अर्ज, विद्यापीठाने घातला वेगळाच घोळ
11
सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या प्रकरणाचा ठाण्यात निषेध, मूक निदर्शने
12
६८ कोटींचा रस्ता ३ वर्षांपासून पूर्ण होईना; कल्याण-अंबरनाथ रस्त्याच्या कामाला अखेर मुहूर्त
13
सांगलीत शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का; आमदार पुत्राचा थेट भाजपमध्ये प्रवेश
14
पुणे अपघात प्रकरण: गौतमी पाटीलला अश्रू अनावर, म्हणाली- "सगळे मला ट्रोल करत सुटलेत..."
15
Navi Mumbai Airport: भव्य, दिव्य अन् नजर खिळवून ठेवणारं, पण नवी मुंबई विमानतळाबद्दल 'या' गोष्टी माहिती आहे का?
16
स्मृती मानधना फ्लॉप ठरली तरी टॉपला; आता चुका सुधारून हिट शो द्यावाच लागेल, नाहीतर...
17
ICU मध्ये असलेल्या भाजप खासदाराची ममता बॅनर्जींनी घेतली भेट; म्हणाल्या, "जास्त सीरियस नाहीये."
18
अहो आश्चर्यम! महिलेने कुत्र्याच्या नावाने केलं मतदान; पोलखोल होताच पोलीसही झाले हैराण
19
₹450 कोटींचा बंगला अन् ₹639 कोटींचा डुप्लेक्स..; धनकुबेरांना आकर्षित करतेय वरळी 'सी फेस'
20
फक्त १० वर्षांत १ कोटीचा फंड कसा तयार करायचा? SIP मध्ये दरमहा किती गुंतवणूक करावी लागेल?

वॉटर कप स्पर्धेसाठी पवारवाडी एकवटली !

By admin | Updated: April 12, 2017 22:57 IST

३५० जणांचे श्रमदान : ‘पाणी आडवा, पाणी जिरवा’ मोहीम; यशस्वी करण्याचा ग्रामस्थांचा निर्धार

औंध : खटाव तालुका व कोरेगाव तालुक्याच्या सरहद्दीवर असलेल्या, औंधपासून सहा किलोमीटर अंतरावरील व कोरेगाव तालुक्यातील पवारवाडी या गावाने पिण्याच्या, शेतीच्या पाण्याची समस्या कायमस्वरूपी सोडविण्यासाठी गावाच्या भौगोलिक परिस्थितीचा लाभ उठवून ‘पाणी आडवा, पाणी जिरवा’ ही मोहीम एकजुटीने राबविण्याचा निर्णय घेतला आहे. मागील काही दिवसांपासून सुमारे ३५० नागरिक, महिला, युवक, युवतींनी कामाला प्रारंभ केला असून, यंदाच्या वॉटर कप स्पर्धेत बाजी मारण्याचा निर्धार ग्रामस्थांनी केला आहे. पवारवाडी हे गाव औंधच्या पश्चिमेला घाटाखाली सहा किलोमीटर अंतरावर आहे. घाटाखालील बऱ्याचशा गावांमधून कॅनॉल, पोटकॅनॉल गेले आहेत; पण पवारवाडी हे गाव हुकमी शेती पाण्यापासून वंचित आहे. गावामध्ये १९० कुटुंबे व ९०३ एवढी लोकसंख्या आहे. शेतीला शाश्वत पाणी नसल्याने गावातील बरेचसे नागरिक, युवक नोकरी, कामधंद्याच्या निमित्ताने बाहेरच आहेत.गावालगत पेरणी योग्य २३८ हेक्टर जमीन आहे. तर ९४ हेक्टरवर फॉरेस्ट, २२ हेक्टरवर सरकारी जमीन आहे. मात्र, पाणीच उपलब्ध होत नसल्याने रब्बी, उन्हाळी हंगामात या जमिनीतून पीक उत्पन्न निघत नाही. पिण्याच्या पाण्याची टंचाईही काहीवेळा जाणवते. या समस्येतून मार्ग काढण्यासाठी गावाच्या सभोवती असणाऱ्या उजाड डोंगर रांगांचा, चढ-उतारांचा उपयोग पाणी अडविण्यासाठी करण्याचा निर्णय ग्रामस्थांनी घेतला आहे. कृषी विभाग, वसंतदादा पाटील शिक्षण संस्था रहिमतपूर, पाणी फाउंडेशन, गावातील माजी विद्यार्थी संघटना, परांजपे अ‍ॅटोकास्ट आदींच्या सहकार्यातून हे काम तडीस नेण्यात येणार आहे. ४२ दिवसांत हे सर्व काम पूर्ण केले जाणार आहे, अशी माहिती सरपंच राजेंद्र पवार यांनी दिली.या माध्यमातून नालाबंडिंग, सलग समतल चर, डीपसीसीटी, बंधारे, माती बांध, तलाव दुरुस्ती, गाळ काढणे, विहिरींचे पुनर्भरण, अनगड दगडी बांध घालणे व अन्य कामे मोठ्या प्रमाणात केली जाणार आहेत. तसेच ठिबक सिंचन, मायक्रो स्प्रिंकलर योजनेद्वारेच शेतीच्या पाण्याचे नियोजन केले जाणार आहे. मागील दोन दिवसांपासून कामाने गती घेतली असून, सकाळी ७ ते ११ असे नियमित चार तास काम केले जाणार आहे. हे काम सुरू झाल्याने गावात उत्साह, आनंदाचे वातावरण असून, कोणत्याही परिस्थितीत गाव पाणीटंचाई मुक्त करायचेच असा दृढ निश्चय प्रत्येक ग्रामस्थ, महिला, युवक, युवतींच्या चेहऱ्यावर यावेळी दिसत आहे. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुनील माने, सरपंच राजेंद्र पवार, उपसरपंच सिंधुताई पवार, विलास पवार, पांडुरंग पवार, समन्वयक मोहन लाड, कृषी सहायक शिंदे, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. (वार्ताहर)