लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : सांगली ग्रामीण जिल्हा काँग्रेसचे नवनिर्वाचित अध्यक्ष आमदार विक्रम सावंत यांनी आज काँग्रेस कमिटीला भेट दिली. यावेळी त्यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांनी त्यांचा सत्कार केला.
आमदार सावंत यांची जिल्हाध्यक्षपदी निवड झाल्यानंतर ते पहिल्यांदाच काँग्रेस कमिटीमध्ये आले. कार्यकर्त्यांनी फटाके वाजवून त्यांचे जल्लोषात स्वागत केले. तत्पूर्वी सावंत यांनी कृष्णा नदीकाठावर दिवंगत नेते वसंतदादा पाटील, विष्णुअण्णा पाटील, मदन पाटील यांच्या स्मारकाचे दर्शन घेऊन अभिवादन केले. त्यानंतर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या आवारात सहकारतपस्वी गुलाबराव पाटील यांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून अभिवादन केले.
यावेळी जितेश कदम, बिपीन कदम, अमित पारेकर यांच्यासह विविध सेल, संघटनांचे अध्यक्ष व पदाधिकारी उपस्थित होते.