शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदी आणि नेपाळच्या हंगामी PM सुशीला कार्की यांचा फोनवरून संवाद, काय झाली चर्चा?
2
डोनाल्ड ट्रम्प पिच्छा सोडेना! आता भारताला टाकले ड्रग्ज उत्पादक, पुरवठा करणाऱ्या देशांच्या यादीत 
3
निवडणूक आयोगाने आधारहीन म्हणत राहुल गांधींचे आरोप फेटाळले, स्पष्टीकरणासह त्या दाव्यातील हवाच काढली
4
५० लाखांचा फ्लॅट घ्यायचा की गावी त्याच पैशांची जमीन? सोशल मीडियावर वाद सुरु झाला...
5
VIRAL : एकमेकांना पाडलं, केस धरून हाणलं; भर बाजारात नवरा-बायकोमध्ये जुंपली!
6
मी रमी खेळत होतो कशावरून? मंत्री माणिकराव कोकाटेंनी रोहित पवारांना कोर्टात खेचलं, अब्रुनुकसानीचा दावा दाखल
7
दीपिका पादुकोणची 'कल्की 2898 एडी' सिनेमातून एक्झिट, कारण आलं समोर
8
राहुल गांधींना निवडणूक आयोगातून कोण मदत करतेय? दाव्याने खळबळ
9
Shukra Pradosh 2025: पती-पत्नीचे बिघडलेले नातेही सुधारेल; शुक्र प्रदोषावर करा 'हे' उपाय!
10
प्रसिद्ध अभिनेत्रीचा मुलगा; ३६ व्या वर्षीही बॉलिवूडमध्ये करतोय संघर्ष; आता मिळाली मोठी संधी
11
राहुल गांधी यांचा सर्वात मोठा आरोप; मतचोरीचा पुरावा देत 'त्या' लोकांना थेट स्टेजवर बोलावले अन्...
12
सरकारी कर्मचारी-पेन्शनधारकांची दिवाळी होणार गोड! किती वाढणार पगार? मोठी अपडेट समोर
13
बेपत्ता महिला कॉन्स्टेबलची हत्या, कारमध्ये मृतदेह लपवला; आरोपी पोलिसाने सत्य सांगताच अधिकारी हैराण
14
Pune Firing: दुचाकीला साईड न दिल्याचे किरकोळ कारण; कोथरूड परिसरात निलेश घायवळ टोळीकडून गोळीबार, एक गंभीर जखमी
15
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचं 'मत'चोरीला संरक्षण; राहुल गांधी यांचा गंभीर आरोप
16
'ऑपरेशन ३१३'चा भांडाफोड! ३००हून अधिक मदरसा कॅम्प बांधण्याची तयारी होती सुरू, जैशचा मोठा कट उघडकीस
17
सासऱ्याच्या मृत्यूनंतर सून ढसाढसा रडली, संशय येताच पोलखोल झाली; 'ते' सत्य लपवण्यासाठी...
18
महाराष्ट्रातील या मतदारसंघात झाली मतचोरी, हजारो मतदार वाढले, राहुल गांधींचा पुराव्यानिशी सनसनाटी आरोप 
19
सेफ्टीमध्ये 'TATA'च एक नंबर, सलग नवव्या गाडीला मिळालं 5 स्टार रेटिंग; कोणती आहे कार?
20
जगातील सर्वात महान कर्णधार कोण? किरॉन पोलार्डनं 'या' दिग्गजाचं घेतलं नाव!

वाळवा पश्चिम भागात जलसंकट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2019 23:28 IST

इस्लामपूर : वाळवा तालुक्याच्या दोन्ही बाजूला कृष्णा आणि वारणा अशा दोन बारमाही नद्या वाहत असल्या तरी, तालुक्याच्या पश्चिम भागातील ...

इस्लामपूर : वाळवा तालुक्याच्या दोन्ही बाजूला कृष्णा आणि वारणा अशा दोन बारमाही नद्या वाहत असल्या तरी, तालुक्याच्या पश्चिम भागातील गावांमध्ये उन्हाळ्याच्या दिवसात पाणी टंचाईचे संकट ओढवतच असते. स्थानिक विहिरी आणि कूपनलिकेच्या माध्यमातून पिण्याच्या पाण्याची गरज भागली तरी, शेतीच्या पिकांसाठी पाणी मिळत नसल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होते.वाळवा तालुक्यामध्ये एकूण ९४ गावे आहेत. कृष्णा-वारणा नदीकाठचा पट्टा वगळता पश्चिम भागातील २५ ते ३0 गावांना नेहमीच पाणी टंचाईचा त्रास सोसावा लागतो. तालुक्यामध्ये एकूण २६ पाझर तलाव आहेत. त्यातील १९ पाझर तलाव पश्चिम भागात आहेत. उरलेले ७ पाझर तलाव ताकारी, पोखर्णी गावात २, गोटखिंडी गावात ३ व दुधारी गावात १ असे आहेत. पश्चिम भागात ४00 ते ५00 कूपनलिका आणि तेवढ्याच विहिरी आहेत. उन्हाळ्यामुळे भूजल पातळीत घट झाल्याने कूपनलिकेच्या पाण्यावरही त्याचा परिणाम झाला आहे. तालुक्यातील या २६ पाझर तलावांची पाणी साठवण क्षमता ही ३ हजार ५९१ सहस्र घनमीटर इतकी आहे. यातून ६८१ हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली आणण्याची क्षमता आहे. मात्र केवळ ३७६ हेक्टर क्षेत्र लागवडीच्या पाण्याखाली येते. मात्र या उन्हाळ्यात रेठरेधरण, कार्वे, येलूर या मोठ्या पाझर तलावातील पाणीसाठा वगळता, इतर सर्व तलाव कोरडे ठणठणीत पडले आहेत.पश्चिम भागातील महादेववाडी, माणिकवाडी, नायकलवाडी या गावांमधून पाणी टंचाईच्या झळा जाणवतात. मात्र लघु पाटबंधारे विभागामार्फत वाटेगाव येथील संस्थेचे पाणी अधिग्रहण करुन ते पुरवले जात आहे. जांभुळवाडी गावातील बांदल वस्ती आणि धनगर वस्तीलाही गावातीलच विहिरीचे पाणी उपलब्ध करुन दिले आहे. आतापर्यंत पश्चिम भागातील कोणत्याही गावामधून टँकरची मागणी झाली नसल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.तालुक्याच्या पश्चिम भागातील या पाणी टंचाईवर मात करण्यासाठी मरळनाथपूर, गाताडवाडी, ठाणापुडे, येलूर, गोटखिंडी, सुरुल, ओझर्डे, नागाव, पोखर्णी, शिवपुरी, लाडेगाव, जक्राईवाडी, वशीसह महामार्गालगत असलेल्या गावांतून पेयजल योजनांची कामे सुरु आहेत. यातील काही योजना अंतिम टप्प्यात आल्या आहेत.