माणसाची खरी पारख संकटकाळात होते, असे म्हटले जाते. संकटात मदतीला, आधाराला येणारी माणसं लोकांच्या ह्दयात कायमचे घर करून राहतात. गेल्या पाच वर्षांत सांगली जिल्ह्यावर अनेक संकटे आली. या प्रत्येक संकटात लोकांना मदत करण्यासाठी, त्यांना आधार देण्यासाठी, त्यांचे मनोबल वाढवून संकटात सोबत असल्याबाबतचा दिलासा देण्यासाठी एका नेतृत्वाने धडपड केली. ते नेतृत्व म्हणजे काँग्रेसचे युवा नेते विशालदादा पाटील. अल्पावधीतच आपल्या कार्यकर्तृत्वाने, दिलदार स्वभावाने त्यांनी लोकांच्या ह्दयात घर केले.
समाजकारण आणि समाजकारणाच्या अंगाने राजकारण करण्याचा वारसा दिवंगत माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्याकडून त्यांना मिळाला. दादांचे नातू म्हणून लोक त्यांच्याकडून ज्या अपेक्षांनी पहात होते, त्या अपेक्षांना खरे उतरत विशाल पाटील यांनी अल्पावधीत लोकांना आपलेसे केले. शहर असो की गावखेडे प्रत्येक ठिकाणच्या माणसांशी संवाद साधत, मदतीचा हात देत त्यांनी त्यांचे कार्य सुरू ठेवले आहे. राजकारणातल्या पदांपेक्षा लोकांच्या ह्दयातील अढळपद मिळविण्याची त्यांची धडपड बऱ्याचअंशी यशस्वी होताना दिसत आहे. २०१९ चा महापूर असो की, कोरोनाच्या दोन लाटांचे संकेत या प्रत्येक काळात विशाल पाटील यांनी लोकांमध्ये जाऊन मदत केली.
कोरोनाच्या संकटकाळात जनजागृती व दिलासादायक भेटीतून विशाल पाटील यांनी जनतेला मोठा आधार दिला. गावोगावी सुरक्षासाधने पुरविण्याची मोहीम राबविली. त्यांची ही कार्यपद्धती लोकांसाठी वसंतदादांच्या आठवणींना उजाळा देणारी ठरली. पहिल्या लाटेवेळी मिरज तालुक्यातील अनेक गावांमध्ये जाऊन तेथील प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत आरोग्याच्या परिस्थितीची विचारपूस केली. प्रत्येक गावातील आशा वर्कर्स, अंगणवाडी सेविका, आरोग्य सेविका, स्वच्छता कर्मचारी यांना प्रतिष्ठानच्यावतीने मास्क व सॅनिटायझरचे वाटप करण्यात आले. सर्वच गावांत वसंतदादा कारखान्यातर्फे सॅनिटायझरचे वाटप करण्यात आले.
दुसऱ्या लाटेतसुद्धा लोकांना आधार देताना त्यांनी वसंतदादांच्या नावाने कोविड केअर रुग्णालय उभारले. या माध्यमातून दुसऱ्या लाटेत शेकडो रुग्णांवर उपचार होऊन त्यांना कोरोनातून मुक्ती मिळाली. रुग्णालये व वैद्यकीय साधनसुविधांची कमतरता भासत असताना व रुग्णांना बेड मिळणे मुश्कील झाले असताना अशा अटीतटीच्या काळात वसंतदादा कोविड सेंटरच्या माध्यमातून रुग्णांना बेडची उपलब्धता झाली आणि अनेकांचे प्राण वाचले. गोरगरीब रुग्णांसाठी हे सेंटर आधारवड बनले. कोरोनाची लाट ओसरत असताना गरजेवेळी मिळालेला विशालदादा पाटील यांचा हात लोकांची मने जिंकणारा ठरला.
पहिल्या लाटेवेळी तानंग येथे झारखंड राज्यातील २२ लोक लॉकडाऊनमध्ये अडकले होते. यासंदर्भात मधुसूदन मालू व दीपक पाटील यांनी विशाल पाटील यांची भेट घेऊन ही समस्या सांगितली. दादांनी अधिकाऱ्यांच्या सहकार्याने विशेष बसची सोय केली. प्रवासादरम्यान मजुरांना खाद्यपदार्थ, पाणी बॉटल, सॅनिटायझरचे वाटप ‘विशालदादा युवा प्रतिष्ठान’च्यावतीने करण्यात आले होते.
त्यांचा हा एकूण प्रवास पाहिला म्हणजे हरिवंशराय बच्चन यांच्या काव्यपंक्तीमधील काही ओळी समोर येतात.
तू न थकेगा कभी, तू न रुकेगा कभी
तू न मुडेगा कभी...