लोकनेते स्व. हणमंतराव पाटील यांच्या बोटाला धरून व त्यांच्या आदर्श विचारांचा वारसा घेऊन सामाजिक व राजकीय क्षेत्रात पर्दापण करणारे सुवर्णनगरी विटा शहराचे सुपुत्र माजी आ. सदाशिवराव पाटील यांनी लोकांच्या न्याय व हक्कासाठी नेहमीच लढा दिला. गेल्या पन्नास वर्षांपासून विटा शहराच्या जडणघडणीत त्यांनी दिलेले योगदान मोठे आहे. विटा नगरपरिषदेच्या माध्यमातून शहराच्या विकासासाठी माजी आ. सदाशिवराव पाटील यांनी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून आणला. स्वच्छ भारत सर्वेक्षण अभियानात माजी आ. भाऊंच्या नेतृत्वाखाली झालेले काम देशाच्या नकाशावर ठळकपणे उमटले.
दुष्काळी खानापूर तालुक्याचे विधानसभेत प्रतिनिधित्व करीत असताना सर्वसामान्य व दुष्काळी भागाचा विकास झाला पाहिजे, यासाठी माजी आ. सदाभाऊंनी नेहमीच आवाज उठविला. दुष्काळी भागाला वरदान ठरणाऱ्या टेंभू योजनेचे पाणी शेतकऱ्यांना देण्यासाठी भाऊंनी मोठे प्रयत्न केले. दहा वर्षांच्या कार्यकालात टेंभूच्या पूर्ततेसाठी योगदान देऊन माहुली येथील टप्पा क्र. ३ कार्यान्वित करून आटपाडी तालुक्यात कृष्णामाईचे पाणी पोहोचविले. त्यामुळे दुष्काळी बळीराजाला आर्थिक स्थैर्य निर्माण होऊन हरितक्रांतीचे पर्व सुरू झाले.
खानापूर, आटपाडी या दोन तालुक्यांसह तासगाव तालुक्यातील विसापूर सर्कलमध्ये माजी आ. भाऊंच्या कारकिर्दीत मोठ्या प्रमाणात विकासकामे झाली. मतदारसंघातील प्रत्येक गावात एक तरी विकासकाम झाले पाहिजे, हे ध्येय घेऊन सदाभाऊंनी केलेली कामे आ. मतदारसंघातील सर्वसामान्य जनता विसरलेली नाही. तालुक्याचे मुख्यालय असलेल्या विटा शहरात सर्वसामान्य जनतेला प्रशासकीय कामात कोणताही त्रास होऊ नये, यासाठी सदाभाऊंनी मध्यवर्ती प्रशासकीय इमारत उभी करून सर्व शासकीय कार्यालये एका छताखाली आणली आहेत.
माजी आ. सदाशिवराव पाटील यांनी आदर्श शिक्षण संकुलाच्या माध्यमातून शैक्षणिक क्षेत्रात केलेले काम दीपस्तंभासारखे आहे. मुंबई, पुणे या मेट्रो शहरातील शिक्षण विट्यासारख्या निमशहरी गावात उपलब्ध करून दिले आहे. त्यामुळे सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या मुलांना उच्च शिक्षणाची दारे खुली झाली आहेत. औद्योगिक क्षेत्रातही सदाभाऊंनी दूरदृष्टी ठेऊन उद्योगांची उभारणी केली आहे. विटा अर्बन बॅँक व क्रेडिट सोसायटीच्या माध्यमातून सर्वसामान्य शेतकरी व छोट्या उद्योजकांना अर्थसाहाय्य देऊन त्यांना पाठबळ दिले आहे. लोकनेते हणमंतराव पाटील दूध संघ व विराज केन्सच्या माध्यमातून शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.
माजी आ. सदाशिवराव पाटील खानापूर मतदारसंघाचे राष्ट्रवादी कॉँग्रेसचे नेतृत्व करीत आहेत. पक्षाचे अध्यक्ष माजी केंद्रीय कृषिमंत्री खा. शरद पवार, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार व प्रदेशाध्यक्ष जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांचे नेतृत्व स्वीकारून माजी आ. सदाभाऊंनी प्रदेश प्रतिनिधी पदाची जबाबदारी घेतली आहे. त्यांच्यामुळे खानापूर मतदारसंघात राष्ट्रवादी कॉँग्रेसची ताकद चांगलीच वाढू लागली आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली आ. अनेक सर्वसामान्य कार्यकर्त्यांवर पक्षाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. त्यामुळे खानापूर मतदारसंघ राष्ट्रवादीमय होऊ लागला असून त्यांचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी पक्षाला पर्यायाने मा. सदाभाऊंना ताकद दिली आहे. विटा शहरासह खानापूर मतदारसंघात सदाभाऊंनी कार्यकर्त्यांना ताकद देऊन संघटन मजबूत करण्यावर भर दिला आहे. त्यासाठी त्यांचे सुपुत्र विट्याचे माजी नगराध्यक्ष वैभवदादा पाटील व विराज दूध संघाचे कार्यकारी संचालक विशालकाका पाटील यांनी संघटन कौशल्यावर मतदारसंघात पक्षाची ताकद वाढविली आहे. राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, सहकार, औद्योगिक यासह विविध क्षेत्रात दूरदृष्टी ठेवून माजी आ. सदाशिवराव पाटील यांनी सर्वसामान्य जनतेची मने जिंकली आहेत. अष्टपैलू व्यक्तिमत्त्व आणि दूरदृष्टीचे नेते असलेले माजी आ. सदाशिवराव पाटील यांचे नेतृत्व विरोधकांपेक्षा पूर्ण ताकदीचे व जनसेवेचे राहणार आहे. यात कोणतीही शंका नाही. मा. सदाभाऊंना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा..!
- दिलीप मोहिते, विटा