कुरळप : सहकारामुळे ग्रामीण अर्थकारणात आमूलाग्र बदल झाले आहेत. ग्रामीण जनतेला या सहकारामुळे जगण्याची एक नवी दिशा मिळाली आणि हा मूलमंत्र वारणा उद्योग व शिक्षण समूहाने दिला असून, सहकार हा वृद्धिंगत केला पाहिजे, असे मत वारणा उद्योग समूहाचे नेते आ. डॉ. विनय कोरे यांनी व्यक्त केले.
तात्यासाहेब कोरे वारणा सहकारी साखर कारखान्याची ऑनलाइन वार्षिक सर्वसाधारण सभा नुकतीच पार पडली. ऐतवडे खुर्द (ता. वाळवा) येथे बाजीराव बाळाजी पाटील सभागृहातून ऑनलाईन सभेसाठी नियोजन केले होते. यावेळी राज्य सहकारी संघाचे अध्यक्ष डॉ. प्रताप पाटील यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून सभेची सुरुवात झाली.
या ऑनलाइन सभेचा मुख्य कार्यक्रम वारणानगर येथून वारणा सहकारी साखर कारखान्याच्या कार्यक्षेत्रावर झाला. कारखाना कार्यक्षेत्रातील विविध गावांतील शेतकरी ऑनलाईन सहभागी झाले होते. सभेत सर्वात जास्त सभासद असणारे ऐतवडे खुर्द या गावातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
यावेळी भाऊसाहेब पाटील, सतीश पाटील, शंकर पाटील, दादासाहेब पाटील आदींसह सर्व संस्थांचे अध्यक्ष, संचालक व सभासद उपस्थित होते.