शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

सांगलीत चार पिढ्यांच्या पशुवैद्यकीय सेवेने रचला विक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2018 15:48 IST

पिढीजात व्यावसाय करणारी अनेक कुटुंबे जगभरात पहायला मिळतात, मात्र शंभर वर्षापासून व सलग चारही पिढ्या एकाचप्रकारची पदवी घेऊन पशुवैद्यकीय सेवेचा वारसा चालविण्याची किमया सांगलीच्या कुलकर्णी कुटुंबियांनी केली आहे. याची दखल घेत इंडिया बुक आॅफ रेकॉर्डने या कुटुंबियांचा सन्मान केला आहे.

ठळक मुद्देचार पिढ्यांच्या पशुवैद्यकीय सेवेने रचला विक्रमसांगलीतील कुलकर्णी कुटुंबियांना मान : पहिल्या पदवीला शंभर वर्षे पूर्ण

सांगली : पिढीजात व्यावसाय करणारी अनेक कुटुंबे जगभरात पहायला मिळतात, मात्र शंभर वर्षापासून व सलग चारही पिढ्या एकाचप्रकारची पदवी घेऊन पशुवैद्यकीय सेवेचा वारसा चालविण्याची किमया सांगलीच्या कुलकर्णी कुटुंबियांनी केली आहे. याची दखल घेत इंडिया बुक आॅफ रेकॉर्डने या कुटुंबियांचा सन्मान केला आहे.

सांगलीच्या राम मंदिर परिसरात हे कुटुंब राहते. या कुटुंबातील पहिले पशुवैद्यकीय डॉक्टर नारायण तातो कुलकर्णी यांनी बॉम्बे पशुवैद्यक महाविद्यालयातून २६ जून २0१८ रोजी पशुवैद्यक सर्जन म्हणून पदवी घेतली. या गोष्टीला शंभर वर्षे पूर्ण झाली आहेत. त्यांनी त्यावेळी पहिल्या महायुद्धात सेवा बजावली आणि नंतर सांगलीच्या संस्थानिकांकडे पशुवैद्यकीय डॉक्टर म्हणून रुजू झाले.

 सांगलीतला पहिला पशुवैद्यकीय दवाखानाही त्यांनीच संस्थानच्या माध्यमातून सुरू केला. कोल्हापूर पांजरपोळ येथेही त्यांनी नोकरी केली. १९५७ मध्ये ते निवृत्त झाले. त्यानंतर त्यांचे पुत्र डॉ. केशव नारायण कुलकर्णी यांनी १९५४ मध्ये मुंबईच्याच महाविद्यालयातून पशुवैदकीय पदवी प्राप्त केली. त्यानंतर ते शासकीय सेवेत रुजू झाले.

कोल्हापूर, अहमदाबाद व नंतर सांगली जिल्ह्यातील जुनोनी येथे त्यांनी काम केले. १९७२ मधील दुष्काळात त्यांनी दिलेल्या सेवेचा गौरव तत्कालिन केंद्र शासनाने राष्ट्रपतींच्या हस्ते पुरस्कार देऊन केला होता. त्यावेळी ५ हजार जनावरांसाठी त्यांनी राज्यातील पहिली चारा छावणी सुरू केली होती.त्यानंतर याच घरातील तिसऱ्या पिढीत डॉ. मिलिंद केशव कुलकर्णी यांनी १९८१ मध्ये मुंबईच्याच महाविद्यालयातून पशुवैद्यकीय पदवी प्राप्त केली. त्यांनीही सरकारी नोकरी करीत कोल्हापूर, सांगली, सातारा तसेच गडचिरोली येथे आदिवासी भागात सेवा केली. सहाय्यक आयुक्त या पदावरून ते २0१६ मध्ये निवृत्त झाले.

आता त्यांची कन्या डॉ. तेजश्री मिलिंद कुलकर्णी हिने उदगीर येथून पशुवैद्यकीय पदवी प्राप्त केली आहे. पदव्युत्तर शिक्षणासाठी तिने तयारी सुरू केली आहे. पोल्ट्री सायन्स या विषयातील शिक्षण घेण्याची तयारी तिने सुरू केली आहे.चारही पिढ्या एकाच व्यवसायात आणि तेही एकाचप्रकारच्या विभागातील पदवी घेऊन शासकीय सेवा तसेच समाजसेवेचा भाग म्हणून कार्यरत राहिली आहे. याबाबत इंडिया बुक आॅफ रेकॉर्डने त्यांना सन्मानित केले असून लवकरच त्यांचे स्नेही व नातेवाईक लिमका बुक आॅफ रेकॉर्डसाठीही प्रस्ताव दाखल करणार आहेत.

टॅग्स :Medicalवैद्यकीयSangliसांगली