शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

युतीच्या अस्तित्वाचीच इस्लामपूरमध्ये लढाई -: विधानसभेच्या नव्या समीकरणांची पेरणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2019 00:51 IST

इस्लामपूर विधानसभा मतदारसंघ राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. मात्र गेल्या दोन वर्षांपासून त्यांच्या या बालेकिल्ल्यातील सर्वात मोठे शहर असणाऱ्या

युनूस शेख ।इस्लामपूर : इस्लामपूर विधानसभा मतदारसंघ राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. मात्र गेल्या दोन वर्षांपासून त्यांच्या या बालेकिल्ल्यातील सर्वात मोठे शहर असणाऱ्या इस्लामपूरवर भाजप-सेना आणि विकास आघाडीने कब्जा मिळवला आहे. विधानसभेची रंगीत तालीम म्हणून जयंत पाटील विरोधकांकडून लोकसभा निवडणुकीत जोर लावला जाणार आहे.

गत लोकसभा निवडणुकीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे विद्यमान खासदार राजू शेट्टी यांना येथून मिळालेले २३ हजार ४४५ मतांचे अधिक्य टिकेल का, याची उत्सुकता आहे. गेल्या निवडणुकीत भाजप-सेनेची साथ करताना शेट्टी यांनी काँग्रेस आघाडीचा विरोध पत्करून हे मताधिक्य मिळवले होते. यावेळी शेट्टी यांच्याविरोधात शिवसेनेकडून धैर्यशील माने यांचे नाव पुढे येत आहे, तर रयत क्रांती आघाडीकडून कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत रिंगणात उतरण्यासाठी धडपडत आहेत.

लोकसभेच्या गेल्या दोन निवडणुकांत स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या राजू शेट्टी यांनी काँग्रेस आघाडीच्या साखर कारखानदारांच्या पट्ट्यात दोनवेळा धोबीपछाड देत खासदारकी पटकावली. शेतकऱ्यांसाठी झगडणारा नेता अशी त्यांची प्रतिमा आणि ऊस दरासाठी केलेली आंदोलने ही मतदारांच्या मनावर भुरळ पाडणारी ठरली. येत्या निवडणुकीसाठी काँग्रेस आघाडीबरोबर त्यांची चर्चा सुरू आहे.

इस्लामपूर विधानसभा मतदार संघात वेगवेगळ्या पक्षात विरोधक विखुरले असले तरी, आ. जयंत पाटील यांना विरोध या मुद्यावर सर्वांचे एकमत होते. ‘स्वाभिमानी’तून बाहेर पडल्यानंतर रयत क्रांती आघाडीची स्थापना केलेले सदाभाऊ खोत वर्षभरापासून शेट्टींविरोधात रान तापवत होते. हातकणंगलेतून लढणारच याचाही त्यांनी वारंवार उच्चार केला होता; मात्र वरिष्ठ पातळीवर युतीच्या चर्चेत हा मतदारसंघ शिवसेनेला गेला आहे. यापूर्वी शेट्टींसोबत असणारे ज्येष्ठ नेते नानासाहेब महाडिक, राहुल महाडिक, आमदार शिवाजीराव नाईक, हुुतात्मा उद्योग समूहाचे नेते वैभव नायकवडी, नगराध्यक्ष निशिकांत भोसले-पाटील, नगरसेवक विक्रम पाटील, गौरव नायकवडी, सेनेचे जिल्हाप्रमुख आनंदराव पवार आणि तोकड्या ताकदीवर नेहमीच समाधानी राहिलेले काँग्रेसचे पदाधिकारी आता त्यांच्याविरोधात जाणार का, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. शेट्टींचे या सर्वांशी असणारे स्नेहपूर्ण संबंध याही निवडणुकीवेळी उपयुक्त ठरावेत यासाठी ‘स्वाभिमानी’चे पदाधिकारी त्यांच्या संपर्कात राहत आहेत.राजू शेट्टींना नेहमीच अधिक्यइस्लामपूर विधानसभा मतदारसंघातून गत लोकसभेला खा. राजू शेट्टी यांना ९५ हजार ३९२ मते मिळाली होती, तर त्यांचे प्रतिस्पर्धी काँग्रेसचे कल्लाप्पाण्णा आवाडे यांना ७१ हजार ९४७ मते मिळाली होती. या निवडणुकीत शेट्टी यांनी २३ हजार ४४५ मतांचे अधिक्य घेतले होते.इस्लामपूर विधानसभा मतदारसंघस्त्री मतदार- १,३१,0१३ च्पुरुष मतदार-१,३७,0७३एकूण मतदार— २,६८,0८६

टॅग्स :PoliticsराजकारणLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक