शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

पेठच्या कुस्ती मैदानात विवेक नायकल विजयी- : शाहू पाटीलला दाखविले अस्मान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2019 22:46 IST

पेठ (ता. वाळवा) येथील श्री मल्हारी माणकेश्वर यात्रेनिमित्त आयोजित कुस्ती मैदानात प्रथम क्रमांकाच्या लढतीत आत्मा मालिक कुस्ती केंद्र कोकमठाण व पेठ गावचा मल्ल विवेक नायकल याने एकलंगी डावावर

ठळक मुद्देश्री मल्हारी माणकेश्वर यात्रेनिमित्त आयोजित कुस्ती मैदानात

पेठ : पेठ (ता. वाळवा) येथील श्री मल्हारी माणकेश्वर यात्रेनिमित्त आयोजित कुस्ती मैदानात प्रथम क्रमांकाच्या लढतीत आत्मा मालिक कुस्ती केंद्र कोकमठाण व पेठ गावचा मल्ल विवेक नायकल याने एकलंगी डावावर कोल्हापूरच्या शाहू पाटील याला चितपट केले. अवघ्या अडीच मिनिटात अस्मान दाखवत विवेक हा आत्मा माणकेश्वर-खंडेश्वर केसरीच्या चांदीच्या गदेचा व महाडिक केसरीचा मानकरी ठरला.

चिंचोलीचे सुरेश जाधव यांच्या समालोचनाने मैदानात रंगत आली. मैदान पूजन माणिकराव जाधव, जि. प. सदस्य जगन्नाथ माळी, उपसरपंच शंकर पाटील, धनपाल माळी, अशोक मस्के, नामदेव भांबुरे यांच्याहस्ते झाले.मैदानात क्रमांक दोनची कुस्तीत अमर पाटील (माणिकवाडी) याने पुण्याच्या शेखर दोडके यांच्यावर गुणाने विजय मिळवला. जाधव आखाड्याचा संजय जाधव याने शाहू आखाड्याचा मल्ल स्वप्नील पाटील याला चितपट केले. सुरूलचा राहुल पाटील याने शाहू आखाड्याच्या संतोष रूपनवर याच्यावर मात केली. मिल्ट्री स्कूल बॉईजचा खेळाडू अतुल नायकल याने निखिल सपकाळचा पराभव केला सागर पवार (पेठ) याने प्रणव चव्हाण (इस्लामपूर) याला चितपट केले.

मैदानाचे नियोजन व पंच म्हणून कृष्णात पवार, सुबराव पाटील, आप्पासाहेब कदम, विठ्ठल माळी, दत्ता गावडे, हिंदुराव कदम, गोरख मदने, नामदेव भांबुरे, आकाराम नायकल, हणमंतराव कदम, चंद्रकांत पवार, महेश कोळेकर, भानुदास गुरव यांनी काम पाहिले.श्रद्धाची बाजीमहिला कुस्तीत औंढीची साक्षी जाधव व श्रध्दा सावंत (काळामवाडी) यांच्यातील लढतीत श्रध्दा विजयी झाली. तसेच पवारवाडीची संध्या डिसले व भाटवडेची ऋतुजा जाधव यांच्यातील दुसऱ्या क्रमांकाची कुस्ती बरोबरीत सोडविण्यात आली. 

टॅग्स :Sangliसांगली