उमदी : उटगी (ता. जत) येथील विजयलक्ष्मी पतसंस्थेच्या वतीने मृत सभासदांच्या वारसांना संस्थेचे संस्थापक - अध्यक्ष मानंतेश पाटील यांच्याहस्ते मदतीचा धनादेश देण्यात आला. माजी सभापती बसवराज पाटील अध्यक्षस्थानी होते, तर तुकाराम बाबा महाराज प्रमुख पाहुणे होते.
पतसंस्थेचे सभासद पिराप्पा हत्तळी यांचे काही महिन्यांपूर्वी अपघाती निधन झाले. त्यांच्या कुटुंबीयांना दोन लाखांचा धनादेश देण्यात आला. यावेळी शेती व वैद्यकीय क्षेत्रात नावलौकिक मिळवलेले हणमंत दुधगी, काडाप्पा काराजनगी, डाॅ. सोमशेखर म्हैत्रे, डॉ. वैशालीताई अचक्कनळ्ळी यांचा सत्कार करण्यात आला. कोरोनाच्या कालावधीत उटगी येथे सेवा बजावलेल्या वैद्यकीय कर्मचारी व आशा सेविकांचाही सन्मान करण्यात आला.
यावेळी माजी सभापती बसवराज बिराजदार, एम. एस. पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी अध्यक्ष डॉ. शिवानंद पाटील, सरपंच सविता कांबळे, मल्लिकार्जुन केंसगोंड, डॉ. प्रदीप ननावरे, डॉ. ओमप्रकाश पट्टणशेट्टी उपस्थित होते. चंद्रकांत डोळ्ळी यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. गोरखनाथ भोसले यांनी आभार मानले.
फोटाे : २७ उमदी १
ओळ : उटगी (ता. जत) येथे विजयलक्ष्मी पतसंस्थेतर्फे तुकारामबाबा महाराज, मानतेंश पाटील, सरपंच सविता कांबळे यांच्याहस्ते पिराप्पा हत्तळी यांना मदतीचा धनादेश देण्यात आला.