शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

सांगली वस्तुसंग्रहालयास प्रशस्त जागेची प्रतीक्षाच..!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 21, 2018 23:52 IST

शरद जाधव । लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : अत्यंत दुर्मिळ व ऐतिहासिक ठेवा असलेल्या सांगली वस्तुसंग्रहालयास सध्याची जागा अपुरी ...

शरद जाधव ।लोकमत न्यूज नेटवर्कसांगली : अत्यंत दुर्मिळ व ऐतिहासिक ठेवा असलेल्या सांगली वस्तुसंग्रहालयास सध्याची जागा अपुरी पडत असल्याने नवीन जागेचा प्रस्ताव शासनदरबारी सादर करण्यात आला आहे. सांगली शहरातील जुन्या जिल्हाधिकारी कार्यालयातील काही भाग या वस्तुसंग्रहालयासाठी मिळाल्यास जुनी ऐतिहासिक इमारत व त्यामध्ये दुर्मिळ ठेवा पाहण्याची दुहेरी संधी सांगलीकरांना मिळणार आहे. वस्तुसंग्रहालयास जागा मिळावी यासाठी प्रस्ताव सादर करण्यात आला असला तरी, नवीन जागेपेक्षा जुन्या जिल्हाधिकारी कार्यालयाची इमारतच सोयीस्कर ठरणार आहे.राज्यातील १४ वस्तू संग्रहालयामध्ये सर्वात जुने व जगभरातील अनमोल ठेवा असलेले वस्तुसंग्रहालय सांगलीत आहे. औधनंतर सर्वात दुर्मिळ ठेवा सांगलीत आहे. सध्या जुन्या जिल्हाधिकारी कार्यालयाजवळच एका अरूंद व कमी जागेतच अनेक वस्तूंची मांडणी करण्यात आली आहे. यात पुरातन काळातील दस्तावेज, राजघराण्यातील व्यक्तींच्या वस्तू, त्यांची दुर्मिळ छायाचित्रे, जगभरातील वस्तूंचा समावेश आहे. सध्या याठिकाणी कार्यरत कर्मचाऱ्यांच्यावतीने वस्तुसंग्रहालयाची डागडुजी करण्यात येत असली तरी, पावसाळ्यात पाणी आत येऊन वस्तू इजा पोहोचण्याचा धोका निर्माण होत असतो. तसेच कमी जागा असल्याने अनेक वस्तू प्रदर्शनाविना झाकून ठेवाव्या लागत आहेत.सांगलीत येणारे पर्यटक आवर्जून वस्तुसंग्रहालयास भेट देतात व त्याची पाहणी करतात. मात्र, बाहेर पार्किंगचीही योग्य सुविधा नसल्याने पर्यटकांचीही अडचण होते. शैक्षणिक सहलीच्या निमित्ताने विद्यार्थीही आवर्जून या संग्रहालयास भेट देत असतात.वस्तुसंग्रहालयाची सध्याची इमारत कमी पडत असल्याने प्रशासनाच्यावतीने जिल्हाधिकाºयांकडे नवीन जागेची मागणी करण्यात आली आहे. त्यानुसार विजयनगर परिसरातच जागा देण्याबाबत कार्यवाही होणार होती. मात्र, शहराच्या मध्यवर्ती भागातच वस्तुसंग्रहालय असणे पर्यटकांच्यादृष्टीने आवश्यक आहे. जुन्या जिल्हाधिकारी कार्यालयातीलच काही भाग यास मिळाल्यास फायदा होणार आहे.स्थलांतर झाल्यापासून संपूर्ण इमारत पडून होती. आता गेल्याच आठवड्यात मुद्रांक जिल्हाधिकारी व दुय्यम उपनिबंधकांना या इमारतीमधील काही भाग देण्यात आल्याने त्यांचे कामकाज सुरू झाले आहे.अडगळीतील इमारतही प्रकाशात!वस्तुसंग्रहालयास जुन्या जिल्हाधिकारी कार्यालयाची इमारत मिळाल्यास दुर्मिळ वस्तूंबरोबरच ऐतिहासिक इमारतही पर्यटकांना पाहावयास मिळणार आहे. संग्रहालय विभागाकडून तिथे फर्निचर, सुरक्षा व्यवस्था व इतर सुविधा करून सुसज्ज वस्तुसंग्रहालय उभे राहू शकते. सध्या अक्षरश: धूळ खात पडलेल्या जुन्या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या इमारतीलाही त्यामुळे गतवैभव प्राप्त होणार आहे.