शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदार याद्यांचा घोळ कायम, बिहारच्या उपमुख्यमंत्र्यांच्याच नावे २ व्होटर कार्ड; तेजस्वी यादव यांनी केली पोलखोल
2
भारत जगात सर्वांत वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था; ट्रम्प यांच्या 'डेड इकॉनॉमी'ला अप्रत्यक्ष उत्तर
3
गरज पडल्यास कबुतरखान्यासाठी शस्त्र उचलणार; जैन मुनी नीलेशचंद्र विजय यांच्या वक्तव्याने नवा वाद
4
लोकसभेच्या ४८ जागा, ५० हजारांपेक्षा कमी फरक; २०१९ च्या सार्वत्रिक निवडणुकीवर काँग्रेसचा मोठा दावा
5
'ओबीसी समाज श्रीमंत मराठ्यांविरोधात जाऊ नये, हाच शरद पवारांच्या मंडळ यात्रेचा हेतू'; प्रकाश आंबेडकरांचा टोला
6
'मतचोरी' विरोधात इंडिया आघाडीचे उद्या शक्तिप्रदर्शन, राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली खासदार संसदेपासून निवडणूक आयोगाच्या कार्यालयापर्यंत मोर्चा काढणार
7
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोरील अडचणी वाढणार? शकुन राणीला 'डबल व्होटर' म्हणून फसले; आयोगाने बजावली नोटीस
8
'बुडायला लागलो तर अर्धे जग सोबत घेऊन जाणार'; पाकिस्तानची भारताला पुन्हा अणु हल्ल्याची धमकी!
9
रामदास आठवले महाराष्ट्र भाजपवर नाराज; थेट पीएम मोदींकडे केली तक्रार, कारण काय?
10
ब्रिटनच्या F-35B विमानामागचं शुक्लकाष्ठ सुटेना, आता या देशात करावं लागलं आपातकालीन लँडिंग
11
मनी लॉंड्रिंगप्रकरणी रॉबर्ट वाड्रांच्या अडचणीत वाढ; दोन कंपन्यांद्वारे ५८ कोटी रुपये कमावल्याचा आरोप
12
"जेव्हा देशासाठी निवड होते, तेव्हा..."; मराठमोळ्या 'वर्ल्ड चॅम्पियन'ने जसप्रीत बुमराहला सुनावलं
13
मासे खरेदी करण्यावरून दोन गटांमध्ये तुफान राडा, एकमेकांना लाथा-बुक्क्यांनी मारले
14
टस्कर हत्तीने भिंत फाेडून घरात केला प्रवेश; जीवनावश्यक साहित्याची नासधूस, छत्तीसगड सीमेलगतच्या मंजिगड टाेला येथील घटना
15
फक्त १२७९ रुपयांत करा हवाई प्रवास; Air India ने आणली खास ऑफर, जाणून घ्या डिटेल...
16
मत चोरीच्या मुद्यावरुन लक्ष वळवण्याचा प्रयत्न; हवाई दल प्रमुखांच्या वक्तव्यावर काँग्रेस नेत्याची टीका
17
IPS वडिलांनी कॉन्स्टेबलला बडतर्फ केलं, त्यांच्याच मुलीने कोर्टात खटला लढवून पुन्हा सेवेत घेतलं; नेमकं प्रकरण काय?
18
रोहित शर्मा, विराट कोहलीची वनडे क्रिकेटमधूनही लवकरच निवृत्ती? गौतम गंभीरचे विधान व्हायरल
19
धक्कादायक! तीन मुलांसह आईने संपवलं जीवन, लेकरांना पोटाला बांधलं आणि… 
20
विठुमाऊलीच्या मंदिरात मायमराठीची उपेक्षा, गुरुजींनी हिंदीत सांगितली पूजा? पोस्ट व्हायरल

पालिकेसाठी फुटकळ दादाही इच्छुक

By admin | Updated: October 27, 2015 00:11 IST

अवैध व्यवसायाचा परिणाम : इस्लामपूर राष्ट्रवादीत बंडाळीचे संकेत

अशोक पाटील -- इस्लामपूर--आघाडी शासनाने जिल्ह्यामध्ये मटका बंदी आणली होती. मात्र सध्या खुलेआम मटका सुरू असून, यामध्ये बहुतांशी राजकीय मंडळी आहेत. हा मटका बंद करण्याचा इशारा भाजपचे लोकप्रतिनिधी देत आहेत. यामुळे चोराच्या उलट्या बोंबा सुरू असल्याचे चित्र दिसत आहे. मटका व्यवसायातूनच गल्लीबोळात फुटकळ दादांची गर्दी वाढली आहे. तेच आता आगामी पालिका निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत. त्यामुळे राष्ट्रवादीतच बंडाळी होण्याचे संकेत मिळत आहेत.आगामी पालिका निवडणुकीला अजून दीड वर्षाचा कालावधी आहे. त्यातच प्रभाग रचना बदलली असून, आता छोटे प्रभाग झाले आहेत. त्यामुळे गल्लीबोळात लाख, दीड लाख रुपये खर्च करण्याची ऐपत असणारेही यंदाची पालिका निवडणूक लढवण्याची भाषा करू लागले आहेत. यामध्ये राष्ट्रवादीतीलच बहुतांशी कार्यकर्त्यांचा समावेश आहे. राष्ट्रवादीने उमेदवारी दिली नाही, तर बंडखोरी करून अपक्ष निवडणूक लढवणार असल्याचेही ते बोलत आहेत. ही संख्या वाढत चालल्याने राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांच्यासमोरील डोकेदुखी वाढणार आहे. नुकत्याच झालेल्या बाजार समितीच्या निवडणुकीत राष्ट्रवादीतीलच बाळासाहेब कोरे यांनी बंडखोरी केली. जयंत पाटील यांचा आदेश पाळला नाही. आता पालिकेत प्रत्येक प्रभागातून एकास एक उमेदवारन राहता उमेदवारांची संख्या वाढणार आहे.मागीलवेळी प्रभागांची संख्या कमी होती. तीन प्रभागांचा एक प्रभाग होता. एका प्रभागात ३ ते ४ उमेदवार निवडून द्यायचे होते. यावेळी मात्र प्रत्येक प्रभागासाठी स्वतंत्र उमेदवार असतील. त्यामुळे निवडणुकीसाठी लागणाऱ्या पैशात बचत होणार आहे. राष्ट्रवादीमध्ये उमेदवाराच्या मुलाखती घेतानाच शैक्षणिक गुणवत्तेऐवजी त्याची आर्थिक परिस्थिती तपासली जाते. त्यामुळे गल्लीबोळात लाख-दोन लाख रुपये खर्च करणाऱ्या कार्यकर्त्यांना आतापासूनच नगरसेवक होण्याची स्वप्ने पडू लागली आहेत.विरोधक नगण्य : सक्षम नेतृत्वच नाहीइस्लामपूर शहरातील विरोधकांमध्ये ताळमेळ नाही. त्यांच्यामध्ये सक्षम नेतृत्व नाही. त्यामुळे विरोधकांत या पातळीवर स्मशानशांतता आहे. भाजपचे विक्रम पाटील निवडणुकीसाठी कार्यकर्त्यांची जुळवाजुळव करण्याच्या प्रयत्नात आहेत. परंतु त्यांना त्यांच्याच पक्षातील काही पदाधिकाऱ्यांची साथ नसल्याचे निदर्शनास आले आहे.छोटे व्यावसायिकही इच्छुकधनदांडगे विद्यमान नगरसेवक स्वत:सह घरातील वारसदारांनाही निवडणुकीच्या रिंगणात उतरविण्याच्या तयारीत आहेत. शहरातील वडापाव, भाजीपाला विक्रेत्यांनाही नगरसेवक होण्याची स्वप्ने पडू लागली आहेत. अशा भाऊगर्दीमुळे निवडणूक तिरंगी, चौरंगी आणि बहुरंगी होणार आहे. एकूणच आगामी निवडणूक लक्षवेधी ठरणार, हे निश्चित.