विटा : येथील विवाहितेशी दूरध्वनीवरून अश्लील संभाषण करून व पत्राद्वारे एकतर्फी प्रेम व्यक्त करीत, विवाहितेला गेल्या एका वर्षापासून त्रास देणाऱ्या नागेवाडी (ता. खानापूर) येथील संग्राम किसनराव माने (वय ३३) या तरुणास विटा पोलिसांनी बुधवार दि. २५ रोजी अटक केली. त्याच्याविरूध्द पीडित महिलेने पोलिसांत फिर्याद दिली आहे.येथील विवाहितेला नागेवाडीतील संग्राम माने हा २९ मार्च २०१४ पासून वारंवार त्रास देत आहे. दूरध्वनीवरून अश्लील संभाषण करून तसेच पत्रे पाठवून तो नाहक त्रास देत आहे. हा प्रकार गेल्या एका वर्षापासून सुरू आहे. त्यामुळे संबंधित विवाहितेने व तिच्या नातेवाईकांनी गेल्या तीन महिन्यापूर्वी संग्राम यास पोलीस ठाण्यात बोलावून समज दिली होती. तरीही त्याने हा प्रकार सुरूच ठेवला आहे. त्यामुळे पीडित विवाहितेने मंगळवारी रात्री उशिरा विटा पोलिसात येऊन संग्राम माने याच्याविरूध्द तक्रार दिली. माने याला पोलिसांनी आज, बुधवारी अटक करून विटा न्यायालयात हजर केले असता, त्यास पाच दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश न्यायालयाने दिला. दरम्यान, या घटनेचा अधिक तपास पोलीस करीत असल्याचे सांगण्यात आले. (वार्ताहर)राजकीय नेत्यांमध्ये ऊठ-बसविवाहितेचा विनयभंग केल्याप्रकरणी विटा पोलिसांनी अटक केलेल्या नागेवाडीचा संग्राम माने याची राजकीय नेते व कार्यकर्त्यांत ऊठ-बस असल्याने तो नागेवाडीसह विटा शहराला चांगलाच परिचित आहे. पीडित महिलेने त्याच्याविरूध्द पोलिसात तक्रार देऊन त्याच्या कृत्याचा पर्दाफाश केला. त्याच्याविरुध्द विटा पोलिसांत विनयभंगाचा गुन्हा दाखल झाल्याचे समजताच या एकतर्फी प्रेमवीराची शहरात उलट-सुलट चर्चा सुरू झाली.
विवाहितेशी दूरध्वनीवरून अश्लील संभाषण
By admin | Updated: March 26, 2015 00:01 IST