शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
6
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
7
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
8
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
9
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
10
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
11
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
12
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
13
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
14
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
15
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
16
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
17
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
18
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
19
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
20
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
Daily Top 2Weekly Top 5

विठ्ठला, कोणता झेंडा घेऊ हाती?, गौरव नायकवडींच्या स्टेट्समुळे इस्लामपूर मतदारसंघात चर्चेला उधाण

By श्रीनिवास नागे | Updated: June 29, 2023 18:31 IST

महेंद्र किणीकर वाळवा : हुतात्मा दूध संघाचे अध्यक्ष गाैरव नायकवडी यांनी क्रांतिवीर डॉ. नागनाथअण्णा नायकवडी यांच्यासोबतचे स्वत:चे छायाचित्र आणि ...

महेंद्र किणीकरवाळवा : हुतात्मा दूध संघाचे अध्यक्ष गाैरव नायकवडी यांनी क्रांतिवीर डॉ. नागनाथअण्णा नायकवडी यांच्यासोबतचे स्वत:चे छायाचित्र आणि ‘विठ्ठला, कोणता झेंडा घेऊ हाती?’ हे गीत व्हॉट्सॲपवरील स्टेट्सला ठेवले आहे. गुरुवारी आषाढी एकादशीस ते व्हायरल झाल्यामुळे इस्लामपूर विधानसभा मतदारसंघात चर्चा सुरू झाली आहे.गौरव नायकवडी सध्या हुतात्मा दूध संघाचे अध्यक्ष आणि राज्य धरण व शेतकरी परिषदेचे उपाध्यक्ष आहेत. नागरिकांच्या संपर्कात राहणारा, धरणग्रस्तांसाठी रस्त्यावर उतरणारा युवा कार्यकर्ता म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. त्यांनी २०१९च्या विधानसभा निवडणुकीत इस्लामपूर मतदारसंघातून शिवसेनेच्या चिन्हावर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांच्या विरोधात निवडणूक लढवली होती. गेली चार वर्षे गौरव नायकवडी राष्ट्रवादीच्या विरोधात असले तरी सर्व पक्षांपासून अलिप्त आहेत. भाजप-शिवसेनेच्या शिंदे गटातील नेत्यांसोबत ते असतात. परंतु आज, त्यांनी ठेवलेले व्हॉट्सॲपचे स्टेटस व्हायरल झाले. क्रांतिवीर डॉ. नागनाथअण्णा नायकवडी यांच्यासोबतचे स्वत:चे छायाचित्र आणि ‘विठ्ठला, कोणता झेंडा घेऊ हाती?’ हे गीत त्यांनी व्हॉट्सॲपवरील स्टेट्सला ठेवले आहे. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीसाठी ते कोणाचा झेंडा खांद्यावर घेणार, याबाबत चर्चा रंगली आहे.  

टॅग्स :Sangliसांगलीislampur-acइस्लामपूर