सांगली : महापालिकेने ३७७ बदली कामगारांना कायम सेवेत घ्यावे, अन्यथा बेमुदत ठिय्या आंदोलनाचा इशारा डेमोक्रॅटीक पार्टीने दिला आहे.
संघटनेचे कामगार आघाडीप्रमुख सुब्राव मोहिते, वीरू फाळके, संदीप ठोंबरे, सतीश लोंढे यांनी सांगितले की, यासाठी पालकमंत्री जयंत पाटील यांनाही २३ मार्चला निवेदन दिले होते. महापालिका आयुक्तांनी या विषयात गांभीर्याने लक्ष घालून लाड-पागे समितीच्या शिफारशींची अंमलबजावणी करावी. कर्मचाऱ्यांसाठी घरकुल योजना राबवावी. यासाठी संघर्ष जनरल श्रणजीवा कामगार संघटनेतर्फे उपसचिवांनाही निवेदन दिले जाणार आहे.
आरोग्य विभागातील बदली कामगारांना महिन्यात २६ दिवस काम मिळावे अशी मागणीही त्यांनी केली. यावेळी मंगेश भोसले, शीतल खरात, लखन ठोंबरे, जयवंत साठे, तानाजी लोंढे, अशोक वायदंडे, समर सरवदे हेदेखील उपस्थित होते.