शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
5
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
6
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
7
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
8
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
9
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
10
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
11
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
12
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
13
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
14
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
15
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
16
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
17
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
18
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
19
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
20
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
Daily Top 2Weekly Top 5

महापुरानंतरही विश्वजित कदम कृष्णाकाठासोबत!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 1, 2019 23:44 IST

शरद जाधव । लोकमत न्यूज नेटवर्क भिलवडी : महापुराने उद्ध्वस्त झालेल्या पलूस तालुक्यातील पूरग्रस्तांचे संसार उभारण्यासाठी पलूस-कडेगावचे आमदार डॉ. ...

शरद जाधव ।लोकमत न्यूज नेटवर्कभिलवडी : महापुराने उद्ध्वस्त झालेल्या पलूस तालुक्यातील पूरग्रस्तांचे संसार उभारण्यासाठी पलूस-कडेगावचे आमदार डॉ. विश्वजित कदम सरसावले आहेत. महापुरापूर्वी आणि नंतरही त्यांची मदत सुरूच आहे. पलूस तालुक्यातील पूरग्रस्त गावांतील १९ हजार कुटुंबांना जीवनावश्यक वस्तूंच्या कीटचे वाटप करण्यात येत आहे.डॉ. पतंगराव कदम यांचे पुत्र आमदार विश्वजित कदम हे वडिलांनी घालून दिलेल्या आदर्शानुसार महापुरात पूरग्रस्तांसोबत पहिल्या दिवसापासून राहिले. भर पावसात पाण्यात जाऊन पूरग्रस्त नागरिक, महिला, मुले तसेच जनावरे कशी सुरक्षित बाहेर काढता येतील याची काळजी घेतली. बाहेर पडल्यानंतर भारती विद्यापीठ व परिवाराच्यावतीने पूरग्रस्तांना निवास, भोजन व आरोग्य सुविधा तात्काळ उपलब्ध करून दिल्या. सोनहिरा साखर कारखान्याने जनावरांसाठी चारा उपलब्ध करून दिला. आता महापूर ओसरल्यानंतर दगावलेली माणसे, जनावरे, पडलेली घरे, शेतीचे व उद्योगांचे झालेले नुकसान याची प्रत्येक गावात समक्ष भेट देऊन पाहणी केली. भारती विद्यापीठ, सोनहिरा साखर कारखान्याच्यावतीने स्वच्छता व आरोग्य सेवेमध्ये योगदान दिले आहे. राज्य शासनाकडून पूरग्रस्तांना ठोस मदत मिळाली पाहिजे, यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन दिले.सर्वच पूरग्रस्तांपर्यंत समान मदत पोहोचत नाही, त्यासाठी जादा मदतीची गरज असल्याचे ओळखून, त्यांनी ‘डॉ. पतंगराव कदम आपत्ती निवारण कक्ष’ स्थापन केला. त्यामध्ये भारती विद्यापीठ व संलग्न व्यक्ती, संस्थांनी मदत जमा केली. अंथरूण, पांघरूण, संसारोपयोगी साहित्य, भांडी, धान्य, कपडे असे दर्जेदार वस्तूंचे कीट बनविले. त्याचे गावनिहाय वेळापत्रक बनवून वाटप सुरू केले आहे.पलूस तालुक्यातील भिलवडी, अंकलखोप, धनगाव, चोपडेवाडी, सुखवाडी, खटाव, ब्रम्हनाळ, वसगडे, नागठाणे, आमणापूर, विठ्ठलवाडी, संतगाव, सूर्यगाव, बुर्ली, नागराळे, पुणदी, दुधोंडी, घोगाव, तुपारी, दह्यारी आदी गावांमधील पूरग्रस्त कुटुंबांना ही मदत देण्यात येणार आहे.