शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

वाकुर्डे योजना ताकदीने पूर्ण करणार :जयंत पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2020 13:39 IST

वाकुर्डे योजना पूर्ण ताकद लावून पूर्ण करणार आहे. विरोधकांना पुढील निवडणुकीत या योजनेवर बोलण्याची संधी देणार नाही, असे प्रतिपादन जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी केले.

ठळक मुद्देवाकुर्डे योजना ताकदीने पूर्ण करणार :जयंत पाटीलफत्तेसिंगराव नाईक कृषी प्रदर्शन, उपजिल्हा रुग्णालयाचे उद्घाटन

शिराळा : वाकुर्डे योजना पूर्ण ताकद लावून पूर्ण करणार आहे. विरोधकांना पुढील निवडणुकीत या योजनेवर बोलण्याची संधी देणार नाही, असे प्रतिपादन जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी केले.शिराळा येथील मरिआई चौकात नागरी सत्कार तसेच फत्तेसिंगराव नाईक कृषी प्रदर्शन, उपजिल्हा रुग्णालयाचे उद्घाटन अशा संयुक्त कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी आरोग्य मंत्री राजेश टोपे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

आमदार मानसिंगराव नाईक, खासदार धैर्यशील माने, माजी आमदार बाबासाहेब पाटील, सुनीतादेवी नाईक, अश्विनी नाईक, सुरेश चव्हाण, अ‍ॅड. भगतसिंग नाईक, अमरसिंह नाईक, राजेंद्र नाईक, सम्राटसिंह नाईक यांची प्रमुख उपस्थिती होती.जयंत पाटील म्हणाले, वाकुर्डे योजनेचे काम पूर्ण करून फत्तेसिंगराव नाईक यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठीच या खात्याचे मंत्रीपद मला मिळाले आहे. त्यामुळे ही योजना पूर्ण करण्यासाठी जेवढा निधी लागेल तो देऊ. पाच वर्षांत ही योजना पूर्ण करणार आहे. त्यामुळे विरोधकांना आता वेगळा विषय निवडावा लागेल.

शिराळा नगरपंचायत तसेच राज्यातील नवीन नगरपंचायत ना शासकीय जागा उपलब्ध करुन देण्यासाठी आपण खास बैठक बोलावणार आहे. शिराळा येथील उपजिल्हा रुग्णालयाच्या इमारतीचा आदर्श घेऊन सर्व ठिकाणी अद्ययावत इमारत बांधून चांगली आरोग्य सेवा द्यावी. आमदार मानसिंगराव यांनी या मतदारसंघाचा २००९ ते २०१४ दरम्यान विकास करुन एक आदर्श निर्माण केला आहे.आमदार नाईक म्हणाले, तहसीलदार कार्यालय, शिराळा बसस्थानक, पंचायत समिती इमारत, उपजिल्हा रुग्णालय आदी ५१५ कोटींची विकास कामे २००९-१४ मध्ये झाली. येथे चांगली आरोग्य सेवा उपलब्ध व्हावी, यासाठी प्रयत्न असतील. वाकुर्डे योजना पूर्ण करण्यासाठी यावर्षी ५० कोटी व पुढीलवर्षी ११० कोटी रुपयांचा निधी मिळावा.खासदार धैर्यशील माने म्हणाले, नागपंचमी व बैलगाडी शर्यतीसाठी आपण दिल्लीमध्ये पूर्ण ताकदीने प्रयत्न करत आहोत. राज्य सरकारनेही यासाठी मदत करावी.

विजयराव नलवडे यांनी स्वागत केले. याप्रसंगी दिनकर पाटील, नगराध्यक्षा अर्चना शेटे, सुनंदा सोनटक्के, प्रमोद नाईक, देवेंद्र पाटील, कीर्तीकुमार पाटील, मंजुषा पाटील, छायाताई पाटील, वैशाली माने, बाळासाहेब नायकवडी, विवेक नाईक, राम पाटील, भूषण नाईक, रोहित नाईक, विश्वप्रताप नाईक, पल्लवी पाचपुते, रंजना नाईक, शुभलक्ष्मी नाईक, कोल्हापूर जिल्हा परिषदेचे बांधकाम सभापती हंबीरराव पाटील, बाबासाहेब पवार उपस्थित होते.

टॅग्स :shirala-acशिराळाSangliसांगली