शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासाठी मिळणार चांगली बातमी? H-1B च्या तणावादरम्यान एस जयशंकर आणि अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्र्यांची भेट
2
ट्रम्प यांच्या 50 टक्के टॅरिफला भारतानं का दिलं नाही उत्तर? राजनाथ सिंह यांचा परदेशातून मोठा खुलासा!
3
IND vs PAK : भारताला हरवायचंय? मग सेना प्रमुखांसोबत ओपनिंग करा! इम्रान खानचा PCB अध्यक्षाला यॉर्कर
4
'मला रिकामं ठेवू नका'; धनंजय मुंडेंच्या विनंतीवर अजित पवार म्हणाले, 'सूचनेचे पालन केलं जाईल'
5
"ED, EVM, भौकने वाले..., फौज तेरी भारी है; जंजीरों में जकड़ा हुआ जयंत पाटील..." पडळकरांच्या वक्तव्यावरून अमोल कोल्हेंचा हल्लाबोल
6
'सुप्रीम कोर्ट आता बेल कोर्ट बनलं आहे'; जामीन अर्जांची संख्या पाहून न्यायमूर्ती नागरत्ना यांनी व्यक्त केली चिंता
7
IND vs AUS : मॅच आधी टीम इंडियाचा कॅप्टन बदलला! श्रेयस अय्यर अचानक घरी परतला; कारण....
8
"सनातनी हज यात्रेला जात नाहीत, त्यांच्या लोकांनीही...; गरबा मंडपाच्या दरवाजावर गोमूत्र ठेवा!"; धीरेंद्र शास्त्री यांचा सल्ला
9
"२० ओव्हर्स टिकणार त्या दिवशी २०० धावा ठोकणार"; अभिषेक शर्मासंदर्भात मोठी भविष्यवाणी
10
बाई, काय हा प्रकार! पाकिस्तान बेक्कार हरला, तरीही हॅरिस रौफच्या बायकोने केली 'तशी' पोस्ट
11
उद्धवसेनेच्या दसऱ्या मेळाव्याला राज ठाकरे जाणार? टिझरने वेधले लक्ष, मिळाले सूचक संकेत!
12
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
13
India vs West Indies Test Series: गिलच्या संघातून रिषभ पंत 'आउट'; कोण घेणार त्याची जागा?
14
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
15
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
16
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
17
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
18
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
19
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले
20
मुक्या जीवाचे हाल! गायीच्या डोळ्यांवर पट्टी बांधली, फेकलं नाल्यात; काळजात चर्र करणारी घटना

जलपुरुषाच्या कार्यक्रमाची जंगी तयारी

By admin | Updated: October 29, 2015 00:15 IST

जलपरिक्रमासाठी अर्जुना नदीची निवड

राजापूर : डिसेंबर महिन्यात राजापूर दौऱ्यावर येणारे जलपुरुष डॉ. राजेंद्र सिंह व राज्याच्या ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे - पालवे यांच्या कार्यक्रमाची जोरदार तयारी सुरु असून, त्यावेळी अर्जुना नदी परिक्रमा व ग्रामस्थ मेळावा पार पडणार आहे.कोकणात दरवर्षी तुफान पाऊस पडूनदेखील उन्हाळी दिवसात तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागतो. याबाबत कोकण भूमी प्रतिष्ठानच्यावतीने पुढाकार घेण्यात आला असून, कोकणातील नद्या बारमाही सजीव राहतील व त्याचा फायदा सर्वांना होईल या हेतूने जलपुरुष व मॅगेसेसे पुरस्कार विजेते डॉ. राजेंद्र सिंह यांच्या सहकार्यातून व जनतेच्या सहभागातून हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. त्यासाठी कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यातील खेडमधील जगबुडी व राजापूर तालुक्यातील अर्जुना या नद्यांना सर्वप्रथम समाविष्ट करण्यात आले आहे. त्यानुसार या नद्यांच्या परिक्रमेसाठी स्वत: डॉ. राजेंद्र सिंह हे १ ते ५ डिसेंबर या कालावधीत कोकणात येत आहेत. १ डिसेंबरला त्यांच्या कार्यक्रमाची सुरुवात होणार असून, ४ डिसेंबरला ते राजापुरात येतील. त्यांच्यासमवेत राज्याच्या ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे - पालवे, पालकमंत्री रवींद्र वायकर यांच्यासहित अन्य मान्यवर उपस्थित राहणार आहेत. ४ डिसेंबरला ओणीमध्ये मेळावा पार पडल्यानंतर राजापुरात गणेश विसर्जन घाटावर पूजन होईल असा नियोजित कार्यक्रम आहे. त्याची जय्यत तयारी सुरु आहे. त्याचाच एक भाग म्हणून पुढील महिन्यात संपूर्ण अर्जुना नदीची परिक्रमा आयोजित करण्यात आली आहे. यावेळी जेथे अर्जुना नदीचा उगम होतो त्या स्थानापासून समुद्र संगमापर्यंत उभय काठावरील गावातील ग्रामस्थांच्या गाठीभेटी घेतल्या जाणार आहेत.अर्जुना नदीच्या उगमापासून उत्तरेला करक, पाचल पेठवाडी, येळवण, खडीकोळवण, सौंदळ, चिखलगाव, गोठणे दोनिवडे, शीळ, राजापूर, धुतपापेश्वर, गोळव, शिवणे, सोगमवाडी, सोड्येवाडी, राऊतवाडी, बुरंबेवाडी, धाऊलवल्ली, नाटे, साखरीनाटे तर दक्षिणेला करक, तळवडे, पाचल, रायपाटण, बागवेवाडी, परटवली, आडवली, फुफेरे, आंगले, शेंबवणे, दोनिवडे, उन्हाळे, राजापूर, कोंडेतड, कणेरी, शेढे, डोंगर, विलये, पडवे, मिरगुलेवाडी, चव्हाणवाडी, दळे, आगरवाडी, जैतापूर व जुवे जैतापूर अशी गावे येत आहेत. (प्रतिनिधी)1जलपरिक्रमासाठी अर्जुना नदीची निवडनद्यांना लोकसहभागातून बारमाही प्रवाह कसा राहिल यासहित नदीकाठच्या गावातील किनाऱ्यांवर आधुनिक शेती व त्यातून समृद्धी करणे, नद्यांवर छोटी धरणे बांधणे, नद्यांचा डोह खोल करणे अशी कामे भविष्यात केली जाणार आहेत व त्यासाठीच अर्जुना नदीची निवड करण्यात आली आहे.2दरवर्षी तालुक्यातील अनेक गावांना पाणीटंचाईची झळ बसते. या गावांना पिण्याच्या पाण्याबरोबरच शेतीसाठीही पाणी उपलब्ध व्हावे यासाठी ही योजना राबविण्यात येत आहे.