शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

'त्या' मृत तरुणाच्या कुटुंबाचे ग्रामस्थांनी स्वीकारले पालकत्व, गौतमी पाटीलच्या शोदरम्यान चेंगराचेंगरी झाला होता मृत्यू

By संतोष भिसे | Updated: November 5, 2022 13:12 IST

बुरसे यांनी ओमासे कुटुंबाची आर्थिक कोंडी लक्षात घेऊन मदतीचा हात पुढे केला.

टाकळी : बेडग (ता. मिरज) येथे लावणी शोदरम्यान दत्तात्रय विलास ओमासे (वय ४४) या तरुणाचा मृत्यू झाला होता. त्यामुळे त्यांचे कुटूंब उघड्यावर पडले आहे. त्यांची जबाबदारी पेलण्यासाठी बेडगचे संवेदनशील ग्रामस्थ पुढे सरसावले आहेत.पंचायत समितीचे माजी सभापती दिलीप बुरसे व बंधू बापू बुरसे यांनी यांच्या तीन मुलींच्या नावे प्रत्येकी १० हजार रुपयांची ठेव ठेवली. मदतीचा धनादेश ओमासे कुटुंबाकडे सुपुर्द केला. बाळासाहेब ओमासे यांनीही प्रत्येक महिन्याचे किराणा सामान भरुन देण्याचा निर्णय जाहीर केला. या मदतीने ओमासे कुटुंबाला दिलासा मिळाला आहे.बेडगमध्ये प्राथमिक शाळेच्या आवारात गेल्या रविवारी गौतमी पाटील हिच्या लावणी शोदरम्यान मोठी चेंगराचेंगरी झाली होती. कार्यक्रमानंतर शाळेच्या कुंपणभिंतीबाहेर ओमासेंचा मृतदेह आढळला. पोलीस केस, पंचनामा आदी सोपस्कार पूर्ण झाले. मृतदेहावर अंत्यसंस्कारही झाले. पण निराधार झालेल्या कुटुंबाचा कोणीही विचार केला नाही. काही ग्रामस्थांनी लावणी शो नंतर येऊन सांत्वन केले, पण कोरड्या सांत्वनाने पोटाचा प्रश्न सुटणार नाही याकडे दुर्लक्ष केले. बुरसे यांनी ओमासे कुटुंबाची आर्थिक कोंडी लक्षात घेऊन मदतीचा हात पुढे केला. तीनही मुलींच्या नावे ठेवपावत्या केल्या. अन्य ग्रामस्थही मदतीसाठी पुढे येऊ लागले आहेत.कर्ता पुरुष गेला, पोट कसे भरायचे?ओमासे यांच्या पश्चात पत्नी, वृद्ध आई आणि पाच, सात व आठ वर्षे वयाच्या तीन मुली आहेत. मुळचे यड्राव, इचलकरंजी येथील ओमासे कुटूंब काही वर्षांपूर्वी उदरनिर्वाहासाठी बेडग येथे रहायला आले होते. दत्तात्रय शेतमजुरी करुन कुटुंबाचे पालनपोषण करायचे. गावात स्वत:चे घरही नाही. दत्तात्रय यांच्या मृत्यूमुळे कुटुंबापुढे पोट भरण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे

टॅग्स :Sangliसांगली