फोटो ओळी : वाटेगाव-सुरुल शाखा कार्यस्थळावर दादासाहेब मोरे यांच्याहस्ते रोलर पूजन करण्यात आले. यावेळी देवराज पाटील, संताजी चव्हाण, संभाजी सावंत, कुमार पाटील, राजेंद्र गर्जे उपस्थित होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
इस्लामपूर : राजारामबापू सहकारी साखर कारखान्याची वाटेगाव-सुरुल शाखा यंदाच्या गळीत हंगामात ऊस गाळप आणि साखर उताऱ्यात अव्वल कामगिरी करेल, असा विश्वास कारखान्याचे संचालक दादासाहेब मोरे यांनी व्यक्त केला.
वाटेगाव-सुरुल शाखेत मोरे यांच्याहस्ते रोलर पूजन करण्यात आले. यावेळी जिल्हा नियोजन समितीचे सदस्य देवराज पाटील, कासेगावचे उपसरपंच दाजी गावडे, मुख्य अभियंता संताजी चव्हाण, रसायन तज्ज्ञ संभाजी सावंत उपस्थित होते.
देवराज पाटील म्हणाले, जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांचे अथक परिश्रम व दूरदृष्टीतून वाटेगाव-सुरुल शाखा उभा राहिली आहे. या शाखेने स्थापनेपासून यशस्वी वाटचाल कायम ठेवल्याचा आम्हा सर्वांना अभिमान आहे.
यावेळी पंकज पवार, राजेंद्र गर्जे, अनिल पाटील, शिवाजी चव्हाण, संदीप गुरव, कुमार पाटील, ए. बी. पाटील, सचिन पडळकर, दिलीप कदम, आर. के. माने, पतंग वांगीकर, सुरक्षा अधिकारी दत्तात्रय गायकवाड, जयकर पाटील, संजय पाटील, पांडुरंग पवार, विठ्ठल मोरे, शेखर पाटील उपस्थित होते.