शहरं
Join us  
Trending Stories
1
भंडाऱ्याचे काँग्रेस खासदार प्रशांत पडोळेंच्या गाडीचा भीषण अपघात; ट्रकची धडक, चौघांना किरकोळ दुखापत
2
Ladki Bahin Yojana: 'मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने'च्या ऑगस्ट महिन्याचा हप्ता कधी येणार? आदिती तटकरेंनी दिली माहिती
3
Milk Rate: ४ रुपयांनी स्वस्त होणारे का अमूलचं दूध? कंपनीच्या एमडींनी सांगितला संपूर्ण प्लान
4
"प्रत्येक खासदाराला १५ कोटी देऊन भाजपाने मत खरेदी केले"; 'क्रॉस व्होटिंग'वर सर्वात मोठा दावा
5
"आता पहिल्यासारखं आयुष्य नाही..."; एकाच मुलीशी लग्न करणाऱ्या २ भावांवर कोसळला दु:खाचा डोंगर
6
नवीन गाडीची डिलिव्हरी घेताना अपघात झाला तर? महिंद्रा थारच्या घटनेतून जाणून घ्या विमा क्लेमचे नियम
7
Google Pixel 9: चक्क अर्ध्या किंमतीत खरेदी करा गुगल पिक्सेल ९; कॅमेऱ्यानं अनेकांना लावलंय वेड!
8
बहिणीच्या स्वप्नात भाऊ आला... म्हणाला, माझा खून झाला; 'ती' शंका खरी, हत्येची फिल्मी स्टोरी
9
Nepal Crisis : केपी शर्मा ओली यांचा भारताविरुद्धचा द्वेष कायम, राजीनाम्यानंतर विरोधात गरळ, आली पहिली प्रतिक्रिया
10
खुद्द लष्करप्रमुखांनी विनवलं, तब्बल १५ तास महाचर्चा अन् सुशीला कार्कींचा PM पदासाठी होकार! Inside Story
11
उघडताच पूर्ण सबस्क्राईब झाला हा IPO; आताच ११७% पोहोचला जीएमपी; १४० रुपयांचा आहे शेअर
12
दाने-दाने में केसर का दम! केसरची किंमत ५ लाख पण इथे..; शाहरूख, अजय, टायगर 'त्या' जाहिरातीमुळे अडचणीत
13
VIDEO: ट्रक पार्क केला पण हँडब्रेक लावायला विसरला, मागच्या कारच्या अंगावर गेला अन् नंतर...
14
VIRAL : 'नाही, नको,बाबा मानणार नाहीत"; ती रडत ओरडत राहिली अन् त्यानं केलं असं काही… धावत्या ट्रेनमध्ये प्रेमाचा ड्रामा!
15
जीएसटी काटके...! महिंद्रा, सोनालिका, जॉन डीअर ट्रॅक्टरची किंमत कितीने कमी होणार? 
16
ईडीचे १२ ठिकाणी छापे, यशवंत सावंतांच्या घरी सापडलं घबाड; ७२ लाखांची रोकड, ७ लग्झरी कार जप्त
17
कोकणची माती, 'दशावतारा'ची कला अन् गूढ रम्य कथा! सिनेमातील कलाकारांनी सांगितला अनुभव
18
पितृपंधरवड्यात भाजीपाला कडाडला; सर्व भाज्यांचे दर १०० रुपयांच्या पुढे 
19
तेजस्वी यादवांविरोधात लढण्याची केली होती तयारी, आता भररस्त्यात झाली हत्या, कोण होते राजकुमार राय? 

विटा बाजार समिती बाबर-कदम-देशमुख गटाकडे

By admin | Updated: August 6, 2015 22:53 IST

विरोधी गटाला केवळ एकच जागा : कडेगाव-खानापूर तालुक्यात कार्यकर्त्यांचा जल्लोष

विटा : संपूर्ण सांगली जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेल्या व खानापूर आणि कडेगाव तालुका कार्यक्षेत्र असलेल्या विटा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत शिवसेनेचे विद्यमान आ. अनिल बाबर, कॉँग्रेसचे ज्येष्ठ नेते मोहनराव कदम व भाजपचे माजी आ. पृथ्वीराज देशमुख यांच्या संयुक्त शेतकरी विकास पॅनेलने १९ पैकी १८ जागा जिंकून निर्विवाद विजय संपादन करीत सत्ता कायम ठेवली. विरोधी माजी आ. सदाशिवराव पाटील व राष्ट्रवादी कॉँग्रेसचे तालुकाध्यक्ष अ‍ॅड. बाबासाहेब मुळीक यांच्या नेतृत्वाखालील विरोधी शेतकरी परिवर्तन पॅनेलला केवळ एकाच जागेवर समाधान मानावे लागले. निवडणुकीत पंधरा वर्षांपासून संचालक पदावर असलेले माजी उपसभापती नथुराम पवार यांना पराभवास सामोरे जावे लागले आहे. या निवडणुकीत अनिल बाबर, कॉँग्रेसचे नेते मोहनराव कदम व भाजपचे माजी आ. पृथ्वीराज देशमुख यांनी एकत्रित येऊन शेतकरी विकास पॅनेलच्या माध्यमातून निवडणूक लढविली. या पॅनेलविरोधात माजी आ. पाटील व राष्ट्रवादीचे अ‍ॅड. मुळीक यांनी आव्हान दिले होते. त्यामुळे बाजार समितीत दुरंगी लढत झाली. एकूण १९ जागांसाठी सात अपक्षांसह ४५ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते.गुरुवारी मार्केट यार्डातील जिल्हा बॅँकेच्या सभागृहात सकाळी मतमोजणीस प्रारंभ झाला. हमाल व तोलाईदार गटात कमी मतदान असल्याने या गटाचा निकाल सर्वात अगोदर हाती आला. या गटात सत्ताधारी गटाचे नथुराम पवार यांचा विरोधी अ‍ॅड. मुळीक यांच्या पॅनेलमधील महिपती शिवाजी चव्हाण यांनी पराभव करून विजयी सलामी दिली. त्यानंतर सोसायटी गटाची मतमोजणी सुरू झाली. या गटात आ. बाबर, कदम व देशमुख यांच्या सत्ताधारी गटाने सर्व ७ जागांवर विजय संपादन केला. त्यानंतर महिला राखीव गटात आ. बाबर यांच्या शेतकरी विकास पॅनेलमधील सुमन जमदाडे व अलका देवकर विजयी झाल्या. विटा शहराचे लक्ष लागून राहिलेल्या व्यापारी गटात आ. बाबर समर्थक पांडुरंग डोंबे व मोहन पाटील विजयी झाले. तसेच ग्रामपंचायत गटात चंद्रकांत चव्हाण आणि भानुदास सूर्यवंशी विजयी झाले. अनुसूचित जाती-जमाती गटात शेतकरी विकास पॅनेलचे तानाजी कमाने, आर्थिक दुर्बलमधून सुभाष मोरे, विमुक्त जाती-भटक्या जमाती प्रवर्गातून सुनील मेटकरी, इतर मागास प्रवर्गातून प्रभाकर आलेकरी, कृषी प्रक्रिया गटातून अंकुश यादव विजयी झाले.आ. अनिल बाबर, मोहनराव कदम व पृथ्वीराज देशमुख युतीच्या शेतकरी विकास पॅनेलचे उमेदवार - सोसायटी गट : राजेश खाशाबा कदम - घोटी खुर्द (८१६ मते), विजय दिनकर कदम - हिंगणगाव बुद्रुक (७९३), वीरसिंग दादासाहेब पवार - देवनगर (८९३), आनंदराव रामराव पाटील - मंगरूळ (८८५), आनंदा काशिनाथ माने - उपाळे वांगी (८४७), बापूराव जयसिंग शिंदे - जखीणवाडी (८४४), राहुल विलास साळुंखे - कमळापूर (८३६). इतर मागासवर्गीय गट : प्रभाकर विठोबा आलेकरी - करांडेवाडी (९७३). विमुक्त जाती-भटक्या जमाती : सुनील वसंत मेटकरी - विटा (९३४). महिला राखीव : सुमन जगन्नाथ जमदाडे - कुंभारगाव (९०४), अलका संपतराव देवकर - वेजेगाव (८९४). ग्रामपंचायत गट : चंद्रकांत सुदाम चव्हाण - तांदळगाव (६६७), भानुदास भीमराव सूर्यवंशी - करंजे (६६४). अनुसूचित जाती-जमाती : तानाजी कृष्णा कमाने - चिखली (७११). आर्थिक दुर्बल : सुभाष अधिकराव मोरे - अमरापूर (७२३). व्यापारी प्रतिनिधी : पांडुरंग अशोक डोंबे - विटा (६२५), मोहन रामचंद्र पाटील - विटा (५५५). कृषी प्रकिया गट : अंकुश रामचंद्र यादव - रामापूर (२४२). विरोधी शेतकरी परिवर्तन पॅनेल : हमाल व तोलाईदार गट - महिपती शिवाजी चव्हाण - विटा (४१).निकाल जाहीर होताच सत्ताधारी शेतकरी विकास पॅनेलच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. बाजार समितीपासून विजयी रॅली काढण्यात आली. यावेळी पंचायत समितीचे उपसभापती सुहास बाबर, खानापूर सूतगिरणीचे अध्यक्ष अमोल बाबर यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने रॅलीत सहभागी झाले होते. शिवाजी चौकात फटाक्यांची प्रचंड आतषबाजी करण्यात आली. त्यानंतर चौंडेश्वरी चौकात शिवसेना कार्यालयात अनिल बाबर यांच्याहस्ते नूतन संचालकांचा सत्कार करण्यात आला. (वार्ताहर)विटा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत प्रचारासाठी वेळ कमी पडला. त्यामुळे सर्वत्र आम्ही पोहोचू शकलो नाही. या निवडणुकीत आम्हाला अपयश आले असले तरी, मतदारांनी दिलेला कौल मान्य करून आगामी काळात सभासद व शेतकऱ्यांना आम्ही दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करण्यासाठी कटिबध्द आहोत.- अ‍ॅड. बाबासाहेब मुळीकशेतकऱ्यांचा विजय : अनिल बाबरविटा बाजार समितीत विरोधकांनी केवळ आदळआपट केली. केवळ निवडणुकीपुरताच शेतकऱ्यांचा कळवळा येणाऱ्यांना मतदारांनी चांगलीच चपराक दिली आहे, हे या निकालावरून स्पष्ट झाले आहे. शेतकऱ्यांचा विकास कोणामुळे होणार हे सभासदांनी ओळखले होते. त्यामुळे ज्येष्ठ नेते मोहनराव कदम, माजी आ. पृथ्वीराज देशमुख व मी एकत्रित येऊन बाजार समितीची निवडणूक लढविली. यापुढील काळात बाजार समिती व शेतकऱ्यांच्या विकासासाठी प्रयत्नशील राहणार आहोत.विटा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत सोसायटी गटात सर्वाधिक ८९३ मते सत्ताधारी शेतकरी विकास पॅनेलचे विजयी उमेदवार वीरसिंग दादासाहेब पवार यांना मिळाली. विरोधी शेतकरी परिवर्तन पॅनेलच्या सर्व उमेदवारांत सर्वाधिक ४१२ मते अ‍ॅड. संदीप बाबासाहेब मुळीक यांना मिळाली.