सांगली : विश्रामबाग येथील प्रभाग समिती दोनच्या आवारातील निलगिरीची झाडे सोमवारी महापालिकेने तोडली. ही झाडे उंच झाल्याने धोकादायक बनली होती. २० फूट उंचीवरील फांद्या तोडण्यात आल्याचे प्रभारी उद्यान अधीक्षक गिरीश पाठक यांनी सांगितले.
महापालिकेच्या प्रभाग समिती दोनचे कार्यालय नुकतेच विश्रामबाग परिसरात स्थलांतरित करण्यात आले आहे. पूर्वी हा भूखंड शिक्षक संघाला भाडेतत्त्वावर देण्यात आला होता. या भूखंडावर दिवंगत माजी आमदार शि. द. पाटील यांच्या निधीतून इमारत बांधण्यात आली. तसेच या जागेवर निलगिरीचीही झाडे लावली होती. मुदत संपल्यानंतर ही जागा महापालिकेेने ताब्यात घेतली.
दरम्यान, या झाडांची उंची अधिक वाढल्याने गेल्या महासभेत उंची कमी करण्याबाबत ठराव करण्यात आला होता. त्यानुसार महापालिकेने लिलाव काढून सोमवारी झाडांची उंची कमी केली. २० फुटांपर्यंत उंची ठेवण्यात आल्याचे अधीक्षक पाठक यांनी सांगितले.