शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
5
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
6
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
7
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
8
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
9
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
10
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
11
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
12
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
13
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
14
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
15
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
16
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
17
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
18
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
19
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
20
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

आर्ट गॅलरीला वारली चित्रकलेचा साज! पर्यटकांना आनंद : चिंचोली येथे चित्रकार अशोक जाधव यांची किमया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2018 00:08 IST

पुनवत : चिंचोली (ता. शिराळा) येथील चित्र आणि काष्ठशिल्पकार अशोक जाधव यांनी त्यांच्या आर्ट गॅलरीचे बाह्यांग

सहदेव खोत ।पुनवत : चिंचोली (ता. शिराळा) येथील चित्र आणि काष्ठशिल्पकार अशोक जाधव यांनी त्यांच्या आर्ट गॅलरीचे बाह्यांग आदिवासी वारली चित्रकलेने सजविले आहे. गॅलरीच्या भिंतीवरील वारली जीवनशैलीतील प्रसंगचित्रे पाहून पर्यटक आनंदित होत आहेत.

चिंचोलीसारख्या खेडेगावात चित्रकार जाधव यांनी उभारलेली आर्ट गॅलरी पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्र आहे. जाधव यांनी पिंपळ पानावरील चित्रे, निसर्गचित्रे, रचनाचित्रे, आकर्षक काष्ठशिल्पे, शास्त्रीय, पाश्चिमात्य तसेच लोकनृत्ये यांची माहिती देणारी कात्रणे, जगातील वस्तुसंग्रहालयांची माहिती देणारी कात्रणे, भारतीय व पाश्चिमात्य चित्रकारांचा माहितीपट, सात हजार काड्यापेटींचा संग्रह, गावगाड्यातील जुन्या कालबाह्य झालेल्या वस्तूंचा संग्रह, कलाविषयक पुस्तके असा अनमोल खजिना येथे ठेवला आहे. नैसर्गिक लाकडांपासून कल्पक दृष्टीने बनविलेली काष्ठशिल्पे लक्षवेधी आहेत.

आता गॅलरीच्या वैभवात भर म्हणून जाधव यांनी बाहेरच्या भिंतीवर आदिवासी वारली समाजातील जीवनशैली चित्ररूपाने साकारली आहे. वारली लोक भिंतीवर पांढºया पिठाने साधे व सुबक आकार रंगवतात हे या कलेचे वैशिष्ट्य. जाधव यांनी भिंतीवर वारली समाजातील पाणी भरणाºया स्त्रिया, जात्यावरील दळण, बैलगाडी, पेरणी, पीक कापणी नृत्ये, संध्याकाळचे जेवण, सण, विवाह, वारली समाजाची वाद्ये आदी प्रसंगचित्रे काढली आहेत. ती पर्यटकांना थक्क करणारी आहेत. या चित्रांतून वारली कलेची ओळख कलाप्रेमींना होत आहे .

चित्रांमागचा उद्देश...चित्रकार अशोक जाधव म्हणाले, वारली चित्रकला जगप्रसिद्ध आहे. हे लोक जरी साधे जीवन जगत असले तरी त्यांची चित्रकला अफलातून आहे. ते निसर्गावर प्रेम करणारे आहेत. त्यांच्या कलेची ग्रामीण भागात ओळख व्हावी व प्रत्येकाने त्यांच्यासारखे निसर्गावर प्रेम करावे. हा या या चित्रांमागला उद्देश आहे.