फोटो ओळ : कामेरी (ता. वाळवा) येथे आढावा बैठकीत सुरेखा जाधव यांनी मार्गदर्शन केले. यावेळी सविता पाटील, स्वप्नाली जाधव, केशव पाटील, आनंदराव पवार, दिनेेेश जाधव आदी उपस्थित होते.
कामेरी : कोरोनाचा वाढत प्रादुर्भाव रोखण्यासाठी गाव पातळीवरील कोरोना दक्षतासमित्यांनी अधिक जबाबदारीने काम करणे गरजेचे आहे. तरच दुसऱ्या लाटेला आपण थोपवू शकू, असा विश्वास जिल्हा परिषद सदस्य सुरेखा जाधव यांनी व्यक्त केला.
कामेरी (ता. वाळवा) येथे आढावा बैठकीत त्या बोलत होत्या. पंचायत समिती सदस्य सविता पाटील व सरपंच स्वप्नाली जाधव, उपसरपंच केशव पाटील ग्रामविकास अधिकारी आनंदराव पवार, दिनेेेश जाधव, आशा व अंगणवाडी सेविका, ग्रामपंचायत सदस्य उपस्थितीत होते.
ग्रामविकास अधिकारी आनंदराव पवार म्हणाले कामेरीत सध्या १००पेक्षा जास्त रुग्ण आहेत. त्यातील बहुतांशी होम आयसोलेशनमध्ये उपचार घेत आहेत. ही संख्या आटोक्यात आणण्यासाठी सामूहिक प्रयत्न करणे गरजेचे आहे.