शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
2
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
3
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
4
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
5
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
6
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
7
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
8
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
9
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
10
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
11
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
12
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
13
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
14
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
15
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
16
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
17
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
18
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!
19
AC बंद, ५ तास लहान मुलं, वृद्ध गरमीने हैराण; एअर इंडियाच्या विमानाचा धक्कादायक Video
20
१५ वर्ष भारतीय सेनेत देशसेवा केली, केदारनाथ हेलिकॉप्टर दुर्घटनेत आला मृत्यू; कोण होते पायलट राजवीर सिंह?

विष्णुदास भावे नाट्य गौरव पदक मोहन जोशी यांना जाहीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 8, 2017 17:58 IST

सांगली येथील अखिल महाराष्ट्र नाट्य विद्यामंदिर समितीच्यावतीने दिले जाणारे विष्णुदास भावे नाट्य गौरव पदक यंदा ज्येष्ठ अभिनेते, नाटककार मोहन जोशी यांना जाहीर करण्यात आले आहे. येत्या ५ नोव्हेंबररोजी अखिल भारतीय नाट्य संमेलनाचे अध्यक्ष जयंत सावरकर यांच्याहस्ते हे पदक त्यांना प्रदान करण्यात येणार आहे.

सांगली, दि. ८ :    येथील अखिल महाराष्ट्र नाट्य विद्यामंदिर समितीच्यावतीने दिले जाणारे विष्णुदास भावे नाट्य गौरव पदक यंदा ज्येष्ठ अभिनेते, नाटककार मोहन जोशी यांना जाहीर करण्यात आले आहे.

येत्या ५ नोव्हेंबररोजी अखिल भारतीय नाट्य संमेलनाचे अध्यक्ष जयंत सावरकर यांच्याहस्ते हे पदक त्यांना प्रदान करण्यात येणार आहे, अशी माहिती समितीचे अध्यक्ष डॉ. शरद कराळे यांनी रविवारी पत्रकार परिषदेत दिली.   डॉ. कराळे म्हणाले की, प्रतिवर्षी रंगभूमी दिनानिमित्त रंगभूमीची प्रदीर्घ सेवा करणाºया श्रेष्ठ कलाकारास विष्णुदास भावे गौरव पदकाने सन्मानित करण्यात येते. आजपर्यंंत ५१ दिग्गज रंगकर्मींना हे पदक प्रदान करण्यात आले आहे. यंदाचे ५२ वे पदक जयंत सावरकर यांना जाहीर करण्यात आले आहे.

रंगभूमी क्षेत्रातील हे मानाचे पदक असून, आजवर बालगंधर्व, केशवराव दाते, आचार्य अत्रे यांच्यापासून ते जयंत सावरकर यांच्यापर्यंत अनेक दिग्गज रंगकर्मी, नाटककार, लेखकांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. गौरवपदक, स्मृतिचिन्ह, शाल, श्रीफळ आणि २५ हजार रुपये, असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.    जोशी यांचा जन्म १२ जुलै १९५३ रोजी बेंगलोर येथे झाला. महाविद्यालयीनय शिक्षणानंतर पुणे येथील किर्लोस्कर ट्रान्स्पोर्टमध्ये सेवा करीत असतानाच अभिनयाकडे ओढा वाढला. भरत नाट्य मंदिरात बालनाट्य, एकांकिका, नाटक यामाध्यमातून त्यांनी आपल्यातील कलाकाराला न्याय दिला.

टूनटून नागरी- खणखण राजा या भरतनाट्य मंदिराच्या बालनाट्यापासून सुरुवात झाली. महाविद्यालयातर्फे पेटली आहे मशाल या नाटकातून त्यांनी यशस्वी वाटचालीस सुरुवात केली. पुण्यातीलच प्रायोगिक नाटके सादर करणाºया संस्थांच्या गार्बो, एक शून्य बाजीराव या प्रायोगिक नाटकात त्यांनी सहभाग घेतला.

राज्य नाट्य स्पर्धेतही त्यांनी अनेक पारितोषिक मिळविली. हौशी रंगभूमीवर मोरुची मावशी या नाटकातून एक विनोदी कलाकार रंगभूमीला मिळाला.  नाथ हा माझा, प्रेमाच्या गावा जावे, आसू आणि हासू ही त्यांची नाटके गाजली. 

या यशानंतर त्यांनी चित्रपट क्षेत्रात प्रवेश केला आणि अनेक भूमिका गाजविल्या. आजवर त्यांनी १0२ मराठी तर १७२ हिंदी चित्रपटात काम केले.

सध्या ते अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या अध्यक्षपदाची धुरा सांभाळत आहेत. त्यांच्या या सर्व कामगिरीची दखल घेत हा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. रविवारी ५ नोव्हेंबर रोजी त्यांना हे पदक प्रदान करण्यात येणार आहे, असे कराळे म्हणाले.