शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

टेंभू योजनेच्या पाण्यात आटपाडीकरांचा बळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2016 00:49 IST

पाण्याचा परवाना नाही : राजकारणात शेतकऱ्यांचे हाल

अविनाश बाड आटपाडी टेंभू योजनेचे पाणी आटपाडी तालुक्यात येऊन दोन वर्षे झाली, पण या पाण्याचे कसलेही नियोजन नसल्याने आटपाडीकरांवर या पाण्याकडे बघत बसण्याची वेळ आली आहे. ही योजना होण्यासाठी क्रांतिवीर नागनाथअण्णा नायकवडी यांच्या नेतृत्वाखाली ज्या आटपाडीत गेली २१ वर्षे पाणी परिषद होत आहे; त्याच आटपाडीकरांना वगळून या योजनेच्या पाणी उपसा करण्याचे परवाने दिले जात आहेत. राजकारण्यांच्या जिरवाजिरवीत निष्पाप आटपाडीकरांचा बळी दिला असल्याची खंत व्यक्त होत आहे. विधानसभा निवडणुकीपूर्वी आटपाडी तालुक्यात टेंभूचे पाणी आले, लोक आनंदले, ‘कृष्णामाई आली हो अंगणी’ म्हणत आता दुष्काळ संपेल असे वाटत असतानाच, दोन वर्षे झाली तरी या पाण्याचा तालुकावासीयांना फारसा उपयोग झालेला नाही. टेंभूचे पाणी सध्या फक्त तलावात येते. या तलावातील पाणी उपसा करण्याचे ज्या शेतकऱ्यांना पूर्वी परवाने आहेत, त्यांनाच याचा लाभ होतो. या पाण्याचा उचल परवाना मिळावा, यासाठी पाटबंधारे कार्यालयात शेतकरी हेलपाटे मारत असतात. वास्तविक सांगोला आणि कडेपूर तालुक्यातील याच योजनेच्या पाण्याचे उचल परवाने पाटबंधारे विभागाने दिले आहेत. त्यामुळे या योजनेच्या वीजबिलासाठी ते शेतकरी खुशीने पैसे देत आहेत. आटपाडी तालुक्यात मात्र परवानेच नसल्याने शेतकरी कसे आणि कशासाठी पैसे देणार? हा प्रश्न आहे. त्यामुळे आटपाडीतून शेतकरी पैसे भरत नाहीत, ही केवळ तालुक्याची अकारण बदनामी करणारा आणि दुष्काळाला टक्कर देऊन मानाने जगण्याचा प्रयत्न करणाऱ्या शेतकऱ्यांचा अपमान करणारा खोटा प्रचार आहे. यावर्षी सांगोला तालुक्यातील ३६५ शेतकऱ्यांनी १ कोटी ६ लाख रुपये टेंभूच्या पाण्यासाठी भरले तर, परवाने नसूनही माणगंगा साखर कारखान्यासह शेतकऱ्यांनी ५७ लाख ५७ हजार रुपये भरले. सांगोला तालुक्याला या योजनेचे १२० दिवस पाणी सुरू होते. आटपाडी तालुक्यात मात्र फक्त २० दिवस दिले गेले. आमदार अनिल बाबर यांनी २५१ द. ल. घ. फूट पाणी आटपाडी तालुक्यात सोडले असल्याचा दावा केला आहे, तर राजेंद्रअण्णा देशमुख यांनी पाटबंधारे विभागाचे पत्र दाखवून आटपाडी तालुक्यात फक्त १३० द. ल. घ. फूट पाणी देऊन अन्याय केल्याचे नुकत्याच झालेल्या शेतकरी मेळाव्यात जाहीरपणे सांगितले. गेल्या १५ दिवसांपासून राजेंद्रअण्णा देशमुख, आ. अनिल बाबर आणि अमरसिंह देशमुख यांच्यात आरोप-प्रत्यारोपाच्या फै री झडत आहेत. राजेंद्रअण्णांनी माजी मंत्री जयंत पाटील यांच्यासमोर आ. अनिल बाबर यांचे नाव न घेता त्यांनीच आडकाठी आणल्याचा आरोप केला. त्याला आ. बाबर यांनी आकडेवारी सांगून त्यांचा चांगलाच समाचार घेतला. आता पुन्हा आ. बाबर यांच्यावर शेतकरी मेळाव्यात सडकून टीका करण्यात आली. अमरसिंह देशमुख यांनी तर बाबर हे टेंभूचे जनक नाहीत. त्यांचा या योजनेशी संबंधच नसल्याचे त्यांचे नाव घेऊन वक्तव्य केले. या दुष्काळी भागाचा कायापालट करण्याची क्षमता असलेली आणि शासनाने हजारो कोटींचा खर्च करून निर्माण केलेली अशिया खंडातील सर्वात मोठी सिंचन योजना म्हणून टेंभूची ओळख आहे. आता शेतकरी आधी पैसे भरायला तयार असूनही पाणी दिले जात नसेल आणि त्यात राजकारण येत असेल तर आणखी किती दिवस आटपाडीकर जनता हा अन्याय सहन करणार, हा खरा प्रश्न आहे.