सांगली : जिल्ह्यात १ जानेवारी २०१५ या अर्हता दिनांकावर आधारित छायाचित्र मतदारयादी विशेष पुनरिक्षण मोहीम १ ते १६ डिसेंबर या कालावधित होणार असून या मुदतीत मतदान केंद्रावर मतदान केंद्रस्तरीय अधिकारी उपस्थित राहणार आहेत. मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांकडे सर्व अर्ज उपलब्ध होतील, अशी माहिती जिल्हाधिकारी दीपेंद्रसिंह कुशवाह यांनी येथे दिली.१ डिसेंबर २०१४ रोजी प्रसिध्द होणाऱ्या मतदार यादीतील मतदारांची आकडेवारी विधानसभा मतदारसंघनिहाय पुढीलप्रमाणे आहेत. मिरज- मतदान केंदे्र २८६, मतदार - ३ लाख १ हजार ४३९, सांगली - मतदान केंदे्र २८१, मतदार - ३ लाख २८ हजार ३७१, इस्लामपूर - मतदान केंद्रे २७७, मतदार - २ लाख ४९ हजार ४५७, शिराळा - मतदान केंद्रे ३२६, मतदार - २ लाख ७४ हजार ८९०, पलूस- कडेगाव - मतदान केंदे्र- २६९, मतदार - २ लाख ५३ हजार ६४०, खानापूर - मतदान केंदे्र -३३६, मतदार - २ लाख ९६ हजार ३, तासगाव-कवठेमहांकाळ - मतदान केंद्रे-२८५, मतदार - २ लाख ६६ हजार १७४ , जत - मतदान केंदे्र -२६८, मतदार - २ लाख ४६ हजार ६४२. १ जानेवारी २०१५ रोजी १८ वर्षे पूर्ण केलेल्या नागरिकांनी नवीन नोंदणीसाठी नमुना ६ मध्ये अर्ज करावा. तसेच सर्व मतदारांनी आपले नाव मतदार यादीत आहे की नाही याची मतदार यादीची पाहणी करुन खात्री करावी. मतदार यादीत नाव नसल्यास त्याची नोंदणी करावी, तसेच काही चुका असल्यास त्याबाबत दुरुस्तीसाठी नमुना ८ चा फॉर्म भरुन द्यावा. या पुनरिक्षण कार्यक्रमात मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांनी तपासणी अंतिम निश्चित केलेल्या मृत, स्थलांतरित व दुबार मतदार वगळायचे आहेत. ही वगळणी करण्यात येणाऱ्या संभाव्य मतदारांची यादी सहायक मतदार नोंदणी अधिकारी व पंचायत समिती यांच्या कार्यालयात प्रसिध्द करण्यात येणार आहे. या यादीची पाहणी करुन हरकत घेण्याची असल्यास सहायक मतदार नोंदणी अधिकारी यांच्या कार्यालयात दाखल करावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्यावतीेने करण्यात आले आहे. (प्रतिनिधी)सुट्टीदिवशीही मोहीमया कार्यक्रमामध्ये ७ व १४ डिसेंबर या दोन दिवशी रविवारची सुट्टी येत आहे. यादिवशीही विशेष मोहीम सुरूच राहणार असून त्याचा सर्व मतदारांनी लाभ घ्यावा, असे आवाहनही जिल्हाधिकारी दीपेंद्रसिंह कुशवाह यांनी केले आहे.
आजपासून मतदार यादी पुनरिक्षण होणार
By admin | Updated: December 1, 2014 00:12 IST